चालू घडामोडी : २८ व २९ ऑगस्ट

इस्रोद्वारे स्क्रॅमजेट इंजिनाची यशस्वी चाचणी

 • भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) २८ ऑगस्ट रोजी स्वदेशी बनावटीच्या स्क्रॅमजेट इंजिनाची यशस्वी चाचणी घेतली.
 • ‘इस्रो‘च्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून या स्क्रॅमजेट इंजिनाची चाचणी घेण्यात आली.
 • पुन्हा वापरता येणाऱ्या प्रक्षेपकाची निर्मिती आणि उपग्रह प्रक्षेपणावरील खर्चात मोठी कपात करण्यासाठी अशा प्रकारच्या इंजिनाची आवश्यकता आहे.
 • भारतीय बनावटीचे स्क्रॅमजेट इंजिन असलेल्या आरएच ५६० रॉकेटद्वारे ही चाचणी घेण्यात आली.
 • पूर्नवापरायोग्य आरएलव्ही ५६० रॉकेटमध्ये वापरण्यासाठी स्क्रॉमजेट इंजिनाची निर्मिती तिरुअनंतपुरम येथील विक्रम साराभाई अवकाश केंद्रामध्ये करण्यात आली आहे.
 • स्क्रॅमजेट इंजिन वातावरणातील ऑक्सिजनच्या मदतीने इंजिनातील इंधन प्रज्वलित करते. 
 • यानाच्या पारंपारीक इंजिनामध्ये इंधन आणि ऑक्सिडायजर दोन्ही असते. इथे स्क्रॅमजेट इंजिनमध्ये वातावरणातील ऑक्सिजन यानातील इंधन प्रज्वलित करण्यासाठी ऑक्सिडायजरचे काम करणार आहे.
 • संबंधित चाचणी २८ जुलै रोजीच घेण्यात येणार होती. मात्र, भारतीय हवाईदलाचे मालवाहू विमान बेपत्ता झाल्यानंतर सुरू झालेल्या शोधमोहिमेमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती.

सुगम्य भारत अभियान

 • देशातील २६ कोटी अपंग जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘सुगम्य भारत अभियान’ सुरू केले आहे.
 • ३ डिसेंबर २०१५ या आंतरराष्ट्रीय अंपग दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या समाजकल्याण आणि सबलीकरण विभागामार्फत हे देशव्यापी अभियान सुरू करण्यात आले.
 • टप्प्याटप्प्याने राबविल्या जाणाऱ्या या अभियानातील पहिल्या टप्प्यात देशातील ५० शहरांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक या चार शहरांचा समावेश झाला आहे.
 • याअंतर्गत या शहरांतील सर्व शासकीय इमारतींमध्ये अपंगांसाठी किती सोयीसुविधा उपलब्ध आहेत, याचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश केंद्राने राज्य सरकारला दिले आहेत.
 • अपंगांना येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी, त्यांच्या प्रती असलेली लोकांची मानसिकता दूर करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातील, या संदर्भातील माहिती या कृती आराखड्याद्वारे सरकारला सादर करायची आहे. 
 • समाजातील दुर्बल, दुर्लक्षित अपंगांच्या जीवनातील अंधकार दूर करून त्यांना समाजात मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
 • आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रात यांनी पुढे येण्यासाठी सरकारने पावले उचण्याच्या दृष्टीने देशात सुगम्य भारत अभियान राबविले जात आहे.

सानिया मिर्झाला कनेक्टिकट ओपनचे विजेतेपद

 • भारताच्या सानिया मिर्झा हिने रोमानियाच्या मोनिका निकुलेस्कूच्या साथीत कनेक्टिकट ओपन टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
 • सानियाने तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. तसेच, सानियाचे हे मोसमातील सातवे आणि एकूण ३९वे विजेतेपद ठरले.
 • सानियाने मोनिकाच्या साथीने मिळविलेले हे पहिलेच जेतेपद ठरले.
 • अंतिम लढतीत सानिया-मोनिका या जोडीने कॅटरीना बोंडारेन्को आणि चिआ-जुंग चुआंग या जोडीवर ७-५, ६-४ अशी मात करत विजेतेपद पटकावले.
 • यापूर्वी सानिया-मोनिका या २०१०मध्ये एकत्र खेळल्या होत्या. त्या वेळी त्यांनी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.
 • गेल्या आठवडय़ात चेक प्रजासत्ताकच्या बाबरेरा स्ट्रायकोव्हासोबत सानियाने सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले आहे.

पेस-बेगमन जोडीला विन्स्टन-सालेम ओपनचे उपविजेतेपद

 • भारताचा लिअँडर पेस आणि त्याचा जर्मनीचा जोडीदार आंद्रे बेगमन यांना एटीपी विन्स्टन-सालेम ओपन टेनिस स्पर्धेच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
 • गुलेर्मो गार्सिया-लोपेझ (स्पेन) आणि हेन्री कोंटिनेन जोडीने पेस-बेगमन जोडीचा ४-६, ७-६ , १०-८ असा पराभव केला आणि पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवले.
 • या बरोबरच ४३ वर्षीय पेसचे एटीपी वर्ल्ड टूरचा कारकिर्दीतील ५६वा किताब पटकावण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा