चालू घडामोडी : १३ जून
राष्ट्रपती आफ्रिकन देशांच्या दौऱ्यावर
- आफ्रिका खंडातील घाना, आइव्हरी कोस्ट आणि नामीबिया या तीन देशांच्या दौऱ्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी १३ जून रोजी प्रयाण केले. राष्ट्रपतींचा हा विदेश दौरा सहा दिवसांचा आहे.
- राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या भारतासाठी महत्त्वाच्या असलेल्या या तीन देशांमध्ये लोकशाहीची पाळेमुळे रुजली असून, येथील राजकीय व्यवस्था मजबूत मानली जाते.
- या देशांबरोबर असलेल्या संबंधांना अधिक मजबूत करत व्यापार वाढविण्यासाठी राष्ट्रपतींच्या या दौऱ्यावेळी प्रयत्न करण्यात येणार आहे.
- राष्ट्रपती पदावर येण्यापूर्वी मुखर्जी यांनी घाना आणि आइवरी कोस्ट या देशांना भेटी दिल्या आहेत, तर नामीबियाला भारताचे राष्ट्रपती पहिल्यांदाच भेट देणार आहेत.
लिंक्डइन मायक्रोसॉफ्टने खरेदी केले
- व्यावसायिक नेटवर्किंग साईट्सच्या क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘लिंक्डइन’ ‘मायक्रोसॉफ्ट’ने विकत घेतली आहे. २६ अब्ज डॉलरमध्ये झालेल्या या व्यवहाराला दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे.
- लिंक्डइनवर सध्या ४३.३ कोटी यूजर्स असून, विविध क्षेत्रातील व्यावसायिक नेटवर्किंगसाठी या वेबसाईटचा वापर करतात.
- दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या व्यवहारानुसार लिंक्डइनच्या प्रत्येक शेअरला १९६ डॉलर इतका भाव मिळाला आहे
- लिंक्डइन ही आता मायक्रोसॉफ्टच्या समूहातील एक कंपनी झाली असून, तिचे सीईओ जेफ विनर यापुढे सत्या नाडेला यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहेत.
भारतातील एकमेव संस्कृत वृत्तपत्र सुधर्मा संकटात
- भारतातील सध्या चालू असलेल्या सुधर्मा या बहुदा एकमेव संस्कृत वृत्तपत्राला पुढील महिन्यात ४६ वर्षे पूर्ण होत असून या वृत्तपत्राची आर्थिक स्थिती हलाखीची आहे.
- हे वृत्तपत्र म्हैसूर येथून निघते त्याचा खप ३००० आहे. या वृत्तपत्राची वार्षिक वर्गणी चारशे रुपये आहे व खपही कमी होत आहे.
- वृत्तपत्राचे संपादक संपथ कुमार यांनी हे वृत्तपत्र टिकवण्यासाठी केंद्र सरकारकडे आर्थिक मदत मागितली आहे.
- सुधर्मा हे नफा मिळवण्यासाठी नसून पत्रकारिता व संस्कृत यांच्या आवडीतून काढलेले नियतकालिक आहे असे संपादकांनी म्हटले आहे.
- सुधर्मा हे वृत्तपत्र कलाले नादादूर वरदराजा अय्यंगार या संस्कृत पंडितांनी १९७० मध्ये संस्कृत भाषा प्रसारासाठी सुरू केले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा