चालू घडामोडी : ८ ऑगस्ट
४५व्या सरन्यायाधीशपदी दीपक मिश्रा
- सर्वोच्च न्यायालयाच्या ४५व्या सरन्यायाधीशपदी दीपक मिश्रा यांनी नियुक्ती झाली आहे. ते ३ ऑक्टोबर २०१८पर्यंत या पदावर राहणार आहेत.
- सध्याचे सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांचा कार्यकाळ २७ ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यानंतर दीपक मिश्रा त्यांचा पदभार सांभाळणार आहेत.
- सध्या सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश असलेल्या दीपक मिश्रा यांच्या नावावर अनेक ऐतिहासिक सुनावण्या आहेत.
- याकूब मेमनच्या प्रकरणात त्यांनी रात्र जागवून सुनावणी केली होती. त्यानंतर न्यायपूर्णरीत्या याकूब मेमनला फाशी देण्यात आली.
- निर्भया प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यासह त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. देशभरातील सिनेमागृहांमध्ये राष्ट्रगीत लावण्याचे आदेशही मिश्रा यांनीच दिले होते.
- ३ ऑक्टोबर १९५३ रोजी जन्मलेले मिश्रा हे मूळचे ओदिशाचे आहेत. त्यांची सर्वसामान्यांमध्ये ‘प्रो सिटीझन जज’ अशी ओळख आहे.
- कायद्याची पदवी मिळवल्यानंतर १९७७मध्ये ओदिशा उच्च न्यायालयात त्यांनी आपल्या वकिली व्यवसायास प्रारंभ केला.
- काही वर्षांतच दिवाणी, फौजदारी, विक्रीकर विषयक तसेच घटनात्मक मुद्दे असलेल्या क्षेत्रातील नामवंत विधिज्ञ म्हणून त्यांचा लौकिक झाला.
- १९९६मध्ये त्यांना ओदिशा उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी मध्यप्रदेश व पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीशपदही भूषविले.
- २००९मध्ये पाटणा उच्च न्यायालयाचे ते मुख्य न्यायाधीश बनले. नंतर काही काळ दिल्ली उच्च न्यायालयात त्यांनी न्यायदान केले. २०११ मध्ये पदोन्नती मिळून ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले.
- दीपक मिश्रा हे १९९० ते ९१ दरम्यान सरन्यायाधीश राहिलेले रंगनाथ मिश्रा यांचे पुतणे आहेत.
मुस्लिम मुलींच्या शिक्षणासाठी शादी शगुन योजना
- देशातील मुस्लिम मुलींनी उच्च शिक्षणाचे ध्येय गाठण्यासाठी प्रोत्साहन द्यायला केंद्र सरकारकडून ५१ हजार रूपयांची रक्कम मदत म्हणून दिली जाणार आहे. या मदतीला ‘शादी शगुन’ असे नाव देण्यात आले आहे.
- केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मौलाना आझाद एज्युकेशन फाऊंडेशनकडून (एमएईएफ) हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
- एमएईएफनुसार, या नव्या योजनेचे ध्येय मुस्लिम मुलींना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आहे.
- याशिवाय नववी आणि दहावी इयत्तेत शिकणाऱ्या मुस्लिम मुलींना दहा हजार रूपयांची रक्कम दिली जाइल, असा निर्णयही झाला आहे.
- सध्या अकरावी आणि बारावीत शिकणाऱ्या मुस्लिम मुलींना बारा हजार रूपये शिष्यवृत्ती दिली जात होती.
- शादी शगुन या योजनेसाठी एक वेबसाइट तयार केली जात असून या वेबसाइटवर योजनेची संपूर्ण माहिती मिळणार आहे.
- अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नकवी
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गस्ती यांचे निधन
- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक डॉ. भीमराव गस्ती यांचे ८ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते.
- गस्ती यांनी देवदासी प्रथा नष्ट व्हावी, यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये त्यांनी मोठे काम केले.
- देवदासी महिलांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आणि बेरड-रामोशी समाजाच्या विकासासाठी ‘उत्थान’ ही सामाजिक संस्था त्यांनी बेळगावमधील यमुनापूर येथे सुरू केली.
- पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी आणि स्व-रूपवर्धिनी या संस्थांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान या संस्थेचे ते अनेक वर्षे उपाध्यक्ष होते.
- एमएस्सी इलेक्ट्रॉनिक्स ही पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर मॉस्कोच्या पेट्रिक लुमुंबा विद्यापीठातून याच विषयात त्यांनी पीएचडी मिळवली होती.
- गस्ती यांनी सामाजिक कार्यासह लेखनही केले. बेरड समाजाच्या व्यथा, वेदना आणि छळाचे चित्रण त्यांनी ‘बेरड’ या आत्मचरित्रातून मांडले. तसेच आक्रोश आणि सांजवारा ही त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा