चालू घडामोडी : २१ ऑगस्ट
दुभंगलेल्या अण्णाद्रमुकचे विलीनीकरण
- जयललिता यांच्या निधनानंतर दुभंगलेल्या अण्णाद्रमुकमधील मुख्यमंत्री ई पलानीस्वामी व माजी मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम या गटांचे अखेर विलीनीकरण झाले.
- याशिवाय सरचिटणीस शशिकला यांना पदावरून व पक्षातून दूर करण्याबाबतही या दोन गटांमध्ये एकमत झाले आहे.
- समझोत्याचा भाग म्हणून पन्नीरसेल्वम यांना पक्षाचे निमंत्रक तर ई पलानीसामी सहनिमंत्रक म्हणून नेमण्यात आले आहे.
- याशिवाय पनीरसेल्वम यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह अर्थ खाते, तसेच झोपडपट्टी पुनर्वसन आणि शहर नियोजन ही खाती देण्यात आली आहेत.
- पनीरसेल्वम यांच्याकडे सुकाणू समितीचे अध्यक्षपद दिले जाऊ शकते. त्यामुळे त्यांच्याकडे पक्षांतर्गत अधिकार येतील.
- या समझोत्यानुसार, पलानीस्वामी यांच्याकडे सरकारची, तर पनीरसेल्वम यांच्याकडे पक्षाची धुरा असणार आहे.
- तसेच पलानीस्वामी यांच्या मंत्रिमंडळात पनीरसेल्वम गटाला आणखी मंत्रिपदे मिळणार आहेत.
- दोन्ही गटांमधील समन्वय वाढवण्यासाठी सल्लागार समितीदेखील स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये दोन्ही गटांमधील नेत्यांचा समावेश असेल.
- जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला यांनी पक्षाचा ताबा घेतल्यामुळे आणि पनीरसेल्वम यांना दूर करून पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतल्याने या पक्षात फूट पडली होती.
- शशिकला सरचिटणीस झाल्यानंतर काही काळातच त्यांना बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी शिक्षा झाली. त्या सध्या तुरुंगात आहेत.
- आता पक्षाची बैठक घेऊन व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शशिकला यांची पदावरून व पक्षातून हकालपट्टी केली जाईल.
प्रसिध्द छायाचित्रकार एस. पॉल यांचे निधन
- प्रसिध्द भारतीय छायाचित्रकार एस. पॉल यांचे वयाच्या ८८व्या वर्षी पत्परगंज हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
- एस. पॉल यांचा जन्मदिवस १९ ऑगस्ट भारतात छायाचित्रण दिन म्हणून साजरा केला जातो. ते स्वशिक्षित छायाचित्रकार होते. प्रख्यात छायाचित्रकार रघू राय यांचे ते मोठे बंधू होते.
- आता पाकिस्तानात असलेल्या झांग येथे त्यांचा जन्म झाला. फाळणीनंतर ते कुटुंबासमवेत भारतात आले.
- ते शिक्षणाने अभियंता होते, पण त्यांना पहिली नोकरी शिमल्यात ड्राफ्टस्मनची मिळाली. नंतर ते काही काळ भारतीय रेल्वेचे मुख्य छायाचित्रकार होते.
- १९६० मध्ये त्यांना ‘दी इंडियन एक्स्प्रेस’मध्ये नोकरी मिळाली व तेथे ते मुख्य छायाचित्रकार झाले. त्यांनी छायाचित्र पत्रकारितेची परिभाषा बदलून टाकली.
- पॉल यांच्या कॅमेऱ्याने माणूस व निसर्ग तेवढय़ाच ताकदीने टिपला. कलाकार म्हणून त्यांची सौंदर्यदृष्टी त्यांच्या घरातील प्रत्येक गोष्टीत जाणवत होती.
- छायाचित्रकारापलीकडे त्यांची एक चांगले शिक्षक म्हणून ओळख होती. त्यांनी अनेकांना ही कला शिकवली.
- फॅशन फोटोग्राफी, अॅडव्हर्टायझिंग फोटोग्राफी, स्ट्रीट फोटोग्राफी व फोटो जर्नालिझम (छायाचित्र पत्रकारिता) ही वर्गवारी ते मानत नव्हते.
- ‘ब्रिटिश जर्नल ऑफ फोटोग्राफी’ या नियतकालिकात झळकलेले ते पहिले भारतीय छायाचित्रकार आहेत.
गुगलकडून अँड्रॉईड ओरियो लाँच
- गुगलकडून ‘अँड्रॉईड एन’ (नगेट) नंतर आता ‘अँड्रॉईड ओ’ ही नवी ऑपरेटिंग सिस्टीमचे लाँच करण्यात आले आहे.
- अँड्रॉईडच्या आत्तापर्यंतच्या सिस्टीम्सना खाद्यपदार्थांची नावे देण्यात आली आहेत. त्याच पद्धतीनुसार या सिस्टीमला ‘ओरियो’ नाव देण्यात आले.
- न्यूयॉर्कमध्ये एका मोठ्या कार्यक्रमात ‘अँड्रॉईड ओ’चे लाँचिंग करण्यात आले. गुगलकडून लॉन्च करण्यात आलेली नवी ऑपरेटिंग सिस्टीम अनेकार्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे.
- अँड्रॉईड ओ या सिस्टीममध्ये ‘पिक्चर-इन-पिक्चर मोड’ आणि नोटिफिकेशन डॉट अशी फिचर्स असणार आहेत.
- पिक्चर इन पिक्चर मोडद्वारे आयकॉनच्या डिझाईनमध्ये बदल करता येणार आहेत. याशिवाय नवे इमोजीही उपलब्ध होणार आहेत. तसेच या मोडमध्ये दोन युझर्स एकाचवेळी एक अॅप वापरू शकणार आहेत.
- नोटिफिकेशन डॉटच्या सुविधेमुळे अॅपच्या आयकॉनवर टॅप केल्यानंतर लगेचच नोटिफिकेशनची झलक पाहता येणार आहे.
- उत्तम बॅटरी लाईफ, उत्कृष्ट नोटिफिकेशन सिस्टीम, वायरलेस ऑडिओ फिचर्स हे देखील अँड्रॉईड ओ मध्ये असणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा