उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत ४०३ पैकी ३१२ जागांवर विजय मिळविल्यानंतर भाजपाकडून भारतातील या सर्वात मोठ्या राज्याच्या २१व्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांची निवड करण्यात आली.
त्यांनी १९ मार्च रोजी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांना प्रशासनात सहाय्य करण्यासाठी केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांनी उप-मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात २ उपमुख्यमंत्री, २३ कॅबिनेट, स्वतंत्र कार्यभार असलेले ९ राज्यमंत्री आणि १५ राज्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यात दोन उप-मुख्यमंत्र्यांची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
प्रसिद्ध गिटारवादक चक बेरी यांचे निधन
अमेरिकेतील प्रसिद्ध गिटारवादक चक बेरी यांचे १८ मार्च रोजी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.
त्यांच्या जन्म मिसौरीमधील सेंट लुईमध्ये १९२६मध्ये झाला होता. गायक आणि प्रसिद्ध गिटारवादक म्हणून चक बेरी यांची ओळख होती.
त्यांनी सात दशकांच्या करिअरमध्ये अनेक हिट गाणी गायली. त्यामध्ये रोल ओव्हर बिथोवन आणि जॉन बी गुड अशा अनेक गाण्याचा समावेश आहे.
१९५५मध्ये त्यांचे मेबेलिन पहिले गाणे रिलीज झाले होते. या गाण्याला सुद्धा सर्वाधिक जास्त पसंती मिळाली होती.
चक बेरी यांना १९८४साली संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जाणाऱ्या ग्रॅमी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा