चालू घडामोडी - २ एप्रिल २०१५


    Dr. Shreekar Pardeshi
  • महाराष्ट्र राज्याचे नोंदणी महानिरीक्षक आणि पीएमपीचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांच्या कर्तबगारीची दखल घेत केंद्र सरकारने त्यांची थेट पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती केली आहे.
  • पंतप्रधान कार्यालयात नियुक्त झालेले डॉ. परदेशी हे राज्यातील एकमेव अधिकारी आहेत.

  • देशातील बहुचर्चित कोळसा खाणवाटप गैरव्यहार (कोलगेट) प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने मनमोहनसिंग यांच्यासह पाच जणांना बजाविलेल्या समन्सला आज स्थगिती देण्यात आली.
  • मनमोहनसिंग यांना आरोपी ठरविल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय (केंद्रीय अन्वेषण विभाग) आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली असून, तीन आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.

  • विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांना पश्‍चिम बंगालमध्ये येण्यास राज्य सरकारने बंदी घातली आहे.
  • सार्वजनिक शांतता, जातीय तणावासह विविध मुद्यांवरून तोगडिया यांना राज्यात प्रवेश करण्यास सरकारने बंदी घातली आहे.

  • टाटा उद्योगसमूहाने आपल्या कर्मचाऱ्यांना स्वयंपाकासाठी आवश्यक असलेल्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवरील (एलपीजी) अनुदान न स्वीकारता विनाअनुदानित सिलिंडर घेण्याची विनंती केली आहे.
  • स्वयंप्रेरणेने अनुदानाचा त्याग करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचे आवाहनही कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.

  • तेरा वर्षांपूर्वी वांद्रे येथे झालेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणी पुढील सुनावणी ६ एप्रिल रोजी होणार असून, त्यावेळी सलमान खानला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
  • सलमान खान याच्याविरुद्धच्या २००२ मधील ‘हिट अँड रन’ खटल्यातील साक्षीदारांची उलटतपासणी पूर्ण झाली आहे. अंतिम सुनावणी सत्र न्यायालयात सुरू झाली आहे.

  • चीनमध्ये रुग्णालयांतील लांबच रांगा आणि ढासळलेली ग्रामीण आरोग्य सेवा सुधारण्यासाठी २०२०पर्यंत डॉक्टरांची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या पाच वर्षांत दर हजार लोकसंख्येमागे दोन तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात येणार आहे.
  • आरोग्य सेवेवर होणारा खर्च : २०१३ : १३३ अब्ज डॉलर आणि २०२० : १ ट्रिलियन डॉलर (अपेक्षित)

    Pervez Musharraf
  • पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष व लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्या विरोधात न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे.
  • इस्लामाबादमधील लाल मशिदीवर लष्कराने २००७ मध्ये केलेल्या कारवाईत लाल मशिदचे गाझी अब्दुल रशीद ठार झाले होते. पोलिसांनी माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्या विरोधात २०१३ मध्ये गुन्हा दाखल केला आहे.
  • याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मुशर्रफ एकदाही सुनावणीला उपस्थित न राहिल्याने अटक वॉरंट काढण्यात आले आहे.

  • सीरियाची राजधानी असलेल्या दमास्कस शहराच्या दक्षिणेकडील यार्मूक जिल्ह्याच्या प्रामुख्याने पश्चिमेकडील भागावर इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने नियंत्रण मिळविले आहे.
  • या भागामध्ये मुख्यत: पॅलेस्टीनवरुन आलेल्या निर्वासितांची मोठी संख्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. निर्वासितांच्या छावणीमधील मोठ्या भागावर इसिसने नियंत्रण मिळविले आहे. 
  • बैत अल मकदीस या येथील पॅलेस्टिनी शस्त्रसज्ज संघटनेस इसिसने पराभूत केले आहे.

  • परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात भारतीय भांडवली बाजारात २.७ लाख कोटी रुपये गुंतविल्याने परकीय संस्थांच्या गुंतवणुकीने उच्चांकी पातळी गाठली आहे.
  • सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेसच्या आकडेवारीनुसार परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी २०१४-१५ या वर्षात शेअर बाजारात १.०९ लाख कोटी रुपयांची तर कर्जरोख्यांमध्ये १.६४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
  • परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी २०१२-१३ या आर्थिक वर्षात १.६८ लाख कोटी रुपये भारतीय भांडवल बाजारात गुंतवले होते.
  • नरेंद्र मोदी प्रणित केंद्र सरकारने परदेशी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ संकल्पना समोर आणली आहे.

२ टिप्पण्या: