मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्या. मंजुळा चेल्लुर
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. जे. वाघेला १० ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाल्यावर या पदावर कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशमंजुळा चेल्लुर यांची नियुक्ती करण्यात आली.
न्या. चेल्लुर या मुंबई उच्च न्यायालयाच्या ४१व्या मुख्य न्यायाधीश असतील. त्या २४ ऑगस्टपासून पदभार स्वीकारतील.
मुंबई हायकोर्टाच्या १५० वर्षांच्या इतिहासातील त्या दुसऱ्या महिला मुख्य न्यायाधीश असणार आहेत. त्यांच्यापूर्वी १९९४मध्ये निवृत्त न्या. सुजाता मनोहर यांनी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद भूषविले होते.
न्या. चेल्लुर यांचा जन्म १९५५मध्ये कर्नाटकमधील बेल्लरी गावात झाला. त्यांनी १९७७मध्ये कायद्यात पदवी घेतली.
१९८८पासून त्यांनी जिल्हा न्यायाधीश म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांनी १० वर्षे वकिली केली.
२००० मध्ये त्यांची कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर केरळ उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले.
तेथून २०१४मध्ये त्यांची बदली कोलकाता उच्च न्यायालयात करण्यात आली. बेल्लरीमधील त्या पहिल्या महिला वकील आणि परदेशी जाऊन शिक्षण घेणाऱ्या पहिल्याच महिला ठरल्या.
बिहार विधानसभेची जीएसटीला मंजुरी
आसामपाठोपाठ आता बिहार विधानसभेने वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) घटनादुरुस्ती विधेयकास सार्वमताने मंजुरी दिली आहे.
जीएसटी विधेयकावर चर्चा करण्यासाठी बिहार विधानसभेत एकदिवसीय सत्र आयोजित करण्यात आले होते.
राज्यातील सत्ताधारी पक्ष जदयू, आरजेडी आणि काँग्रेसने विधेयकास पाठिंबा दिला. परंतु मार्क्सवादी-लेनिनवादी पक्षाच्या सदस्यांनी विधेयकाला तीव्र विरोध करत सभागृहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
जीएसटी विधेयक राज्यासाठी तसेच केंद्रासाठी फायदेशीर असल्याचे मत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यावेळी व्यक्त केले.
जीएसटीचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर बिहारला अंदाजे आठ ते नऊ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आतापर्यंत दोन विधानसभांनी या विधेयकास मंजुरी दिली आहे. एकुण २९ पैकी किमान १५ राज्यांनी या विधेयकास मंजुरी देणे गरजेचे आहे.
विकास क्रिशनचे आव्हान संपुष्टात
रिओ ऑलिंपिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत भारताचा बॉक्सर विकास क्रिशनला उझबेकिस्तानचा बॉक्सर मेलिकुझिव बेक्तेमीर याने ३-० असे सहज पराभूत केले.
या पराभवामुळे शिवा थापा, मनोज कुमार यांच्यानंतर आता विकासचे रिओ २०१६मधील आव्हान संपुष्टात आले आहे.
२००८ बिजींग ऑलिंपिकमध्ये विजेंदरसिंगने भारताला ब्राँझपदक मिळवून दिले होते तर, २०१२ लंडन ऑलिंपिकमध्ये मेरी कोमने ब्राँझपदक मिळविले होते.
ललिता बाबर पराभूत
ललिता बाबरला ऑलिंपिक ऍथलेटिक्स स्पर्धेतील ३ हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत दहाव्या क्रमांकावरच समाधान मानावे लागले.
ऑलिंपिक ऍथलेटिक्समधील धावण्याच्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारी भारताची केवळ दुसरी महिला ठरलेल्या ललितास प्राथमिक शर्यतीतील वेळ अंतिम फेरीत देता आली नाही.
तिने प्राथमिक शर्यतीत ९ मिनिटे १९.७६ सेकंद वेळ दिली, तर अंतिम फेरीत ९ मिनिटे २२.७४ सेकंद लागले.
बहारीनच्या रुथ जेबट हिने ८ मिनिटे ५९.७५ सेकंद वेळेत शर्यत पूर्ण करीत सुवर्णपदक जिंकले. केनियाच्या हाविन जेपकेमोई हिने रौप्य पदक जिंकले.
बीजिंग येथे गतवर्षी जागतिक स्पर्धेत ललिताला आठवे स्थान मिळाले होते. त्या वेळी तिने ९ मिनिटे २७.८६ सेकंद अशी वेळ नोंदवली होती.
ऑलिम्पिकमधील नरसिंगच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह
नरसिंग यादवला निर्दोष ठरवण्याच्या राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या (नाडा) शिस्तपालन समितीच्या निर्णयास जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (वाडा) क्रीडा लवादाकडे आव्हान दिले आहे.
त्यामुळे रिओ ऑलिम्पिकमधील नरसिंगच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लवादापुढील सुनावणी १८ ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. नरसिंगची ऑलिंपिकमधील लढत १९ ऑगस्टला आहे.
२५ जून व ५ जुलै रोजी झालेल्या दोन्ही चाचण्यांमध्ये नरसिंग दोषी आढळला होता. मात्र, नाडाच्या शिस्तपालन समितीने नरसिंगला निर्दोष ठरवले होते
नाडाने दिलेली क्लिन चीट वाडाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे नरसिंग यादववर असलेली ४ वर्षांची बंदी यापुढेही कायम राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अँडी मरेला कारकिर्दीतील दुसरे सुवर्णपदक
इंग्लंडचा टेनिसपटू अँडी मरेने ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत दुसरे सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला आहे.
रोमांचक झालेल्या अंतिम फेरीत मरेने अर्जेटिनाच्या ज्युआन मार्टिन डेल पोट्रोवर ७-५, ४-६, ६-२, ७-५ असा विजय मिळवत सुवर्णपदका जिंकले.
यापूर्वी मरेने २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.
कांस्यपदकाच्या लढतीत स्पेनच्या राफेल नदालला पराभूत करून केई निशिकोरीने जपानला टेनिसमधील शतकातले पहिले पदक मिळवून दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा