चालू घडामोडी - ५ एप्रिल २०१५
- केंद्र सरकारने पुढील पाच वर्षांसाठीचे नवे विदेश व्यापार धोरण जाहीर केले आहे.
- या धोरणातंर्गत निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ आणि ‘इज ऑफ डूइंग बिझनेस’ यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
- वाणिज्य आणि उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांनी विदेश व्यापार धोरणाची घोषणा केली.
- या धोरणाचा प्रमुख उद्देश देशाला २०२० पर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापारातील प्रमुख भागीदार बनविण्याचा असणार आहे.
- नव्या व्यापार धोरणामध्ये मर्केंडाईज एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया (एमईआयएस) आणि सर्व्हिस एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया (एसईआयएस) या दोन नव्या योजनांची घोषणा करण्यात आली असून ई-कॉमर्स क्षेत्रातील निर्यातीला एमईआयएस अंतर्गत आणले जाणार आहे.
- नव्या विदेश व्यापार धोरणात निर्यातीला प्रोत्साहन देण्याबरोबरच रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यावर भर देण्यात आला आहे. तर पायाभूत सुविधा सुधारणे आणि व्यवसायात सुलभता आणणे या गोष्टींना देखील या धोरणात प्राधान्य देण्यात आले आहे.
- याशिवाय, नव्या उद्योजकांना प्रशिक्षण देणे, कृषी उत्पादने आणि पर्यावरण स्नेही उत्पादनांची निर्यात वाढविणे, वस्तूंच्या निर्यातीसोबतच सेवा निर्यातीला देखील चालना देणे यांसारख्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
- नव्या धोरणात दर तिमाहीने निर्यातीचे मूल्यमापन, नव्या बाजारपेठांचा शोध अशा महत्वपूर्ण बाबींचा देखील समावेश करण्यात आला आहे.
- अमेरिकेतील लघुग्रह केंद्राने मंगळ व गुरु या ग्रहांमध्ये आढळलेल्या एका लघुग्रहाचे ‘विशी आनंद ४५३८’ असे नामकरण केले आहे.
- बुद्धिबळात भारताचा झेंडा रोवणारा विश्वनाथन आनंद याच्या सन्मानार्थ या ग्रहाला त्याचे नाव देण्यात आले आहे.
- मंगळ व गुरु या ग्रहांमध्ये १० ऑक्टोबर १९८८ मध्ये एक लघुग्रह आढळला होता. जपानचे केन्झो सुझूकी यांनी या ग्रहाचा शोध लावला होता. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या लघुग्रहाला नाव देण्यात आले नव्हते.
- लघुग्रहांचा अभ्यास करणाऱ्या अमेरिकेतील लघुग्रह केंद्राचे सदस्य मायकेल रुडेन्को हे स्वतः बुद्धिबळाचे चाहते असून या लघुग्रहाला विश्वनाथन आनंदचे नाव द्यावे असा प्रस्ताव रुडेन्को यांनी मांडला होता. या प्रस्तावाला अंतराळ संघटनेने मान्यता दिल्याने या लघुग्रहाचे नामकरण ‘विशी आनंद ४५३८’ असे करण्यात आले.
- यापूर्वी क्रीडा क्षेत्रात बुद्धिबळमधील माजी विजेता अनातोली कारपोव्ह, क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन, आर्सनलचे फुटबॉल प्रशिक्षक आर्सन वेन्गर, टेनिसपटू रॉजर फेडरर, राफेल नादाल यांची नावे लघुग्रहांना देण्यात आली आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिगारेटच्या पाकिटावरील वैधानिक इशाऱ्याचा आकार वाढविण्यात यावा, असे निर्देश आरोग्य मंत्रालयास दिले आहेत.
- वैधानिक इशाऱ्याचा आकार भलेही ८५ टक्क्यांपर्यंत नसला तरीसुद्धा तो ६० टक्क्यांपर्यंत असणे आवश्यक असल्याचे मोदींनी सांगितले.
- केंद्रीय आरोग्यमंत्री : जे. पी. नड्डा
- केंद्र सरकारने राज्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी आणखी ६ महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्यामुळे देशातील सुमारे ७० टक्के जनतेला अत्यंत स्वस्त दराने अन्नधान्य मिळण्याचा अधिकार मिळणार आहे.
- नरेंद्र मोदी सरकारने या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यांना दिलेली ही दुसरी मुदतवाढ आहे. यापूर्वी ४ ऑक्टोबरपर्यंत तीन महिने मुदतवाढ देण्यात आली होती.
- अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत देशातील ८१ कोटी जनतेला एकूण ६.१
कोटी टनांपेक्षा अधिक तांदूळ, गहू आणि भरड धान्य अनुदानित दराने वाटण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील ७५ टक्के आणि नागरी भागातील ५० टक्के जनतेला स्वस्त दराने धान्य मिळणार आहे.
- आतापर्यंत हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र, पंजाब, छत्तिसगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. तसेच उत्तराखंड, केरळ आणि गुजरात राज्यांकडून लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
- अन्नसुरक्षा कायद्या व्यतिरिक्त दारिद्रय़रेषेखालील, दारिद्रय़रेषेवरील आणि अंत्योदय अन्नयोजना अशा तीन योजना देशात सुरू आहेत.
- यानुसार ज्यांच्याकडे बीपीएल रेशन कार्ड आहे, त्यांना ३५ किलो तांदूळ आणि गहू अनुक्रमे ५.७५ रुपये व ४.१५ रुपये किलो दराने पुरवले जात आहेत.
- तर अंत्योदय अन्नयोजनेअंतर्गत गहू २ रुपये दराने आणि तांदूळ ३ रुपये दराने पुरवण्यात येत आहे. तसेच एपीएल कार्ड म्हणजे दारिद्रय़रेषेवरील रेशन कार्डधारकांना तांदूळ ८ रुपये दराने, तर गहू ६ रुपये दराने पुरवला जात आहे.
- तिरुनेलवल्ली (तामिळनाडू) येथील एका वरिष्ठ अभियंत्याच्या आत्महत्येप्रकरणी तमिळनाडूचे माजी कृषीमंत्री एस. एस. कृष्णामूर्ती यांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधिकाऱ्यांनी अटक केली.
- सात चालकांना भरती करून घेण्यासाठी कृष्णामूर्ती यांनी अभियंते एस. मुथुकुमारस्वामी यांच्यावर दबाव आणला होता. या मुळेच मुथुकुमारस्वामी यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
- मुथुकुमारस्वामी यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती.
- युद्धजर्जर येमेनमधून भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी जोरदार मोहिम सुरू असून, येथे अडकलेल्या बांग्लादेश, पाकिस्तान, नेपाळ, युगांडा व जिबुतीच्या नागरिकांच्या सुटकेसाठी भारताकडून मदत करण्यात येत आहे.
- भारताने युद्धग्रस्त येमेनमधून आणखी ६७० भारतीय नागरिकांची सुटका केली. यामध्ये सानामधून आणलेल्या ४८८ नागरिकांचा समावेश आहे.
- युद्धग्रस्त येमेनमधून आतापर्यंत २ हजार ३०० भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.
- एअर इंडियाने ऑपरेशन ‘राहत’ अंतर्गत ही कारवाई सुरू केली आहे.
- भ्रष्टाचारासंदर्भातील प्रकरणामध्ये बांग्लादेशमधील न्यायालयाने देशाच्या विरोधी पक्ष नेत्या बेगम खलिदा झिया यांना जामीन मंजूर केला आहे.
- बांग्लादेश नॅशनॅलिस्ट पक्षाच्या प्रमुख असलेल्या बेगम खलिदा झिया यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवून त्यांना अटक करण्यात आली होती.
- झिया यांनी पंतप्रधानपदाच्या कार्यकाळामध्ये साडेसहा लाख डॉलर्सचा गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी दोषी आढळल्यास झिया यांना आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते.
- मद्रास उच्च न्यायालयात तमीळ भाषेचा वापर करण्याची मागणी तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी केली. “स्थानिक भाषेचा न्यायालयाच्या कामकाजात उपयोग केल्यास न्यायदानाची प्रक्रिया अधिक सुलभ होईल,” असे ते म्हणाले.
- ज्येष्ठ हिंदी कवी आणि साहित्यकार कैलाश वाजपेयी यांचे ह्दय विकाराने निधन झाले.
- उत्तरप्रदेशातील हमीरपूर येथे नोव्हेंबर १९३६ मध्ये जन्मलेले डॉ. वाजपेयी यांनी लखनऊ विद्यापीठातून पदवी आणि सन्माननीय डॉक्टरेट उपाधी धारण केली.
- १९६० मध्ये त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात मुंबईत नोकरी केली. मात्र एक वर्षानंतर त्यांनी दिल्लीत परत जाऊन दिल्ली विद्यापीठात शिक्षकी पेशा पत्करला.
- त्यांनी एकूण २८ पुस्तके लिहिली असून त्यापैकी १४ कवितासंग्रह आहेत.
- त्यांची काही लक्षणीय पुस्तके : संक्रांत, देहांत से हटकर, तिसरा अंधेरा, सुफिनामा इ.
- पुरस्कार : साहित्य अकादमी पुरस्कार (२००९) ‘हवा मे हस्ताक्षर’ या साहित्यकृतीसाठी.
Mpsc rajyaseva prelim cut off kay asel
उत्तर द्याहटवाMpsc is tailent
उत्तर द्याहटवा