चालू घडामोडी - ३१ मार्च २०१५
- ‘इंडियन रिजनल नेव्हिगेशनल सॅटेलाइट सिस्टिम’ या सात उपग्रहांच्या मालिकेतील चौथ्या "आयआरएनएसएस-१डी‘ उपग्रहाचे प्रक्षेपण २८ मार्च रोजी श्रीहरिकोटा येथून करण्यात आले होते.
- लिक्विड अपोजी मोटार सायंकाळी ५ वाजून २८ मिनिटांनी कार्यान्वित करून ‘आयआरएनएसएस-१डी’ची पहिली कक्षा वाढ यशस्वीरीत्या करण्यात आली आहे.
- ‘पीएसएलव्ही-सी२७’ प्रक्षेपकाच्या मदतीने ‘आयआरएनएसएस-१डी’ उपग्रह अवकाशात झेपावला होता.
- भारताची स्वतःची नेव्हिगेशन यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी चार उपग्रहांची आवश्यकता आहे. त्यामुळे ‘आयआरएनएसएस-१डी’ उपग्रह अपेक्षित कक्षेत पोचल्यानंतर भारताला स्वतःची नेव्हिगेशन यंत्रणा मिळणार आहे.
- या मालिकेतील इतर तीन उपग्रह पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत प्रक्षेपित केले जाणार आहेत. एकूण सात उपग्रहांच्या माध्यमातून नेव्हिगेशन यंत्रणा अधिक अचूक करण्याचा ‘इस्रो’चा प्रयत्न आहे.
- सध्या भारताला अमेरिकेच्या ‘जीपीएस’ या नेव्हिगेशन यंत्रणेवर अवलंबून राहावे लागते. मात्र, ‘इस्रो’च्या प्रयत्नांतून लवकरच स्वदेशी नेव्हिगेशन यंत्रणा उपलब्ध होणार आहे.
- सुटीच्या दिवशी काम केल्यास पोलिसांना एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल नेटवर्किंग साइटवर ट्विट करून दिला.
- या निर्णयाचे शहर पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वागत केले.
- भूसंपादन विधेयकाचा विरोध दर्शविण्यासाठी कॉंग्रेस पक्ष दिल्लीमध्ये ‘किसान रॅली’ काढत आहे.
- आयकर विभागाने कर बुडवणाऱ्यांची नावे प्रसिद्ध करण्याचे नवे धोरण अवलंबिले आहे.
- सुरुवातीला आयकर विभागाने १८ जणांची नावे प्रसिद्ध केली असून त्यामध्ये गोल्डसुख ट्रेड आणि सोमानी सिमेंटस्चाही समावेश आहे. एकूण १८ जणांच्या यादीतील ११ जण गुजरात स्थित आहेत.
- कर बुडविणाऱ्यांना तातडीने थकलेला कर जमा करण्याबाबतची नोटिसही देण्यात आली आहे.
- न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज आणि माजी कर्णधार डॅनिएल व्हिटोरी याने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीनशेहून अधिक गडी बाद करणारा व्हिटोरी पहिला न्यूझीलंडचा गोलंदाज ठरला. त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्येदेखील त्याने ३६२ गडी बाद केले.
- कसोटी क्रिकेटमध्ये तीनशेहून अधिक बळी आणि चार हजार धावा करणारा तो कपिल, बोथम यांच्यानंतर तिसरा अष्टपैलू खेळाडू आहे.
- न्यूझीलंडकडून कसोटीत सर्वाधिक गडी बाद करणारा तो दुसरा गोलंदाज ठरला.
- ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी स्वत:चे नाव ‘ट्रेडमार्क‘ म्हणून नोंद करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज मंजूर झाल्यानंतर कोणत्याही उद्योग समूहास किंवा कंपनीस हॉकिंग यांच्या परवानगीशिवाय त्यांचे नाव वापरता येणार नाही.
- यापूर्वी 'हॅरी पॉटर'च्या लेखिका जे. के. रोलिंग आणि इंग्लंडच्या फुटबॉल संघाचा माजी कर्णधार डेव्हिड बेकहॅम यांनीही स्वत:च्या नावाचा 'ट्रेडमार्क' नोंदविला आहे.
- जगाच्या इतिहासामध्ये प्रथमच एखाद्या शास्त्रज्ञाने स्वत:चे नाव 'ट्रेडमार्क' म्हणून नोंदविण्यास पुढाकार घेतला आहे.
- अर्थात, नावाचा 'ट्रेडमार्क' घेतला असला, तरीही सामाजिक कार्यासाठी किंवा भौतिकशास्त्राठी एखादा ट्रस्ट सुरू करण्यास किंवा हॉकिंग यांना झालेल्या 'मोटर न्यूरॉन' या गंभीर आणि दुर्मिळ आजाराविषयी संशोधन करणाऱ्यांसाठी हॉकिंग यांचे नाव वापरण्याची मुभा असेल, असे लंडन येथील वृत्तपत्राने म्हंटले आहे.
- येमेनची राजधानी साना या शहरावर सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील मुस्लिम देशांच्या आघाडीने जोरदार हवाई हल्ले केले.
- गेल्या पाच दिवसांपासून सौदीने येमेनमधील बंडखोरी मोडून काढण्यासाठी येथे हवाई हल्ले सुरू केले आहेत.
- दिल्ली विद्यापीठात शिकणारी आदिती आर्य देशाची नवी मिस इंडिया झाली आहे. मंगळुरू कर्नाटकची आफ्रिन रेचल ही तिच्या खालोखाल उपविजेती राहिली. तर लखनऊच्या आयटी महाविद्यालयातील वर्तिका सिंह दुसरी उपविजेती ठरली.
- यावर्षी देशातील २१ सौदर्यवतींनी या स्पर्धेत भाग घेतला.
- सध्याची मिस इंडिया कोयल राणाने आदितीला मुकुट सुपूर्द केला.
- फेमिना मिस इंडिया :
- ही भारत देशात भरवली जाणारी वार्षिक सौंदर्य स्पर्धा आहे. १९६३ सालापासून चालू असलेल्या ह्या स्पर्धेचे आयोजन टाइम्स समूहामधील फेमिना हे मासिक करते. ह्या स्पर्धेत एकूण तीन विजेत्या महिला निवडल्या जातात.
- फेमिना मिस इंडिया मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये, पहिली उपविजेती मिस अर्थ स्पर्धेमध्ये दुसरी उपविजेती मिस इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करते.
- जापनीज मोटार उत्पादक होंडाने उपकंपनी होंडा कार्स इंडिया लिमिटेडच्या अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कात्सुशी इनोऊ यांची एप्रिलपासून नेमणूक करण्याचात आली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
- विद्यमान अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हिरोनोरी कनायामा निवृत्त होत असून जपानमध्ये परतणार आहेत.
- राजधानी दिल्लीत ३० मार्चपासून तंबाखू उत्पादन, विक्री, खरेदी आणि साठवण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे राजधानीत तंबाखूसह गुटखा, खैनी विक्री करता येणार नाही.
- त्यातूनही विक्री करताना आढळल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करून दंडही वसूल केला जाईल, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.
- तंबाखूजन्य पदार्थामध्ये गुटखा, तंबाखू आणि खैनीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असला, तरी सिगारेटवर हा आदेश लागू नाही.
- दिल्लीचे आरोग्यमंत्री : सत्येंद्र जैन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा