प्रख्यात अर्थतज्ज्ञ उर्जित पटेल यांची रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या गर्व्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
रिझर्व्ह बॅंकेचे विद्यमान गव्हर्नर रघुराम राजन यांचा कार्यकाळ येत्या ४ सप्टेंबर रोजी संपुष्टात येत आहे.
उर्जित पटेल २०१३पासून रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर होते. यंदाच्या जानेवारीमध्येच त्यांची तीन वर्षांसाठी पुनर्नियुक्ती करण्यात आली होती.
पटेल यांनी २०१३पासून वित्तीय धोरण ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पटेल हे रिझर्व्ह बॅंकेचे २४वे गव्हर्नर असतील.
पटेल यांनी १९८६मध्ये हार्वर्डमधून एम.फिल., तर १९९०मध्ये येल विद्यापीठातून अर्थशास्त्रामध्ये पीएचडी केली आहे.
१९९० ते १९९५ या कालावधीमध्ये पटेल यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये अमेरिका, भारत, बहामा आणि म्यानमार या ‘डेस्क’वर काम केले आहे.
त्यानंतर केंद्रीय अर्थ विभागाचे सल्लागार म्हणून त्यांनी १९९८ ते २००१ या काळात काम पाहिले.
उर्जित यांनी आधी बोस्टन कंसल्टिंग ग्रुप आणि रिलायन्स इंडस्ट्रीज सोबत काम केले आहे.
रघुराम राजन आणि उर्जित पटेल यांनी वॉशिंग्टन येथे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये (आयएमएफ) एकत्र काम केले आहे.
पासिघाट विमानतळ देशाला अर्पण
सुखोई ३० सारख्या लढाऊ विमानांसाठी योग्य असलेल्या अरुणाचल प्रदेशमधील पासिघाट हे अत्याधुनिक विमानतळ देशाला अर्पण करण्यात आले.
तेजपूर आणि चबुआ येथील विमानतळांप्रमाणेच येथील विमानतळावरही सर्व प्रकारची विमाने आणि हेलिकॉप्टर उतरू शकतील.
या विमानतळामुळे पूर्व सीमेवरील विविध मोहिमांमध्ये कार्यक्षमता वाढणार असून, हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणा, सुरक्षेचे विविध उपाय यामुळे हवाई वाहतुकीची क्षमताही वाढणार आहे.
चीनच्या सीमेवरील या विमानतळामुळे भारताच्या लष्कराला मोठे बळ मिळाले आहे.
उसेन बोल्टची सुवर्णपदकांच्या हॅट्रीकची हॅट्रीक
जमैकाच्या उसेन बोल्टने रिओ ऑलिम्पिकमध्ये ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने आणखी एक सुवर्णपदक पटकाविले.
उसेन बोल्ट, योहान ब्लेक, निकेल अॅशमेडे आणि असाफा पॉवेल या जमैकाच्या धावपटूंनी ३७.२७ सेकंदांत ही शर्यत पूर्ण केली.
जपानच्या टीमने ३७.६० सेकंदांत अंतर पार करत रौप्यपदक तर कॅनडाच्या टीमने ब्राँझपदक जिंकले.
या सुवर्णपदकासोबतच सलग तीन ऑलिम्पिकमध्ये तीन सुवर्णपदके जिंकणारा उसेल बोल्ट पहिलाच अॅथलिट ठरला आहे.
बोल्टने बीजिंग (२००८), लंडन (२०१२) आणि रिओ (२०१६) ऑलिम्पिकमध्ये १०० मीटर, २०० मीटर आणि ४ बाय १०० मीटरचे सुवर्णपदक जिंकण्याचा विक्रम केला आहे.
उसेन बोल्टच्या खात्यात तीन ऑलिम्पिकमध्ये नऊ सुवर्णपदके जमा झाली आहेत. तसेच नऊ सुवर्णपदके जिकंणारा उसेन बोल्ट चौथा खेळाडू ठरला आहे.
अर्जेंटिनाचे पहिले हॉकी सुवर्णपदक
अर्जेंटिनाने रिओ ऑलिम्पिकच्या पुरुष हॉकीच्या अंतिम लढतीत बेल्जियमचा ४-२ असा पराभव करीत ऑलिम्पिक इतिहासात प्रथमच सुवर्णपदक जिंकले.
याआधी अर्जेंटिनाचा संघ कधीही ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरी अथवा अंतिम फेरीत पोहोचू शकला नव्हता.
रिओ ऑलिम्पिकमध्ये अर्जेंटिनाला फक्त भारताकडूनच पराभवाचा सामना करावा लागला होता.
त्यानंतर या संघाने शानदार कामगिरी करताना गत चॅम्पियन जर्मनीचे आव्हान ५-२ ने परतवून लावत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
या पराभवामुळे बेल्जियमला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कास्यपदकाच्या लढतीत जर्मनीने हॉलंडचा पराभव करीत कास्यपदक जिंकले.
मोदींच्या सूटची गिनीज बुकमध्ये नोंद
पंतप्रधान नरेद्र मोदी यांचा स्वत:चं नाव असलेल्या वादग्रस्त सूट जगात सर्वात महागडा सूट ठरला असून त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली आहे.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं या सुटाला जगातील सर्वात महागडा सूट असल्याची मान्यता दिली आहे.
गुजरातचे हिरे व्यापारी हितेश लालजीभाई पटेल यांनी १३ लाखांत तयार झालेला हा सूट फेब्रुवारी २०१५ला ४ कोटी ३१ लाख रूपयांना खरेदी केला होता.
सुटाच्या लिलावाद्वारे मिळालेली ही रक्कम स्वच्छ गंगा अभियानासाठी देणगी स्वरूपात देण्यात आली होती.
अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा भारत दौऱ्यावर आले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा सूट परिधान केला होता.
नेटपॅकची वैधता वाढविण्यास ट्रायची मान्यता
दृष्टीने दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नेटपॅकची वैधता ३६५ दिवसांपर्यंत वाढविण्यास मान्यता दिली आहे.
ट्रायच्या नियमानुसार सध्या केवळ जास्तीत जास्त ९० दिवसांपर्यंतची वैधता असलेले विविध नेटपॅक्स उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रीपेड ग्राहकांना ९० दिवसांतून किमान एकदा रिचार्ज करणे अनिवार्य होते.
त्यामुळे ट्रायने टेलिकॉम दूरसंचार ग्राहक नियमन कायद्यात (टीसीपीआर) दुरुस्ती करत ही वैधता ३६५ दिवसांपर्यंत वाढविली आहे.
नव्या ग्राहकांना आकर्षित करणे आणि सध्याच्या ग्राहकांना इंटरनेट वापरास प्रोत्साहन देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा