कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या चिलीने अर्जेंटिनाचा पराभव करून विजेतेपद मिळविले.
निर्धारित वेळेत आणि जादावेळेतही सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्याने सामन्याचा निकाल पेनल्टी शूट आउटवर ठरला. यात चिलीने ४-२ अशी बाजी मारून सलग दुसऱ्यांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
चिलीचा कर्णधार ब्राव्हो याने गोलकीपर म्हणून अतिशय सुरेख कामगिरी करत संघाचा विजय साकारला. त्यालाच सामनावीर घोषित करण्यात आले.
अर्जेंटिनाला २०१५च्या कोपा अमेरिका स्पर्धेतही चिलीने अंतिम सामन्यात पराभूत केले होते. त्या वेळी चिली स्पर्धेचे यजमान होते.
तो सामनाही निर्धारीत आणि जादा वेळेत गोलशून्य बरोबरीत राहिल्याने सामन्याचा निकाल पेनल्टी शूट आउटवर ठरला. त्यात चिलीने अर्जेंटिनाला ४-१ अशी मात देऊन विजेतेपद पटकावले होते.
मेसीची निवृत्ती
अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेसीला पेनल्टी शूटआउटमध्ये गोल करण्यात आलेल्या अपयशाने निराश झालेल्या मेसीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले.
अर्जेंटिनाने १४ वेळा कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. मात्र, १९९३नंतर त्यांना विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे.
अर्जेंटिनाला २०१४च्या विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम सामन्यात जर्मनीविरुद्ध; तर गेल्या वर्षी याच स्पर्धेत सॅंटीयागोमध्ये चिलीविरुद्ध पराभूत व्हावे लागले होते.3
या अपयशामुळे अर्जेंटिनाला सलग तिसऱ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत अपयशाला सामोरे जावे लागले आहे.
भारताचे आणखी चार खेळाडू रिओसाठी पात्र
बिल कुनिंगहम यांचे निधन
प्रसिद्ध फॅशन छायाचित्रकार बिल कुनिंगहम यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.
कुनिंगहम यांनी ४० वर्षे न्यूयॉर्क टाइम्समध्ये फॅशन छायाचित्रकार म्हणून काम केले होते. कुनिंगहम हे न्यूयॉर्कच्या रस्त्यावर उदयोन्मुख छायाचित्रकार म्हणून प्रसिद्ध होते.
त्यांच्या निधनाबद्दल न्यूयॉर्क टाइम्सने त्यांना समर्पित छायाचित्रकार आणि सांस्कृतिक मानववंशशास्त्रज्ञ होते, अशा शब्दांत आदरांजली वाहिली.
पिशव्यांवरील फुलांच्या नक्षीसाठीही प्रसिद्ध होते. मात्र, अनेक लोकांच्या मते ही कोणतीही फॅशन नसून केवळ मूर्खपणा आहे, असे त्यांचे म्हणणे होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा