चालू घडामोडी : १२ जून
सायना नेहवाल ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी
- भारतीय सायना नेहवाल हिने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या सन यू हिचा पराभव करीत ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
- सायनाचे ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिजचे हे दुसरे जेतेपद आहे. यापूर्वी तिने २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.
- लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकणाऱ्या सायनने अंतिम लढतीत चीनची १२व्या क्रमांकावरील सून यू हिचा ११-२१, २१-१४, २१-१९ असा ३ सेटमध्ये सरळ पराभव केला.
- उपांत्य फेरीत सायनाने सातव्या मानांकित चीनच्या यिहान वांगला २१-८, २१-१२ असे सहज पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
राज्यसभा निवडणूक निकाल
- राज्यसभेच्या २७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ११, तर समाजवादी पक्षाने त्यापाठोपाठ ७ जागा जिंकल्या.
- काँग्रेसने ६ जागांवर विजय मिळविला, तर बहुजन समाज पक्षाने २ जागा जिंकल्या.
- हरयाणातून भाजप समर्थित अपक्ष उमेदवार झी समुहाचे मालक सुभाष चंद्र यांनी अनपेक्षित असा नाट्यमय विजय नोंदविला.
- छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि कोल्हापूरचे युवराज संभाजी राजे छत्रपती यांची मोदी सरकारने राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त सदस्य म्हणून निवड केली.
प्रख्यात पत्रकार इंदर मल्होत्रा यांचे निधन
- ज्येष्ठ राजकीय समीक्षक व प्रख्यात पत्रकार इंदर मल्होत्रा (८६) यांचे हृयविकाराच्या तीव्र झटक्याने ११ जून रोजी निधन झाले.
- ‘युनायटेड प्रेस ऑफ इंडिया’तून आपल्या कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या मल्होत्रा यांनी नंतर टाइम्स ऑफ इंडियासह महत्त्वाच्या दैनिकांचे संपादकपद भूषविले.
- ब्रिटनमधून प्रसिद्ध होणाऱ्या ‘गार्डियन’ या प्रतिष्ठित दैनिकातही त्यांनी १९६५ ते १९९५ या काळात लेखन केले. ते १९८६-८७ मध्ये नेहरू फेलो आणि १९९२-९३ मध्ये वुड्रो विल्सन फेलोही होते
- त्यांनी १५ वर्षे ‘स्टेट्समन’मध्ये काम केले. राजकीय प्रतिनिधी म्हणून त्यांनी या दैनिकात काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते याच दैनिकात सहाय्यक संपादक झाले.
- मल्होत्रा यांनी अमेरिका व ब्रिटनमधील सर्व प्रमुख विद्यापीठांसह भारतात तसेच परदेशात अनेक व्याख्याने दिली आहेत.
- अखेरच्या वर्षांमध्ये त्यांनी विविध नियतकालिकांसाठी केलेल्या स्तंभलेखनातून भारताच्या राजकीय इतिहासाचे खोलवर दर्शन घडवले. त्यांचा ‘रिअर व्ह्य़ू’ हा स्तंभ लोकप्रिय होता.
- त्यांनी विविध विषयांवर पुस्तके लिहिली. त्यात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर लिहिलेल्या ग्रंथाचाही समावेश आहे.
- पंतप्रधान पंडित नेहरू ते विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ पाहिलेल्या निवडक पत्रकारांत त्यांचा समावेश होता.
पोस्टमॅन मोबाईल ॲप
- स्पीड पोस्ट, रजिस्टर पत्र, टपाल आदींच्या वितरणाची योग्य वेळेवर खातरजमा करुन घेण्यासाठी टपाल विभागाच्या वतीने ‘पोस्टमॅन मोबाईल ॲप’ सुरु करण्यात आले आहे.
- केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते छिंदवाडा येथे या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्रातील मुंबईतही भांडुप येथे या मोबाईल ॲपचे उद्घाटन करण्यात आले.
- टपाल वस्तू प्राप्त करणे, ई-हस्तांक्षर घेणे, त्याच ठिकाणी सेंट्रल सर्व्हर मध्ये संबंधित माहिती अपलोड करणे आदी या ॲप्लिकेशनची वैशिष्ट्ये आहेत.
- व्यवसाय विकास, टपाल आणि बचत बँक कार्यान्वयन या माध्यमातून सरकारला २०१५-१६मध्ये एकूण १६७५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. या महसूलात गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
- देशातील आर्थिक समावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी टपाल विभागाच्या अंतर्गत इंडिया पोस्ट पेमेंट बँक सुरु करायला मंत्रिमंडळाने १ जून २०१६ रोजी मंजूरी दिली आहे.
- त्यानुसार ‘माय गव्ह’ वेबसाईटवर लोगो डिझाईन आणि घोषवाक्य स्पर्धा सुरु करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा