चालू घडामोडी : १५ ऑगस्ट
पंतप्रधानांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन चौथ्यांदा भाषण केले आहे. त्यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे
- ३ वर्षात सव्वा लाख कोटींपेक्षा जास्त काळा पैसा बाहेर काढला. नोटाबंदीनंतर ३ लाख कोटी रुपये बँकिंग व्यवस्थेत आले.
- नोटाबंदीनंतर हवाल्याचे काम करणाऱ्या ३ लाख कंपन्या सापडल्या. यातील पावणे दोन लाख कंपन्या रद्द केल्या आहेत.
- न्यू इंडिया संकल्पाची हीच योग्य वेळ आहे. आपण सर्वांना मिळून असे भारत घडवायचा आहे की जेथे गरीबांकडे घर, वीज आणि पाणी उपलब्ध असेल.
- एक असा भारत घडवू जेथे शेतकरी शांततेची झोप घेईल. तरुणवर्ग आणि महिलांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरपूर संधी मिळेल.
- असा भारत निर्माण करु जो दहशतवाद, सांप्रदायिकता आणि जातीयवाद यापासून मुक्त असेल.
- आस्थेच्या नावावर या देशात हिंसा खपवून घेतली जाणार नाही. हिंसेला देश कधीही स्वीकारणार नाही.
- स्वातंत्र्यापूर्वी भारत छोडोचा नारा होता आता भारत जोडोचा नारा आहे.
- देशाच्या सुरक्षेसाठी काहीही करण्यास आम्ही कमी पडणार नाही, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
- स्वातंत्र्य भारतासाठी हे विशेष वर्ष आहे. यंदा ऐतिहासिक चंपारण्य सत्याग्रहाचे १००वे वर्ष आपण साजरे करत आहोत.
- भारत छोडो आंदोलनाचे हे ७५वे वर्ष आहे. लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली होती त्याचेही यंदा १२५वे वर्ष आहे.
- सामूहिक शक्ती, एकीचे बळ ही आपली ताकद आहे. देशात कुणी छोटा नाही, कुणी मोठा नाही, सर्व समान आहे.
- आज देशात इमानदारीचा उत्सव साजरा होत आहे. ज्यांनी देशाला लुटलेल आणि गरिबांना लुटले त्यांची आज झोप उडाली आहे.
- न्यू इंडियाचा संकल्प घेऊन पुढे जायचे आहे. न्यू इंडिया सामर्थ्यशाली, सुरक्षित आणि जगभरात भारताचा दबदबा असणारा असा असेल.
रोनाल्डो पाच सामन्यांसाठी निलंबित
- रिअल माद्रिद फुटबॉल क्लबचा प्रमुख खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोला स्पॅनिश फुटबॉल महासंघाने पाच सामन्यांसाठी निलंबित केले आहे.
- स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेत बार्सिलोना क्लबविरुद्धच्या लढतीत त्याने सामनाधिकाऱ्यांना जोरदार धक्का दिला. त्यामुळे त्याच्यावर ही बंदीची कारवाई करण्यात आली.
- सामन्याच्या दुसऱ्या सत्रात रोनाल्डोने पंच रिकाडरे डी बगरेस बेंगोएत्जी यांच्या निर्णयाविरोधात अती आक्रमकता दाखवली आणि त्यांना धक्काही दिला.
- या लढतीत लाल कार्ड दाखवण्यात आल्यामुळे त्याच्यावर एका सामन्यांची बंदी होतीच आणि त्यात चार सामन्यांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
- या बंदीबरोबरच रोनाल्डोला ४ हजार ५०० अमेरिकन डॉलरचा दंडही भरण्यास सांगितला आहे. या निर्णयाविरोधात रोनाल्डो १० दिवसांत दाद मागू शकतो.
- या सामन्यात रिअल माद्रिदने ३-१ असा विजय मिळवला आहे. मात्र, बंदी उठली नाही तर परतीच्या लढतीत रिअल माद्रिदला रोनाल्डोशिवाय खेळावे लागणार आहे.
वादग्रस्त ब्लू व्हेल गेमवर बंदी
- वादग्रस्त मोबाईल गेम ‘ब्लू व्हेल’च्या सर्व लिंक हटवण्याचे निर्देश केंद्र सरकारने फेसबुक, गूगल, व्हॉट्स अॅप आणि अन्य सोशल नेटवर्किंग साईट्सला दिले आहेत.
- भारतात ब्लू व्हेल गेममुळे लहान मुलांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने असे निर्देश दिले आहेत.
- मुंबईत ब्लू व्हेल चॅलेंज या गेममुळे मनप्रीत सहानी या अल्पवयीन मुलाने ३० जुलैला सात मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती.
- मनप्रीत हा ब्लू व्हेलचा भारतातील पहिला बळी होता. यानंतर इतर राज्यातही याप्रकारच्या घटना घडल्याचे समोर आले.
- या घटनांच्या पार्श्वभूमीवर या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या गेमवर बंदी घालण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे.
- राज्यातील विधानसभेपासून ते दिल्लीत संसदेपर्यंत या गेमवर बंदीची मागणी करण्यात आली होती.
- त्यामुळे माहिती व प्रसारण मंत्रालयाने गूगल, फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम, याहू, मायक्रोसॉफ्ट अशा सर्व कंपन्यांना एक पत्रक पाठवले.
- त्यानुसार या गेमशी संबंधीत सर्व लिंक तात्काळ हटवाव्यात असे निर्देश या सोशल नेटवर्किंग साईट्सला केंद्र सरकारने दिले आहेत.
- ब्लू व्हेल गेम ५० दिवसांच्या आव्हानांचा असून तो रशियात तयार झाला असून या गेममुळे रशियात १३० जणांनी प्राण गमावले.
- २०१३साली रशियात फिलिप ब्यूडेइकिन याने या गेमची निर्मिती केली असून त्याला गेल्या नोव्हेंबरमध्ये अटकही करण्यात आली होती.
- या गेमचे अॅडमिनिस्ट्रेटर ऑनलाइन मंच वापरून लोकांना वेगवेगळी आव्हाने करायला देतात. ज्यामध्ये सर्वात शेवटी खेळणाऱ्याला आत्महत्या करण्याचे आव्हान दिले जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा