चालू घडामोडी : ११ मार्च
ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
- भारत व रशियाने संयुक्तरित्या विकसित केलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चंदीपूर येथील प्रक्षेपणस्थळावर घेण्यात आलेली चाचणी यशस्वीरित्या पार पडली.
- ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ प्रकारातील क्षेपणास्त्र असून, त्याची मारक क्षमता ४५० किलोमीटरपर्यंत आहे.
- नवीन तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आलेल्या या क्षेपणास्त्रामुळे संरक्षण दलातील आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही दलांची शक्ती वाढणार आहे.
- ब्राह्मोसच्या आणखी एका आवृत्तीवर काम सुरु असून, ८०० किमी पल्ल्याचे लक्ष्य गाठणारे क्षेपणास्र लवकरच भारतीय ताफ्यात समाविष्ट होणार आहे.
भारताच्या महिला संघाचा पहिला आंतरराष्ट्रीय विजय
- भारताच्या महिला संघाने आइस हॉकी स्पर्धेत आजवरची सर्वोत्तम कामगिरी करत थायलंडमध्ये आयआयएफएफ आइस हॉकी आशियाई स्पर्धेत पहिला आंतरराष्ट्रीय विजय मिळविला आहे.
- एकूण २० जणांचा समावेश असलेला भारतीय महिला संघ या स्पर्धेसाठी थायलंडमध्ये दाखल झाला होता.
- अपुरा निधी आणि इतर अनेक अडथळ्यांचा सामना करत भारतीय संघाने फिलिपिन्सच्या संघावर ४-३ असा थरारक विजय मिळवला.
- आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय महिला आइस हॉकी संघाचा हा पहिला विजय ठरला आहे.
- २०१६मध्ये भारतीय संघ आशियाई स्पर्धेत सहभागी झाला होता. पण संघाला एकही विजय मिळवता आला नव्हता आणि पहिल्याच फेरीत स्पर्धेतून बाद ठरला होता.
- त्यामुळे यावेळीच्या स्पर्धेसाठी सहभाग घेण्यासाठी देखील निधी मिळणे कठीण झाले होते. अशावेळी सुमारे ३००० लोकांकडून आर्थिक मदत मिळवून भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी झाला.
- स्पर्धेच्या सुरूवातीच्या सामन्यात निराशा झाली. पण फिलिपिन्सविरुद्धच्या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करत संघाने विजय प्राप्त केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा