‘पीएसएलव्ही- सी ३४’ या प्रक्षेपकाच्या साह्याने एकाच वेळी वीस उपग्रह अवकाशात सोडण्याच्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) मोहिमेस २२ जून रोजी यश आले.
श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून हे प्रक्षेपण करण्यात आले. या प्रक्षेपणाचे यशस्वी प्रक्षेपण झाल्याने अंतराळ क्षेत्रात इस्त्रोने मिळविलेले हे मोठे यश आहे.
अन्य अवकाश संशोधन संस्थांच्या तुलनेत इस्त्रोने १० पट कमी खर्चात हे प्रक्षेपण केले.
याआधी पीएसएलव्ही-सी ९ च्या साह्याने ‘इस्रो’ने २००८ मध्ये एकाच वेळी १० उपग्रह अवकाशात सोडले होते. मात्र, ते सर्व एकाच कक्षेत सोडले होते.
एकाचवेळी सर्वाधिक यशस्वी उपग्रह प्रक्षेपित करणारा भारत हा अमेरिका आणि रशियानंतर तिसरा देश बनला आहे.
२०१४ मध्ये रशियाने एकाचवेळी ३७ उपग्रहांना यशस्वीरित्या कक्षेत स्थापित केले होते. तर २०१३मध्ये अमेरिकेच्या नासाने २९ उपग्रहांचे प्रक्षेपण केले होते.
इस्त्रोचे प्रमुख : किरण कुमार
उपग्रहांबाबत
अवकाशात सोडण्यात आलेल्या वीस उपग्रहांचे एकूण वजन १२२८ किलो आहे. भारत, अमेरिका, कॅनडा, जर्मनी व इंडोनेशिया या पाच देशांचे वीस उपग्रह या वेळी सोडण्यात आले.
या वीस उपग्रहांमध्ये १७ छोटे परदेशी उपग्रह आहेत. कार्टोसॅट हा भारताचा मुख्य पृथ्वी निरीक्षण करणारा उपग्रह असून, उर्वरित २ उपग्रह भारतीय शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी तयार केले आहेत.
भारतीय उपग्रह
‘कार्टोसॅट- २’चे वजन ७२७.५ किलो आहे. दूरसंवेदन आणि निरीक्षणासाठी प्रामुख्याने याचा उपयोग होईल.
‘कार्टोसॅट-२’द्वारे काढण्यात येणाऱ्या छायाचित्रांचा वापर नियोजनासाठी प्रामुख्याने करण्यात येणार आहे, त्यातही पाणीवाटपाच्या दृष्टीने त्याचा वापर होणार आहे.
‘सत्यभामा’ हा उपग्रह चेन्नईतील सत्यभामा विद्यापीठाने तयार केला असून, त्याचे वजन दीड किलो आहे. हरितगृहवायूंची माहिती गोळा करण्याचे काम तो करेल.
‘स्वयम्’ हा ९९० ग्रॅम वजनाचा उपग्रह पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीईओपी) विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. कम्युनिटी रेडिओसाठी त्याचा वापर होणार आहे.
महासागरात भरकटलेले जहाज किंवा जंगलात हरवलेल्या व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी ‘स्वयम्’ उपग्रह पुण्यातील उपयुक्त ठरणार आहे.
हा संपूर्णतः भारतीय बनावटीचा उपग्रह आहे. त्याचा १०० मिलिमीटर बाय १०० मिलिमीटर बाय ११३ मिलिमीटर एवढा लहान आकार आहे.
जगातील सर्वांत लहान दुसरा असलेला हा उपग्रह तयार करण्यासाठी महाविद्यालयात २००८ पासून संशोधन सुरू होते. त्यासाठी इस्रोशी करार करण्यात आला होता.
विदेशी उपग्रह
लापान-३ (इंडोनेशिया) : नैसिर्गिक संसाधने व पर्यावरणाच्या अभ्यासाठी पाठवलेला पृथ्वी निरीक्षण उपग्रह.
बायरोस (जर्मनी) : अतितापमानाच्या घटनांची माहिती गोळा करणारा उपग्रह.
एम ३ एमसॅट (कॅनडा) : सागरी निरीक्षण आणि संदेशवहन उपग्रह.
जीएचजीसॅट-डी (कॅनडा) : हरितगृहवायूंची माहिती गोळा करणारा पृथ्वी निरीक्षण उपग्रह.
स्कायसॅट जेन-२ (अमेरिका) : गुगलच्या टेरा बेला कंपनीचा ११० किलो वजनाचा अर्थ इमेजिंग उपग्रह. या उपग्रहाद्वारे पृथ्वीची उच्च प्रतीची छायाचित्रे आणि व्हिडिओ काढली जातील.
डोव्ह उपग्रह (अमेरिका) : अमेरिकेच्या पृथ्वी निरीक्षण करणारे १२ डोव्ह उपग्रह.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा