चालू घडामोडी : ३ ऑगस्ट
सुधारित बालकामगार कायदा मंजूर
- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बालकामगार कायद्यातील तरतुदींना मंजुरी दिल्यानंतर लागलीच सुधारित बालकामगार विधेयक संसदेमध्ये ठेवून त्याला मंजुरी देण्यात आली.
- या सुधारणेनुसार १४ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या बालकामगारांना कामावर ठेवल्यास सहा महिने ते दोन वर्षांपर्यंतचा कारावास, तसेच वीस ते पन्नास हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
- या आधी या गुन्ह्यांतर्गत तीन महिने ते एक वर्षाचा कारावास, तर दंडाची रक्कम दहा हजारांपासून वीस हजारांपर्यंत होती.
- कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कडक शिक्षेची तरतूद करण्यात आल्याने बालकामगार ठेवण्यावर प्रतिबंध लागण्यास बऱ्याच अंशी यश मिळणार आहे.
- कौटुंबिक उद्योगांमध्ये (जोखमीचे किंवा धोकादायक कामे वगळून) शाळेच्या वेळेव्यतिरिक्त किंवा सुटीच्या दिवशी काम करणाऱ्या बालकांना या कायद्यामधून वगळण्यात आले आहे.
- तसेच जी मुले जाहिरात, टेलिव्हिजन कार्यक्रम किंवा यांसारख्या कोणत्याही मनोरंजनात्मक कार्यक्रमात, तसेच सर्कस सोडून कोणत्याही खेळामध्ये सामील असणाऱ्या मुलांना या कायद्यातून सूट देण्यात आली आहे.
उत्तर कोरियाकडून आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी
- उत्तर कोरियाने आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. जपानी सागराच्या दिशेने त्यांनी क्षेपणास्त्र सोडले.
- उत्तर कोरियातील उनयुल शहरातून सकाळी हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. या क्षेपणास्त्राने ६२१ मैल म्हणजे १००० किलोमीटर अंतर पार केले. ते मध्यम पल्ल्याचे रोडाँग क्षेपणास्त्र होते.
- उ. कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी आतापर्यंत ३०० ते १००० कि.मी पल्ल्याची १६ स्कड क्षेपणास्त्रे, ६ रोडाँग क्षेपणास्त्रे, ६ मुसुदान क्षेपणास्त्रे (४००० कि.मी पल्ला), पाणबुडीवरची तीन क्षेपणास्त्रे यांच्या चाचण्या केल्या आहेत.
- दक्षिण कोरियामध्ये अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण व्यवस्था बसविण्याच्या अमेरिकेच्या योजनेविरुध्द उत्तर कोरियाने हे प्रक्षोभक कृत्य केले आहे.
- संयुक्त राष्ट्रसंघाने संमत केलेल्या ठरावाद्वारे उत्तर कोरियावर क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम राबविण्यासंदर्भात बंदी घालण्यात आली आहे.
जोकोव्हिच टोरँटो मास्टर्स स्पर्धेत विजयी
- सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने एटीपी टोरँटो मास्टर्स टेनिस स्पर्धेत जपानच्या केई निशिकोरीवर ६-३, ७-५ असा विजय मिळवून कारकीर्दीतले ६६वे जेतेपद पटकावले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा