
प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते चालण्याफिरण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे राजशिष्टाचार बाजूला ठेवून राष्ट्रपती स्वत: कृष्णमेनन मार्गस्थित वाजपेयींच्या निवासस्थानी गेले आणि त्यांना ‘भारतरत्न’ प्रदान केला.
अटलबिहारी वाजपेयी यांचा अल्पपरिचय
- जन्म : २५ डिसेंबर १९२४, ग्वाल्हेर येथे
- शिक्षण : राज्यशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी
- राजकीय प्रवास:
- आर्य कुमार सभेच्या माध्यमातून ग्वाल्हेरमधून १९३९ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश.
- १९४२ मध्ये भारत छोडो चळवळीत सहभाग, अटक.
- श्याम प्रसाद मुखर्जी यांच्यासमवेत भारतीय जनसंघाचे काम.
- १९५७ मध्ये बलारामपूर मतदारसंघातून संसदेत प्रवेश.
- विरोधी पक्षात अभ्यासपूर्ण आणि उल्लेखनीय कारकिर्द
- आणीबाणीनंतर जनता पक्षामधून दिल्ली मतदारसंघातून संसदेवर.
- बहुमतातील जनता पक्षाच्या सरकारमध्ये मार्च १९७७ ते जुलै १९७९ दरम्यान भारताचे परराष्ट्रमंत्री. याशिवाय दोन वेळा अत्यल्प काळासाठी परराष्ट्रमंत्री.
- १९८० मध्ये लालकृष्ण अडवाणी आणि भैरोसिंग शेखावत यांच्यासोबत मिळून भारतीय जनता पक्षाची स्थापना.
- भारतीय जनता पक्षाचे पहिले अध्यक्ष.
- १९९६ च्या लोकसभेसाठी पंतप्रधान पदासाठीचे उमेदवार.
- १६ मे १९९६ ते १ जून १९९६ या केवळ १३ दिवसांसाठी पंतप्रधानपदी विराजमान.
- त्यानंतर बहुमत सिद्ध होण्यापूर्वीच पंतप्रधानपदाचा राजीनामा.
- १९ मार्च १९९८ ते २२ मे २००४ दरम्यान पुन्हा पंतप्रधानपद.
- अतिमहत्वाचे प्रमुख निर्णय
- मे १९९८ मध्ये पोखरण येथे जमिनीखाली अणुचाचण्या.
- १९९८ साली पाकिस्तानसोबत चर्चेसाठी लाहोर भेट, लाहोर-दिल्ली दरम्यान बससेवेची सुरुवात.
- १९९९ साली कारगिलमध्ये पाकिस्तान सैन्याच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला (कारगिल युद्ध)
- काठमांडूवरून दिल्लीला जाणारे भारतीय प्रवासी विमानाचे अपहरण झाल्यावर तीन दहशतवाद्यांच्या बदल्यात सर्व प्रवाश्यांची सुखरूप सुटका.
- प्रमुख पुरस्कार
- १९९२ - पद्मविभूषण पुरस्कार
- १९९३ - कानपुर विश्वविद्यालयाची डि.लीट.
- १९९४ - लोकमान्य टिळक पुरस्कार
- १९९४ - उत्कृष्ट संसद पटू : भारतरत्न पंडित गोविंद वल्लभपंत पुरस्कार
- २०१४ - भारतरत्न
- साहित्यिक प्रवास
- मासिक राष्ट्रधर्म, साप्ताहिक पाञ्चजन्य, दैनिक स्वदेश, दैनिक अर्जुन या नियतकालिकांचे संपादक म्हणून काम.
- प्रकाशित पुस्तके
- मेरी संसदीय यात्रा (चार खंड)
- मेरी इक्यावन कवितायें (कवितासंग्रह)
- स्नकल्प काल
- शक्ती से शक्ती
- फोर डिकेड्स ऑफ पार्लमेंट (तीन खंड)
- लोकसभा में अटलजी (भाषणांचा संग्रह)
- मृत्यु या हत्या
- अमर बलिदान
- कैदी कविराज की कुंडलिया (आणीबाणीच्या काळात तुरुंगात लिहिलेल्या कविता)
- न्यू डायमेंशन्स ऑफ इंडियाज् फॉरिन पॉलिसी (a collection of speeches delivered as External Affairs Minister during १९७७-७९)
- जनसंघ और मुसलमान
- संसद मे तीन दशक (Speeches in Parliament १९५७-१९९२)
- अमर आग है (कविता संग्रह)
- न दैन्यं न पलायनम् (कविता संग्रह)
Thanks sir
उत्तर द्याहटवा