केंद्र सरकारने दीर्घकाळ प्रतीक्षेत असणाऱ्या नागरी विमान धोरणाला मंजुरी दिली असून त्यातील नियमांमुळे विमानप्रवास स्वस्त आणि सुखकर होणार आहे.
या धोरणामुळे विमान सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार आहे, तर विमान वाहतूक क्षेत्रात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहचेल.
देशांतर्गत विमानसेवेचा विकास व्हावा आणि प्रवाशांचे हित जोपासत दळणवळण क्षेत्रात क्रांती व्हावी, या उद्देशाने २२ प्रमुख मुद्दे असलेले धोरण नागरी उड्डाण विभागाने तयार केले आहे.
कर्नाटकात ई-सिगारेटवर बंदी
कर्नाटक राज्यात ई-सिगारेटची विक्री, वितरण व उत्पादनावर तातडीने बंदी घालण्यात आल्याची घोषणा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री यू. टी. खादर यांनी केली.
बंदी असतानाही ई-सिगारेटची विक्री करण्याचे आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. ऑनलाइनद्वारा विक्री करण्यात येत असल्याची तक्रार आल्यास संबंधित वेबसाइटवरही बंदी घालण्यात येणार आहे.
ई-सिगारेटवर बंदी घालणारे पंजाब हे देशातील पहिले राज्य आहे. सध्या पंजाबसह चंडीगडमध्ये ई-सिगारेटवर बंदी आहे.
तिस्ता सेटलवाड यांच्या एनजीओची मान्यता रद्द
सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांची एनजीओ ‘सबरंग ट्रस्ट’ची मान्यता रद्द करण्यात आली आहे. या ट्रस्टचे लायसन्स रद्द केल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले आहे.
एफसीआरएचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिस्ता सेटलवाड यांच्या एनजीओवर कारवाई करण्यात आली आहे. सप्टेंबर २०१५मध्ये सबरंग ट्रस्टला एफसीआरएचा परवाना रद्द करण्यात आला होता.
तिस्ता आणि त्याचे पती जावेद यांच्या विरोधात परदेशी पैशाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा गुजरात पोलीस आणि सीबीआय तपास करत आहेत.
ऑगस्ट २०१५मध्ये सीबीआयने या दोघांविरोधात एफआयआर दाखल केले होते. अमेरिकास्थित फोर्ड फाऊंडेशनकडून तिस्ता एनजीओसाठी पैसा गोळा करत होती. मात्र पैशाचा दुरुपयोग केल्याचे चौकशीअंती समोर आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा