चालू घडामोडी : १० ऑगस्ट
जॅग्वारमध्ये आता अत्याधुनिक रडार
- हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएल या कंपनीने जॅग्वार या लढाऊ विमानाची निर्मिती करताना त्यात प्रथमच अत्याधुनिक एईएसए रडार तंत्रज्ञान वापरले आहे.
- या नव्या रडारमुळे जग्वार या लढाऊ विमानांकडे दुसऱ्या रडारला अडचणी निर्माण करत लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता प्राप्त झाली आहे.
- या रडारमुळे शत्रूच्या ठिकाणांची अचूक माहिती मिळण्यास आणि ते उद्ध्वस्त करण्यास मदत होणार आहे.
- एचएल कंपनीने भारतीय वायूदलासाठी ‘जॅग्वार ड्रेन थ्री’ची निर्मिती करताना इंटरलिव्ड मोड ऑफ ऑपरेशन, हाय अॅक्युरसी अँड रेझ्युलेशन अशा अनेक प्रणाली या विमानात विकसित करण्यात आल्या आहेत.
- एचएलने इस्त्रायलमधल्या एका फर्मच्या मदतीने हे रडार तयार केले आहे. या रडारमुळे हे लढाऊ विमान एकाच वेळी अनेक लक्ष्य भेदू शकते.
- आत्तापर्यंत भारताच्या एकाही लढाऊ विमानात रडार नव्हते, या नव्या तंत्रज्ञानामुळे भारतीय वायुदलाच्या सामर्थ्यात वाढ होणार आहे.
- भविष्यात राफेल आणि बोइंगच्या नव्या लढाऊ विमानांमध्येही या रडारचा वापर करण्यात येणार आहे.
अँबी व्हॅलीचा लिलाव होणार हे अटळ
- सहारा समुहाची पुण्याजवळील अँबी व्हॅली लिलावाला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयने फेटाळून लावली आहे.
- सुप्रीम कोर्टाने सहारा समुहाला २० हजार कोटी रूपये जमा करण्याचे निर्देश दिले होते. मात्र ही रक्कम सहारा समूहाला देण्यात अपयश आले आहे.
- त्यामुळे मूळ रक्कम आणि त्यावरील व्याज मिळून आता ही रक्कम ३७ हजार कोटी रूपये झाली आहे.
- ही रक्कम सेबीद्वारे बेकायदेशीर ठरविण्यात आलेल्या सहारा समुहाच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना दिली जाणार आहे.
- सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता अँबी व्हॅलीचा लिलाव होणार हे अटळ आहे. तसेच यापूर्वी मुंबई हायकोर्टनेही अँबी व्हॅलीच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात यावी असे म्हटले आहे.
- याप्रकरणी सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना २ वर्षे तिहारच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. सध्या त्यांची पॅरोलवर सुटका करण्यात आली आहे.
मेक्सिकोला फ्रॅंकलिन वादळाचा तडाखा
- मेक्सिकोच्या किनाऱ्यावर श्रेणी १मध्ये मोडणाऱ्या फ्रॅंकलिन वादळाने १० ऑगस्ट रोजी धडक दिली आहे.
- साधारण ताशी ८५ मी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह आलेले हे वादळ मध्य मेक्सिकोच्या डोंगराळ भागापर्यंत जाण्याची शक्यता आहे.
- या वादळामुळे पूर्वेकडील किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना जोरदार पावसाचा आणि पुराचा तडाखा बसू शकतो.
- हे वादळ हळूहळू पश्चिमेस सरकत आहे. जसजसे वादळ पश्चिमेला सरकेल तसे त्याची तीव्रता कमी होत जाईल.
- तसेच या वादळामुळे ८ इंच ते १५ इंच पाऊस पडण्याची शक्यता असून यामुळे पुराचा धोका संभवत आहे.
- या वादळामुळे किनारी प्रदेशामध्ये सहा फुट उंचीपर्यंत लाटा निर्माण होऊ शकतात त्यामुळे नागरिकांनी धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे.
- फ्रॅंकलिन हे या हंगामातील पहिले चक्रीवादळ आहे. २०१७चा चक्रीवादळ हंगाम १ जूनला सुरु झाला, तो ३० नोव्हेंबर रोजी संपेल.
केनियामध्ये मतदानानंतर हिंसाचार
- केनियामध्ये राष्ट्राध्यक्ष उहुरु केन्याटा पुन्हा निवडून यावेत यासाठी मतदान प्रक्रियेत गोंधळ घातला असल्याचा आरोप विरोधकांनी केल्यामुळे झालेल्या हिंसाचारात ५ जणांचे प्राण गेले आहेत.
- ८ ऑगस्ट रोजी झालेल्या मतदानात केन्याटा यांनी गोंधळ घातल्याचे विरोधी उमेदवार राईला ओडिंगा यांनी आरोप केला होता.
- मतदानानंतर जाळपोळ, रस्ते अडवणे, घोषणाबाजी असा प्रकारच्या घटना संपुर्ण केनियामध्ये घडत आहेत.
- केन्याटा यांचे विरोधी उमेदवार ओडिंगांचे गाव किसुमुमध्ये जमावावर पोलिसांना अश्रुधुराचा मारा आणि गोळीबार करावा लागला.
- २००७मध्येही निवडणूक झाल्यानंतर अशाच प्रकारचा हिंसाचार झाला होता. त्या निवडणुकीच्या काळामध्ये २ महिने हिंसाचार चालू होता.
- या हिंसाचारामध्ये ११०० लोकांनी प्राण गमावले होते तर सुमारे ६०,००० लोक बेपत्ता झाले होते.
- केन्याटा कुटुंबाने केनियातील सत्ता सर्वाधीक काळ उपभोगली आहे. त्यामुळेही विरोधकांनी देशात बदल घडवण्यासाठी मतदारांना आवाहन केले आहे.
- उहुरु यांचे वडिल जोमो केन्याटा केनियाचे पहिले पंतप्रधान होते. १९६३-६४ या कालावधीत पंतप्रधान झाल्यानंतर जोमो राष्ट्राध्यक्ष झाले. १९६४-१९७८ इतका प्रदिर्घ काळ ते पदावर राहिले.
- त्यांच्यानंतर त्यांच्या जवळचे मानले जाणारे डॅनियल अरॅप मोई अध्यक्ष झाले ते १९७८ ते २००२ इतका मोठा काळ पदावरती होते.
- त्यानंतर जोमो केन्याटांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य व मोई यांच्या काळात उपराष्ट्रपती असणारे म्वाई किबेकी २००२ ते २०१३ या काळासाठी अध्यक्ष झाले.
- त्यानंतर २०१३पासून उहुरु केन्याटा राष्ट्राध्यक्ष आहेत. उहुरु २००३ ते २००७ या कालावधीत विरोधीपक्षनेते होते, तर २००८ ते २०१३ याकाळात ते उपपंतप्रधान होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा