सागरी सेवेचा जागतिक विक्रम करणारी आणि सुमारे ३० वर्षे भारतीय नौदलाचे शक्तिस्थळ म्हणून मिरवणारी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराट ६ मार्च २०१७ रोजी निवृत्त झाली.
या युद्धनौकेने देशाच्या सागरी सीमांना पोलादी संरक्षण पुरवत भारतीय नौदलाचा हिंदी महासागरातील दरारा कायम राखण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे.
नवीन विमानवाहू नौका विक्रमादित्य आता पूर्ण क्षमतेने नोदलाच्या सेवेत रुजू झाल्यानंतर विराट निवृत्त होत आहे.
निवृत्त झाल्यानंतर पुढील चार महिन्यात युद्धनौकेसाठी खरेदीदार मिळाला नाही तर तिला भंगारात काढले जाणार आहे.
आंध्रप्रदेश सरकारने आयएनएस विराटवर संग्रहालय सुरु करण्याची इच्छा दर्शवली आहे. मात्र यासाठी सुमारे एक हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
सुमारे ५० वर्षे जगाचे महासागर पालथे घालणाऱ्या आयएनएस विराटची निवृत्ती ही एक युगान्त ठरला.
आयएनएस विराट
ब्रीदवाक्य: ‘जलमेव यस्य, बलमेव तस्य’ (ज्याच्या हाती सागर, त्याचीच सत्ता)
२२० मी. लांब, ४५ मीटर रुंद.
सेंटॉर वर्गातील या विमानवाहून युद्धनौकेची भारतीय झेंड्याखाली ३० वर्षे सेवा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा