चालू घडामोडी : २७ ऑगस्ट

औरंगाबाद खंडपीठाला ३६ वर्षे पूर्ण

  • २७ ऑगस्ट १९८१ला स्थापन झालेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाला ३६ वर्षे पूर्ण होऊन ३७वे वर्ष सुरू झाले आहे.
  • अखंड महाराष्ट्राच्या स्थापनपूर्वी मराठवाडा आणि विदर्भातील मराठी भाषकांनी २३ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर करार केला होता. त्यामध्ये खंडपीठ स्थापनेसंबंधी प्रथमतः उल्लेख करण्यात आला होता.
  • १९५६साली मराठवाडा विकास परिषदेच्या वतीने गोविंदभाई श्रॉफ यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांनी केलेल्या मागण्यांमध्ये औरंगाबादेत खंडपीठ स्थापनेची प्रमुख मागणी होती.
  • १९५६साली स्वामी रामानंद तीर्थ यांनी गोविंदभार्इंना लिहिलेल्या पत्रात खंडपीठ स्थापनेचा उल्लेख आहे.
  • याप्रमाणे खंडपीठ स्थापनेसाठी १९५२पासून इतिहास आहे व खंडपीठ स्थापनेस अनेक मान्यवर व्यक्ती व सर्व जनतेनचा सहभाग आहे.
  • महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. अंतुले, मुख्य न्यायाधीश व्ही एस देशपांडे यांनी खंडपीठ स्थापनेसाठी विशेष प्रयत्न केले.
  • आजरोजी या खंडपीठाचे कार्यक्षेत्र हे औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार असे १३ जिल्ह्यांचे आहे.
  • सध्या औरंगाबाद खंडपीठात १८ न्यायमूर्ती, तर १,५०० पेक्षा जास्त वकील कार्य करीत आहेत.

यिंगलुक शिनावात्रा यांचे थायलंडमधून पलायन

  • न्यायालयाची कारवाई आणि संभाव्य कारावास टाळण्यासाठी थायलंडच्या माजी पंतप्रधान यिंगलुक शिनावात्रा यांनी देशातून पलायन केले आहे.
  • त्या सिंगापूरमार्गे दुबईला पळून गेल्याचे स्पष्ट झाले आहे. दुबईमध्ये त्यांचे बंधू आणि थायलंडचे माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांनीही आश्रय घेतला आहे.
  • थाकसिन हे यिंगलुक यांचे लहान बंधू आहेत. ते मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लबचे मालक आहेत. त्यांनीच यिंगलुक यांच्या पलायनाची योजना आखली होती.
  • परंतु यिंगलुक यांच्यासाठी दुबई हा अंतिम मुक्काम नाही. आता त्या इंग्लंडकडे आश्रय देण्याची विनंती करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
  • शिनावात्रा यांचे कुटुंब वर्ष २००१पासून थायलंडच्या राजकीय वर्तुळात वरचढ झाले. गेली १६ वर्षे शिनावात्रा कुटुंब थायलंडच्या सत्तेशी संबंधित होते.
  • थाकसिन यांचे सरकार २००६ साली झालेल्या बंडामुळे पाडण्यात आले. त्यानंतर न्यायालयाची कारवाई टाळण्यासाठी थाकसिन २००८ साली दुबईला पळून गेले.
  • यिंगलुक शिनावात्रा यांचे सरकारदेखील २३ मे २०१४ रोजी झालेल्या बंडात पाडण्यात आले होते.
  • सुमारे ३ वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर थायलंडच्या न्यायालयाने शिनावत्रा यांना सत्तेचा गैरवापर, भ्रष्टाचार इत्यादी आरोपांवरून सत्ता सोडण्याचा आदेश दिला होता.
  • यिंगलुक यांना १० वर्षे कारावास होण्याची शक्यता बोलून दाखवली जात होती. त्यांच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या वाणिज्यमंत्र्यांना ४२ वर्षांचा कारावास ठोठावण्यात आला.
  • यिंगलुक शिनावात्रा या सध्या ५० वर्षांच्या आहेत. २०११ साली त्या देशाच्या २८व्या पंतप्रधान म्हणून निवडल्या गेल्या होत्या.
  • थायलंडच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि गेल्या साठ वर्षातील थायलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा मान त्यांना मिळाला.
  • यिंगलुक यांना देशातील गरीब जनतेमधून मोठा पाठिंबा मिळाला होता. त्यांच्यासाठी यिंगलुक यांनी तांदुळ पुरवठ्याची योजना अंमलात आणली होती.
  • या योजनेमुळे देशाचे ८ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचे तेथील सध्याच्या लष्करी सरकारने म्हटले आहे.

समलिंगी व्यक्तींना अमेरिकी लष्करात बंदी

  • लष्करात तृतीयपंथींना भरती करण्याचा ओबामा यांचा आदेश विद्यमान अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फिरवला असून, समलिंगी व्यक्तींना लष्करात भरती करण्यास बंदी घातली आहे.
  • बंदी आदेशाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू करण्याची योजना २१ फेब्रुवारी २०१८ पर्यंत पेंटॅगॉनने जाहीर करावी व २३ मार्च २०१८ पासून लागू करावी असे सांगण्यात आले आहे.
  • ही सैनिकांबाबत क्रूरता असून त्यामुळे त्यांचे खच्चीकरणही होणार आहे अशा शब्दांत विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाने या निर्णयावर टीका केली आहे.
  • अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामांनी जून २०१६ मध्ये समलिंगी व्यक्तींना लष्करात प्रवेश देण्याचे धोरण जाहीर केले होते. त्यानुसार लिंगबदल शस्त्रक्रियांना परवानगीही देण्यात आली होती.

फ्लॉयड मेवेदरचा ऐतिहासिक विजय

  • निवृत्तीनंतर दोन वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या ४० वर्षीय फ्लॉयड मेवेदरने बॉक्सिंग जगतातील सर्वात महागडा सामना जिंकला आहे.
  • आपल्या व्यावसायिक बॉक्सिंग कारकिर्दीत एकही सामना न गमावणाऱ्या मेवेदरने २९ वर्षीय आयरिश बॉक्सर कोनोर मॅक्ग्रेगॉरला १०व्या फेरीत नॉक आऊट केले.
  • लास वेगासच्या टी-मोबाईल अरिनामध्ये मेवेदरने कोनोर मॅक्ग्रेगॉरचा पराभव करत कारकिर्दीतील ५०वा सामना जिंकला. मेवेदरने आतापर्यंत ५० पैकी २७ बाऊट नॉकआऊटमध्ये जिंकल्या आहेत.
  • या सामन्यावर ६०० मिलियन डॉलरचा म्हणजेच ३ हजार ८३२ कोटी रुपयांचा सट्टा लागला होता. हा सामना बघण्यासाठी सुमारे २० हजार प्रेक्षक उपस्थित होते.
  • या सामन्याच्या तिकिटाची किंमत १०० डॉलर ते २५० डॉलर (६४०० रुपये ते १६ हजार रुपये) इतकी होती. या सामन्याला प्रेक्षकांची १०० टक्के उपस्थिती होती.
  • मेवेदर १२ सप्टेंबर २०१५ रोजी शेवटचा सामना खेळला होता. २ हजार ७०० कोटींची मालमत्ता असलेला मेवेदर जगातील सर्वात श्रीमंत अॅथलीट आहे.
  • जगातील सर्वात महागड्या बॉक्सिंग सामन्याचे सामन्याचे थेट प्रक्षेपण २०० हून अधिक देशांमध्ये करण्यात आले. जगभरात १ अब्ज लोकांनी या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहिले.
  • २०१५ मध्ये मेनी पेकियाओचा पराभव करुन मेवेदरने वेल्टरवेट किताब पटकावला होता. मात्र जागतिक बॉक्सिंग संघटनेने त्याच्याकडून हा किताब हिसकावून घेतला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा