दिनविशेष : आंतरराष्ट्रीय योग दिन (दुसरा)
सनवे तायहूलाइट जगात सर्वात वेगवान व कार्यक्षम महासंगणक
- चीनचा नवा सनवे तायहूलाइट हा महासंगणक जगात सर्वात वेगवान व कार्यक्षम ठरला आहे. तो ९३ पद्म (पद्म : १ वर पंधरा शून्य) आकडेमोडी सेकंदाला करू शकतो.
- सनवे तायहूलाइट संगणक नॅशनल रीसर्च सेंटर ऑफ पॅरलल कम्प्युटर इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी या संस्थेने तयार केला असून त्यात चीननिर्मित संस्कारक वापरले आहेत.
- चीनमधील नॅशनल सुपरकॉम्प्युटिंग सेंटर या संस्थेचा तियानहे २ हा महासंगणक गेली सहा वर्षे टॉप ५०० यादीत पहिल्या क्रमांकावर होता.
- सनवे तायहूलाइट हा संगणक तियानहे २ पेक्षा दुप्पट वेगवान व तिप्पट कार्यक्षम आहे. तियानहे संगणक सेकंदाला ३३.८६ पद्म गणने करीत होता. तो आता दुसऱ्या क्रमांकावर आहे.
- टायटन हा क्रे एक्स ४० संगणक अमेरिकेच्या ऊर्जा खात्याच्या ओकरिज नॅशनल लॅबोरेटरीत बसवला असून त्याचा वेग सेकंदावा १७.५९ पद्म इतका आहे. तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
- आयबीएम ब्लू जीन म्हणजेच सिक्वोया हा लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरीतील महासंगणक चौथ्या क्रमांकावर असून जपानचा फुजित्सु येथील के महासंगणक पाचव्या क्रमांकावर आहे.
- अमेरिकेचा मीरा, ट्रिनिटी, युरोपचा पिझजेन्ट. जर्मनीचा हॅझेल हेन, सौदी अरेबियाचा शाहीन २ हे महासंगणक पहिल्या दहामध्ये आहे.
- चीनकडे १६७ तर अमेरिकेत १६५ महासंगणक आहेत. यादीतील पहिले दोनही महासंगणक चीनचे आहेत. वर्षांतून दोनदा वेगवान महासंगणकाची यादी जाहीर केली जाते.
एसबीआयद्वारे दारूगोळा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना वित्तपुरवठा
- सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असणारी भारतीय स्टेट बँक दारूगोळा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना वित्तपुरवठा करीत असल्याचे उघड झाले आहे.
- अशाप्रकारे दारूगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या जगभरात १५८ बँका आहेत. त्यातील स्टेट बँक ही पहिलीच भारतीय बँक ठरली आहे.
- 'डच कॅम्पेन ग्रुप पॅक'द्वारा जारी करण्यात आलेल्या यादीमध्ये स्टेट बँकेचे नाव आहे. गुंतवणूक करणाऱ्या अन्य बँकांमध्ये जेपी मॉर्गन, बारक्लेज, बँक ऑफ अमेरिका, क्रेडिट सूस आदी नामवंत बँकांचाही समावेश आहे.
- या बँकांनी जून २०१२ ते एप्रिल २०१६पर्यंत क्लस्टर बॉम्ब तयार करणाऱ्या सात कंपन्यांमध्ये २८०० कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे.
हरिका द्रोणावली कझाकिस्तानच्या बुद्धिबळ स्पर्धेत विजयी
- ग्रँडमास्टर हरिका द्रोणावली हिने कझाकिस्तानच्या युरासियान बिल्ट्स बुद्धिबळ स्पर्धेत सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पूरस्कार मिळविला आहे.
- भारताच्या दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूने २५०० डॉलर आणि ६० ईएलओ गुण मिळविले. यासोबतच ती स्पर्धेत पहिल्या १० खेळाडूंच्या यादीत सहभागी झाली.
- हरिकाने गेल्या अठवड्यात हंगेरीच्या जलाकारोस आतंरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवातदेखील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता. यात ती क्लासिकल रँकिंगच्या यादीत नवव्या स्थानावर होती.
- हरिका आणि यिफान यांनी स्पर्धेच्या अखेरीस समान १२.५ गुण मिळविले होते आणि तिने टायब्रेकरमध्ये विजय मिळविला.