चालू घडामोडी - १८ एप्रिल २०१५
- १८ एप्रिल : जागतिक वारसा दिन (World Heritage Day)
- पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात हानिकारक ठरणाऱ्या एचएफसी वायूंचे (हायड्रोफ्लोरोकार्बन) उत्सर्जन कमी करण्यास भारताने अखेर तयारी दर्शविली आहे.
- या संदर्भातल्या जागतिक पातळीवरील कराराच्या अंमलबजावणीस भारतातर्फे अनेक वर्षांपासून विरोध केला जात होता. मात्र आता विरोध मागे घेत मॉन्ट्रेअल करारानुसार पावले उचलण्यास भारताने सुरवात केली आहे.
- पुढील पंधरा वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने हे उत्सर्जन कमी करण्याचा प्रस्ताव भारताने सादर केला आहे. मागील महिन्यात आफ्रिकेतील ५४ देशांच्या गटाने हायड्रोफ्लोरोकार्बनचे उत्सर्जन कमी करण्याबाबत तयारी दर्शविली आहे.
- ‘एचएफसी’ वायू
- एअरकंडिशनिंग, रेफ्रिजरेटर्स आणि उष्णतारोधक आवरणांमध्ये ‘एचएफसी’ वायूंचा मोठ्या प्रमाणात उपयोग होते. पर्यावरणास मोठ्या प्रमाणात हानिकारक ठरणाऱ्या या वायूंमुळे ओझोनच्या थराला हानी पोचते.
- ओझोनला हानिकारक घटक (ओडीएस)
- जगभरात वापरल्या जाणाऱ्या क्लोरोफ्लोरोकार्बन्स (सीएफसी) आणि हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन्स (एचसीएफसी)मुळे ओझोनच्या थराची मोठ्या प्रमाणात हानी होत होती. त्यामुळे या वायूंच्या वापरावर बंदी घालण्याचा मॉन्ट्रिअल करारानुसार निर्णय झाला.
- भारताने ‘सीएफसी’ वायूंचा वापर थांबविण्यात यश मिळविले असून, ‘एचसीएफसी’ वायूंचा वापरही भारत टप्प्याटप्प्याने बंद करणार आहे. मात्र या दोन्हींचा वापर थांबविल्यानंतर अनेक देशांमध्ये हायड्रोफ्लोरोकार्बनचा (एचएफसी) वापर वाढला आहे.
- मॉन्ट्रिअल करार
- संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली १९८७ मध्ये (१ जानेवारी १९८९ पासून लागू) झालेल्या या करारानुसार वातावरणातील ओझोनच्या थराला हानी पोचविण्याऱ्या पदार्थांचा वापर टप्प्याटप्प्याने थांबविण्यावर सर्व देशांचे एकमत झाले होते.
- ओझोनच्या थराची हानी झाल्यामुळे मानवाला गंभीर स्वरूपाच्या परिणामांना तोंड द्यावे लागते आहे.
- कारण ओझोनचा थर विरळ झाल्यास सूर्याची अतिनील (यूव्ही) किरणे थेट पृथ्वीवर पोचतात. उच्च तीव्रतेच्या अतिनील किरणांमुळे कॅन्सर होण्याचाही धोका निर्माण होते.
- विकसनशील देशांचा विरोध
- मॉन्ट्रिअल करारामुळे विकसित देशांनी उच्च प्रतीच्या नव्या तंत्रज्ञानाचा (एचएफसीविरहित) वापर फ्रिज आणि एअरकंडिशनरमध्ये करण्यास सुरवात केली.
- भारत, चीनसारख्या इतरही विकसनशील देशांनी हे नवे खर्चिक तंत्रज्ञान वापरावे असा विकसित देशांचा आग्रह आहे. मात्र भारताने त्यास विरोध केला होता.
- नवे तंत्रज्ञान खर्चिक असून ते परवडणारे नाही, असे विकसनशील देशांचे म्हणणे होते.
- संरक्षण साहित्य निर्मितीमध्ये अनेक संधी असल्याचे हेरून महाराष्ट्र सरकारने स्वत:चे संरक्षण उत्पादन धोरण तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. असा पुढाकार घेणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरले आहे.
- लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार यांनी विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सचिवांना नोटीस बजावली आहे.
- वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना आखण्यात आल्या यासंबंधीचा स्थितिदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.
- तसेच वाहनांच्या घनतेबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.
- आपल्या राज्यातील विविध ठिकाणच्या हवेच्या गुणवत्तेच्या नमुन्यांची तपासणी घेऊन त्यासंबंधीचा अहवाल सादर करा, असे लवादाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
- तसेच वाहनांमुळे होणारे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना आखता येतील यासंबंधीच्या सूचनादेखील सादर करा, असे लवादाने म्हटले आहे.
- याआधी राष्ट्रीय हरित लवादाने राजधानी दिल्लीत दहा वर्षे जुन्या वाहनांच्या वाहतुकीस बंदी घातली होती. पण या आदेशाला न्यायालयाने आता दोन आठवड्यांची स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.
- सूर्यमालेतील पहिला ग्रह असलेल्या बुधाभोवती मागील चार वर्षांपासून अधिक काळ फिरत असलेले ‘मेसेंजर’ हे यान इंधन संपल्याने पुढील दोन आठवड्यांत ग्रहावर कोसळणार आहे.
- अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने हे यान २००४ मध्ये अवकाशात सोडले होते.
- हे यान ३० एप्रिलला बुधाच्या पृष्ठभागावर कोसळेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. हे यान ३.९१ किलोमीटर प्रतिसेकंद या वेगाने कोसळणार आहे.
- मात्र, ते बुधाच्या पृथ्वीला दिसू न शकणाऱ्या भागात कोसळणार असल्याने ही घटना शास्त्रज्ञांना पाहता येणार नाही.
- डॉक्टरांनी शिफारस केलेली औषधे विक्री करण्यास स्नॅपडील या ऑनलाईन विक्री करणाऱ्या संकेतस्थळावर अन्न व औषध प्रशासनाने बंदी घातली आहे. तसेच ‘स्नॅपडील’ला संकेतस्थळावरून औषधांची नावेही काढून टाकण्यास सांगितले आहे.
- ‘स्नॅपडील’ परवान्याशिवाय औषध विक्री करत असल्याच्या अनेक तक्रारी अन्न व औषध विक्री प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे स्नॅपडीलच्या गोदामांवर छापे टाकण्यात आले.
- औषध आणि प्रशाधनसामुग्री अधिनियम १८(क) अन्वये डॉक्टरांनी शिफारस केलेल्या औषधांची विक्री केवळ परवानाधारक किरकोळ विक्रेतेच करू शकतात. यामुळे स्नॅपडीलच्या ऑनलाइन औषध विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
- संयुक्त राष्ट्र संघाने शांततेचे आवाहन केल्यानंतरही सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील फौजांनी येमेनमधील हवाई हल्ल्यांची तीव्रता वाढविली.
- यामुळे उडालेल्या गोंधळात अल कायदा या दहशतवादी संघटनेने आणखी काही भूभाग आपल्या ताब्यात घेतला.
- संयुक्त राष्ट्र संघाच्या माहितीनुसार, या युद्धात आतापर्यंत शेकडो नागरिकांचा बळी गेला असून, हजारो लोकांनी स्थलांतर केले आहे.
- पाकिस्तानमधील खैबर पख्तुनवा प्रांतातील करक जिल्ह्यातील तेरी या गावात श्री परमहंसजी महाराज समाधी हे हिंदू मंदिर ताब्यात घेऊन त्याचे पुनर्निर्माण करण्याचे आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने प्रांताच्या सरकारला दिले आहेत.
- हे मंदिर १९९७ मध्ये पाडण्यात आल्याचा आरोप असून त्याचा ताबा सध्या येथील एका मौलवीकडे आहे.
- श्री परमहंसजी महाराज यांचे निधन १९१९ मध्ये झाल्यानंतर त्यांचे येथे समाधी मंदिर बांधण्यात आले होते.
- त्यानंतर १९९७ पर्यंत येथे त्यांचे भक्त नियमितपणे दर्शनाला येत होते. मात्र, १९९७ मध्ये काही मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांनी हे मंदिर पाडले.
- अरेवा कंपनीने उभारलेल्या अणुभट्ट्यांमध्ये गंभीर त्रुटी असून त्या दूर करण्याची बाब खूप खर्चिक असल्याचे फ्रान्सच्या अणुऊर्जा नियामक आयोगाचे प्रमुख पेरी-फ्रॅंक शेवेट यांनी सांगितले. या त्रुटी अणुभट्टीच्या तळाशी आढळून आल्या असल्याचे ते म्हणाले.
- या त्रुटी अणुऊर्जानिर्मितीच्या घटकांवर गंभीरपणे परिणाम करणाऱ्या आहेत, त्यातून कोणताही धोका होऊ शकतो.
- गेल्या आठवड्यात फ्रान्सच्या फ्लामॅनव्हीले येथील बहुउद्देशीय इमारतीत युरोपियन प्रेशराईज्ड रिऍक्टरमध्ये (ईपीआर) दोष आढळले आहेत. त्याचप्रकारचे दोष अरेवाच्या अणुभट्टीत आढळून आल्याचे शेवेट यांनी सांगितले. दोन्ही इमारती उभारताना एकच तंत्रज्ञान वापरले गेले असल्याचे त्यांनी नमूद केले.
- चीनमधील कम्युनिस्ट सरकारवर टीका करणाऱ्या ७१ वर्षीय गाओ यू या ज्येष्ठ महिला पत्रकाराला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.
- माध्यमांचे स्वातंत्र्य आणि लोकशाहीवर बंदी घालण्याबाबतचे चीनमधील सरकारचे एक गुप्त परिपत्रक परकी संकेतस्थळाला पुरविल्याबद्दल गाओ यांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
- ९५ वर्षाच्या पीटर वेबर या ‘युवा‘ वैमानिकाची गिनिज बुकमध्ये नोंद झाली आहे.
- विमानाच्या उड्डाणावेळी वेबर यांचे वय ९५ वर्षे ४ महिने व २३ दिवस होते. त्यांनी विमान उड्डाणाची परवानगी घेतली होती, यानंतर विमानाचे उड्डाण केले होते. उड्डाणावेळी गिनिज बुकचे अधिकारी उपस्थित होते.
- सन २००७ मध्ये कोल कुगेल (वय १०५) यांनी विमानाचे उड्डाण केले होते. त्यावेळी गिनीज बुकमध्ये त्यांची नोंद झाली होती. पुढे काही दिवसांनी त्यांचे निधन झाले होते. यामुळे ९५ वर्षीय वेबर यांची गिनिज बुकमध्ये नोंद झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा