चालू घडामोडी : २० ऑगस्ट
दिल्लीला मिळणार वॉशिंग्टनप्रमाणे सुरक्षा कवच
- भारताची राजधानी असलेल्या दिल्लीला लवकरच अमेरिकेकडून वॉशिंग्टन डीसीप्रमाणे सुरक्षा कवच मिळणार आहे.
- केंद्र सरकारतर्फे लवकरच ‘नॅशनल अॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल’ चा उपयोग दिल्लीच्या सुरक्षेसाठी करण्यात येणार आहे.
- सध्या चीन आणि पाकिस्तानसोबत भारताचे संबंध तणावाचे आहेत. चीनने वारंवार युद्धाची धमकी दिली आहे आणि पाकिस्तान दहशतवादी कारवाया करण्यात आघाडीवर आहे.
- त्यामुळे राजधानी दिल्लीला एका सबळ हवाई सुरक्षा व्यवस्थेची आवश्यकता निर्माण झाली आहे.
- ही गरज लक्षात घेऊनच ‘नॅशनल अॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल’चा वापर दिल्लीच्या सुरक्षेसाठी करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते आहे.
- राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर महत्त्वाच्या व्यक्ती यांच्यावर क्रूझ मिसाईल, ड्रोन किंवा एअरक्राफ्टद्वारे हल्ला झाला तर या हल्ल्यांपासून संरक्षण व्हावे यासाठी या यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे.
- अमेरिकेच्या नास्मस या कंपनीने भारतीय वायुदल आणि इतर सरकारी एजन्सींना या यंत्रणेचं प्रेझेंटेशन दिलं आहे.
- अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन डीसी या शहराच्या सुरक्षेची जबाबदारीही २००५पासून नास्मस या कंपनीकडे आहे.
- याशिवाय स्पेन, नेदरलँड, नॉर्वे आणि फिनलँड या देशांच्या सुरक्षेतही नास्मस या कंपनीचे मोठे योगदान आहे.
- शत्रूने एअरक्राफ्ट, ड्रोन किंवा मिसाईल यांच्या मार्फत हल्ला करण्याआधीच नास्मस कंपनीची यंत्रणा त्याचे अस्तित्त्व हवेतच संपवून टाकते.
किशोर डांगे जागतिक पोलीस स्पर्धेत रौप्यपदक
- किशोर डांगे या शरीरसौष्ठवपटूने लॉस एंजिल्स येथे झालेल्या जागतिक पोलीस स्पर्धेत रौप्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
- जालना पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या किशोर डांगे याने हे रौप्यपदक ३४ वर्षांखालील १०० किलो वजन गटात जिंकले.
- या स्पर्धेत मलेशियाच्या खेळाडूने सुवर्ण तर अमेरिकेच्या खेळाडूने कास्यपदक पटकावले.
- जागतिक पोलीस स्पर्धेतील किशोरचे हे दुसरे पदक आहे. याआधी त्याने २०१३ मध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
- दुबई क्लासिक शरीरसौष्ठव स्पर्धेत त्याने रौप्यपदक, तर सौदीमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तसेच महाराष्ट्र श्री, मराठवाडा श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत विविध पदके जिंकली आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा