उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळल्यामुळे ऑलिम्पिकमध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आलेला कुस्तीपटू नरसिंग यादव याला नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी अर्थात 'नाडा'ने नरसिंगला क्लीन चीट देत त्यांच्यावरील बंदी मागे घेतली.
त्यामुळे रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचा नरसिंगचा मार्ग मोकळा झाला आहे.
यापूर्वी नाडाने घेतलेल्या डोपिंग चाचणीत नरसिंगच्या रक्तात प्रतिबंधित स्टेरॉईडचा अंश आढळून आला होता.
आपल्या खाण्यात कुणीतरी भेसळ केल्याचा आरोप त्याने केला होता. त्याच्या या आरोपांची शहानिशा करण्यासाठी 'नाडा'ने समिती नेमली होती. संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर 'नाडा'ने नरसिंगला आरोपमुक्त केले.
नरसिंग हा प्रतिस्पर्ध्यांच्या कारस्थानाचा बळी ठरला होता. त्यानं स्वत:हून काहीही चुकीचं केलेलं नाही, असे 'नाडा'ने स्पष्ट केले.
चीनकडून अणवस्त्रप्रसार बंदीच्या नियमांचे उल्लंघन
अणवस्त्र प्रसारबंदीच्या प्रगतीचा आढावा घेताना आयएईएने (आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा संस्था) तयार केलेल्या अहवालात, चीनने पाकिस्तानला अणूभट्टया देऊन अणवस्त्रप्रसार बंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.
चीनने २०१३ मध्ये पाकिस्तानला चष्मा ३ रिअॅक्टर देण्याचा करार केला. चीनने असे करुन अणवस्त्र तंत्रज्ञान पुरवठयासंबंधी अणवस्त्र प्रसारबंदी परिषदेत (एनपीटी) २०१०मध्ये एकमताने ठरलेल्या नियमाचे उल्लंघन केले आहे.
एनपीटी परिषदेत आयएईएच्या दिशा-निर्देशांचे पालन करणाऱ्या देशालाच अणवस्त्र तंत्रज्ञान देण्याचे एकमताने ठरवण्यात आले होते. परंतु पाकिस्तान आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा संस्थेच्या (IAEA) दिशा-निर्देशांनुसार काम करत नाही.
एनपीटी करारवर स्वाक्षरी केलेले १८७ देश नागरी उद्देशासाठी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (आयएईए) मार्गदर्शनाखाली अणुऊर्जेची निर्मिती आणि वापर करू शकतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा