चालू घडामोडी : १४ जून
उद्योगपती विजय मल्या फरार घोषित
- भारतातील बॅंकांची तब्बल नऊ हजार कोटी रुपयांचे कर्जे थकवून भारत सोडून गेलेले उद्योगपती विजय मल्या यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने फरार घोषित केले आहे. 
- अंमलबजावणी संचालनालयाने मुंबईच्या विशेष न्यायालयात मल्ल्या यांना फरार घोषित करण्याची मागणी केली होती. 
- एकापेक्षा अधिक अटक वॉरंट आणि आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अजामीनपात्र अटक वारंट असल्याने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील कलम ८२ खाली मल्ल्या यांना फरार घोषित करण्यात आले आहे.
- आयडीबीआय बँकेच्या ९०० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी नुकतीच विजय मल्ल्या याची मुंबई आणि बेंगळुरू येथील १,४११ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.
- विजय मल्ल्याला ईडीने भारतात परत येण्यासाठी अनेकदा समन्स पाठवले होते. मल्ल्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच एप्रिलमध्ये मल्ल्याचा पासपोर्ट रद्द केला आहे.
चीन व दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक
- दक्षिण चिनी समुद्रामधील सागरी सीमारेषेच्या वादावरुन निर्माण झालेल्या तणावग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चीन व दक्षिण पूर्व आशियामधील इतर देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीस १४ जून रोजी प्रारंभ झाला.
- दक्षिण चिनी समुद्रामधील बेटांच्या मालकीहक्कावरुन येथील राजकीय परिस्थिती तणावग्रस्त झाली आहे. युक्सी या चीनमधील शहरामध्ये ही बैठक होत आहे.
- आसिआन या दक्षिण आशियामधील १० देशांच्या संघटनेमधील ४ देशांनी दक्षिण चिनी समुद्रामधील चीन दावा करत असलेल्या भागावर आपला अधिकार असल्याचे म्हटले आहे.
- या वादग्रस्त भागामध्ये चीनकडून तेल व नैसर्गिक वायुसाठी उत्खनन करण्यात येत असल्यासंदर्भात व्हिएतनामने तीव्र निषेध नोंदविला आहे.
- तसेच चीनच्या जवळजवळ संपूर्ण दक्षिण चिनी समुद्रावरील दाव्याविरोधात फिलीपीन्सने संयुक्त राष्ट्रसंघाकडे धाव घेतली आहे.
- या पार्श्वभूमीवर होत असलेली ही बैठक अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.
जगातील १० बुद्धिमान देशांची यादी
- अमेरिकेतील मिन्नेआपोलिस या शहरातील 'गॅझेट रिव्ह्यू' कंपनीने बुद्धिमत्ता, शिक्षण व्यवस्था व काही चाचण्यांच्या आधारे एक सर्व्हे केला असून त्याद्वारे जगातील १० बुद्धिमान देशांची नावे जाहीर केली आहेत.
- यामध्ये पहिल्या क्रमांकावर हाँगकाँग, दुसऱ्या स्थानी दक्षिण कोरिया व तिसऱ्या क्रमांकावर जपान असून शेवटच्या म्हणजेच १० व्या स्थानावर स्वीडन हा देश आहे. 
   | जगातील १० बुद्धिमान देश | 
  
    | क्र. | देश | बुध्यांक | 
  
    | १. | हाँगकाँग | १०७ | 
  
    | २. | दक्षिण कोरिया | १०६ | 
  
    | ३. | जपान | १०५ | 
  
    | ४. | तैवान | १०४ | 
  
    | ५. | सिंगापूर | १०३ | 
  
    | ६. | नेडरलँडस | १०३ | 
  
    | ७. | इटली | १०२ | 
  
    | ८. | जर्मनी | १०२ | 
  
    | ९. | ऑस्ट्रिया | १०१ | 
  
    | १०. | स्वीडन | १०१ | 
चीनमधील तरुणांना वीर्यदान करण्याचे आवाहन
- चीनमध्ये वाढत असलेली ज्येष्ठांची संख्या आणि काम करणाऱ्या लोकांची कमी होत असलेली संख्या यामुळे सरकार चिंतेत असून सरकारने चीनमधील तरुणांना वीर्यदान करण्याचे आवाहन केले आहे. 
- चीन सध्या देशातील स्पर्म बँकांमधील वीर्याच्या कमतरतेचा सामना करतो आहे. त्यामुळेच चीन सरकारतर्फे हे पाऊल उचलण्यात आले आहे.
- हे संकट लक्षात घेऊन तरुणांना आकर्षित करण्यासाठी स्पर्म डोनेट करणाऱ्यास १००० डॉलर्स देण्यापासून ते मोफत आयफोनपर्यंतच्या आकर्षक योजना राबविण्यात येत आहेत.
- अलीकडेच चीन सरकारने देशातील लोकांना दोन अपत्यांना जन्म देण्याची परवानगी दिली आहे.
हॅमिल्टनकडून जेतेपद मोहम्मद अली यांना अर्पण
- फॉर्म्युला-वन शर्यतीमधील अव्वल दर्जाचा खेळाडू लुइस हॅमिल्टनने कॅनेडियन ग्रां. प्रि. शर्यतीत मिळवलेले विजेतेपद दिवंगत महान बॉक्सिंगपटू मोहम्मद अली यांना अर्पण केले आहे.
- हॅमिल्टनने फॉर्म्युला-वन शर्यतीत आतापर्यंतच्या कारकिर्दीतील ४५वा विजय मिळवला. सेबॅस्टियन व्हेटेलने या शर्यतीत सुरुवातीला आघाडी घेतली होती. मात्र नंतर हॅमिल्टनने त्याला मागे टाकले.
- त्याने ही शर्यत एक तास, ३१ मिनिटे, ५.२९६ सेकंदांत पूर्ण केली. त्याच्यानंतर पाच सेकंदांनी व्हेटेलने शर्यत पार केली. विल्यम्स संघाच्या व्हालटेरी बोटासने तिसरे स्थान मिळवले.
 
 
 
 
 
 
 
  
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा