चालू घडामोडी : ३० सप्टेंबर

भारताला आशिया कप हॉकी स्पर्धेचे जेतेपद

  • अखेरच्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे भारताने बांगलादेशावर ५-४ अशी मात करत १८ वर्षांखालील आशिया कप हॉकी स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
  • स्पर्धेच्या साखळी सामन्यात यजमान बांगलादेशने अखेरच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या लढतीत भारतावर अशाच फरकाने विजय मिळवला होता.
  • भारताने आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ३-१ असे पराभूत करीत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.
  • भारताने दुसऱ्यांदा या स्पर्धेचे जेतेपद पटकाविले आहे. यापूर्वी २००१मध्ये भारताने विजेतेपद पटकाविले होते.
  • सामन्याच्या ६९व्या मिनिटाला भारताच्या अभिषेकने भारतासाठी पाचवा गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
  • हार्दिकसिंग या सामन्याचा सामनावीर ठरला, तर भारताचा पंकजकुमार रजकला सर्वोत्तम गोलरक्षकाचा मान मिळाला.

बिहारचा दारूबंदी निर्णय बेकायदा

  • बिहारमध्ये नितीशकुमार सरकारच्या दारूबंदी निर्णयाला पाटणा सर्वोच्च न्यायालयाने बेकायदा ठरवले आहे.
  • बिहारमध्ये दारूबंदी कायदा २०१६ अंतर्गत दारू विक्रीस बंदी घालण्यात आली होती. हा कायदा गांधी जयंतीपासून (२ ऑक्टोबर) लागू केला जाणार होता. 
  • दारूबंदीसाठी तयार करण्यात आलेला हा कायदा व्यक्तीच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करणारा असल्याचा सांगत न्यायालयाने हा कायदा रद्द केला.
  • एखाद्याच्या घरी मद्य मिळाले तर कुटुंबातील सर्व सदस्यांना अटक करण्याची तरतूद या कायद्यात आहे. तसेच हा गुन्हा अजामीनपात्र ठरवण्यात आला होता.
  • ज्यामध्ये फक्त न्यायालयाद्वारेच जामीन मिळत असत. पोलीस ठाण्यामार्फत जामीन मिळत नाही.
  • त्यामुळे ही अधिसूचना घटनेतील तरतुदींशी विसंगत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवत ही अधिसूचना रद्द केली.
  • दारूबंदी कायद्यान्वये बिहारमध्ये दारूची निर्मिती, तिची विक्री आणि सेवनावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती.
  • त्यामुळे बिहार सरकारला वर्षांला किमान चार ते पाच हजार कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले होते.

गोल्फसम्राट अरनॉल्ड पाल्मर यांचे निधन

  • गोल्फला आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून देणारे अमेरिकेचे महान खेळाडू अरनॉल्ड पाल्मर यांचे वयाच्या ८७व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
  • गोल्फसम्राट म्हणून लोकप्रियता लाभलेल्या पाल्मर यांनी १९५८, १९६०, १९६२ व १९६४ मध्ये मास्टर्स स्पर्धेत विजेतेपद पटकावले.
  • अमेरिकन ओपन गोल्फ स्पर्धेत त्यांनी १९६०मध्ये अजिंक्यपद मिळविले होते. ब्रिटिश खुली स्पर्धा त्यांनी १९६१ व १९६२मध्ये जिंकली.
  • २००४मध्ये त्यांनी सलग ५० मास्टर्स स्पर्धामध्ये भाग घेतला होता. १९५४मध्ये वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी अमेरिकन हौशी स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.
  • त्यानंतर त्यांनी व्यावसायिक स्पर्धामध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. त्यांनी व्यावसायिक स्पर्धामध्ये ६२ वेळा अजिंक्यपद पटकाविले.
  • एका मोसमात एक लाख डॉलर्सपेक्षा जास्त कमाई करणारे ते पहिले खेळाडू होते.
  • त्यांनी सांघिक स्पर्धेत सहा वेळा रायडर चषक स्पर्धेत भाग घेतला. १९७४मध्ये त्यांची गोल्फच्या हॉल ऑफ फेममध्ये निवड झाली.
  • त्यांना अमेरिकेतील अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले. क्रीडा क्षेत्रातील राजदूत म्हणून अनेक जाहिराती मिळविणारे ते पहिले अमेरिकन क्रीडापटू होते.

पाकिस्तानी कलाकार व गायकांना चित्रपटात बंदी

  • पाकिस्तानी गायक आणि कलाकारांना चित्रपटांत घेऊ नये, अशा प्रकारचा ठराव इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशनच्या (इम्पा) बैठकीत झाला.
  • उरी येथील हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने पाकिस्तानी कलाकारांना देशातून निघून जाण्याचा इशारा दिला होता.
  • या पार्श्वभूमीवर निर्मात्यांची संघटना असलेल्या ‘इम्पा’ची अंधेरी येथे ही सर्वसाधारण बैठक झाली. यावेळी काही निर्माते उपस्थित होते.
  • या बैठकीत पाकिस्तानी कलाकार व गायकांना चित्रपटात घेऊ नये, असा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला.
  • ‘इम्पा’चे अध्यक्ष टी. पी. अगरवाल यांच्या ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’ या चित्रपटातील एक गाणे पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांनी गायलेले होते. आता हे गाणे दुसरा भारतीय गायक गाणार आहे.

चालू घडामोडी : २९ सप्टेंबर

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताची सर्जिकल स्ट्राईक

  • सीमेजवळ दहशतवादी एकत्र आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराने सीमारेषा पार करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला चढवला.
  • पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराकडून सर्जिकल स्ट्राईक (नियंत्रित हल्ले) करण्यात आले.
  • लष्कर आणि संरक्षण मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स रणबीरसिंग यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील हल्ल्यांबाबत माहिती दिली.
  • उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताने या कारवाईद्वारे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
 कारवाई कशी झाली? 
  • पाकव्याप्त काश्मीरमधील प्रशिक्षण तळांवर दहशतवादी एकत्र जमल्याची माहिती मिळाली. हे दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत होते.
  • उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर किमान २० वेळा दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचे प्रयत्न केले होते. हे सर्व प्रयत्न भारतीय लष्कराने उधळले होते.
  • आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर २८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ४.३० या कालावधीमध्ये भारतीय लष्कराचे काही जवान पाकव्याप्त काश्मीरमध्ये हेलिकॉप्टरमधून दाखल झाले.
  • प्रत्यक्ष ताबारेषेपासून ५०० मीटर ते २ किलोमीटर एवढ्या अंतरामध्ये ही कारवाई झाली. प्रत्यक्ष कारवाई ही जमिनीवर झाली.
  • या कारवाईमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील किमान सात दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले. या कारवाईत ३८ दहशतवादी ठार झाले आहेत.
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा आणि मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना विश्वासात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही लष्करी कारवाई केली.
  • या कारवाईचे नियोजन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि लष्कारातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी केल्याचे सांगण्यात येते.
  • भारताने सीमेपलीकडे जाऊन दहशतवादी तळांवर हल्ला केल्याची ही पहिलीच घटना आहे.
 सर्जिकल स्ट्राईक 
  • ‘सर्जिकल स्ट्राईक’ म्हणजे अतिशय ठरवून आणि नेमकेपणाने केलेली लष्करी कारवाई होय.
  • यामध्ये अप्रत्यक्षरिसुध्दा वाहने, इमारती अथवा सार्वजनिक पायाभूत सुविधांची किंवा उपयुक्त गोष्टींची हानी होणार नाही याचीही खबरदारी घेतली जाते.
  • सर्जिकल स्ट्राईकचा अत्यंत कमी वेळासाठी वापर केला जातो. अशा प्रकारची कारवाई करायची असेल तर हवाई दलाची परवानगी घ्यावी लागते.
  • सर्जिकल स्ट्राईक ही विशिष्ट भागावरच केली जाते. हल्ल्याचे नियोजन करताना सर्व बाबींचा विचार केला जात असून ही कारवाई रात्रीच्या वेळीच केली जाते.
  • भारतीय लष्कराने म्यानमारमाध्ये घुसून अशा प्रकारची कारवाई केली होती. भारताच्या पॅरा कमांडोने १ तासात ४०हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले होते.
  • अमेरीकन सैन्याने २००३मधील इराक युध्दाच्या सुरूवातीच्या काळात बगदादवर केलेला हल्ला हा सर्जिकल स्ट्राईकचे उदाहरण आहे.
  • भारतीय लष्कराने २८ सप्टेंबर रोजी केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक‘ची योजना सात दिवसांपासून सुरू होती. या कारवाईत ३८ दहशतवादी ठार झाले आहेत.

ऐतिहासिक पॅरिस हवामान करारास मान्यता

  • पॅरिस येथील ऐतिहासिक हवामान करारास केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता दिली आहे.
  • महात्मा गांधी जयंतीला म्हणजे २ ऑक्टोबर रोजी त्याची औपचारिकता पूर्ण करण्यात येणार आहे.
  • हा करार अमलात आणणाऱ्या देशात भारत हा एक महत्त्वाचा देश आहे. यामुळे भारताची पर्यावरण व हवामानविषयक काळजी असल्याचे सूचित होते.
  • आतापर्यंत ६१ देशांनी हा करार मान्य केला आहे. भारताने कार्बन उत्सर्जन ५१.८९ टक्के इतके खाली आणण्याचे मान्य केले आहे.
  • पॅरिस करारामध्ये पर्यावरणातील बदलांवर चिंता व्यक्त करताना जागतिक तापमानात वाढ २ अंश सेल्शिअसने कमी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत पॅरिस कराराला मान्यतेसह इतर काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
  • कोरिया-भारत करार: एकमेकांच्या सागरी शिक्षण संस्थांच्या प्रमाणपत्रांना मान्यता देण्याच्या दक्षिण कोरियाबरोबरच्या कराराला मान्यता देण्यात आली.
  • १९७८ मधील प्रमाणित सागरी प्रशिक्षण जाहीरनाम्यानुसार हा करार करण्यात आला आहे.
  • नवप्रवर्तनास उत्तेजन: भारत व सिंगापूर यांच्यात नवप्रवर्तनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या समझोता करारास मान्यता देण्यात आली आहे.
  • औद्योगिक मालमत्ता पेटंट, व्यापारचिन्हे या मुद्दय़ांवर द्विपक्षीय सहकार्याचा यात समावेश आहे.
  • हिंदुस्थान केबल्सला पॅकेज: कोलकाता येथील हिंदुस्थान केबल्स लि. ही कंपनी बंद करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
  • या कंपनीला सरकारने कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती लाभ व सरकारी कर्जाचे समभागात रूपांतर करण्यासाठी ४७७७.०५ कोटी रुपयांचे साहाय्य मंजूर केले आहे.

स्पर्धात्मक निर्देशांकामध्ये भारत ३९वा

  • जागतिक स्तरावरील औद्योगिक व आर्थिक स्पर्धात्मक निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक ३९वा लागला आहे.
  • ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने जगभरातील १२२ देशांचा अभ्यास करून हा निर्देशांक तयार केला.
  • देशातील संघटना, त्यांची ध्येयधोरणे आदी घटकांवर देशाची निर्मितीक्षमता अवलंबून असते.
  • या अहवालाच्या निर्मितीसाठी आर्थिक प्रगतीमधील १६ महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास करण्यात आला होता.
  • यामध्ये पायाभूत सुविधा, आर्थिक वातावरण, आरोग्य, प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, प्रशिक्षण, आर्थिक बाजारपेठ विकास आदी घटकांचा समावेश होतो. 
  • यापैकी संस्था, पायाभूत सुविधा, स्थूल आर्थिक परिस्थती, आरोग्य, प्राथमिक शिक्षण, प्रशिक्षण आदी बारा गटांमध्ये भारताने बाजी मारली आहे.
  • दहशतवादी कारवायांमुळे जागतिक पातळीवर खलनायक ठरलेल्या पाकिस्तान या यादीमध्ये शेवटच्या म्हणजेच १२२व्या स्थानी आहे.
  • देशांतर्गत वाढलेली गुन्हेगारी, करबुडवेगिरी, आर्थिक आणि सरकारी अस्थैर्य यामुळे पाकिस्तानात व्यापार करणे अधिक जोखमीचे झाले आहे.
  • या निर्देशांकानुसार श्रीलंकेचा ७१वा, भूतानचा ९७वा, नेपाळचा ९८वा तर बांगलादेशचा १०६वा क्रमांक लागला आहे.

तेल उत्पादन कमी करण्याचा ओपेकचा निर्णय

  • कच्च्या तेलाचे उत्पादन प्रतिदिन ७ लाख ५० हजार बॅरलपर्यंत कमी करण्याचा निर्णय ‘ओपेक’ या तेल उत्पादक देशांच्या संघटनेने घेतला आहे.
  • या निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात पाच टक्के वाढ झाली आहे. ओपेकचे सदस्य देश जगभरातील कच्च्या तेलापैकी ४० टक्के उत्पादन करतात. 
  • अल्जायर्स येथे सुरू असलेल्या ओपेकच्या बैठकीत अनपेक्षितपणे तेल उत्पादन घटविण्याचा निर्णय घेतल्याने तेलाचे भाव वाढले.
  • नोव्हेंबरपासून त्यांनी प्रतिदिन ३.२५ कोटी बॅरलपर्यंत उत्पादन कमी करण्यावर सहमती दर्शविली आहे. 
  • तेलाचे भाव २०१४च्या मध्यापासून निम्म्यापेक्षा अधिक घसरले आहेत. भावातील घसरण रोखण्यासाठी उत्पादन घटविण्याच्या पर्यायावर मागील काही काळ चर्चा सुरू होती.
  • मात्र याला ओपेकमधील काही देशांचा आक्षेप होता. आता या निर्णयावर एकमत झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढून स्थिरता येणार आहे.

चालू घडामोडी : २८ सप्टेंबर

सार्क परिषद रद्द होण्याची शक्यता

  • उरी येथील भारतीय लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानात नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेवर बहिष्कार टाकला आहे.
  • आठ सदस्य देशांच्या गटाचे अध्यक्षपद नेपाळकडे असल्यामुळे भारताने नेपाळला आपला निर्णय कळविला आहे.
  • एका देशाकडून अन्य देशांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप होत असून, सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादाचा निषेधार्थ भारताने या परिषदेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
  • भारताशिवाय बांगलादेश, अफगाणिस्तान आणि भूतान या देशांनीही परिषदेत सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले आहे.
  • पाकिस्तान निर्माण करत असलेल्या परिस्थितीमुळे परिषद यशस्वी होऊ शकत नाही, असा अप्रत्यक्ष आरोप या देशांनी केला आहे.
 सार्क 
  • प्रादेशिक सहकार्यासाठी दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना (सार्क) १९८५मध्ये स्थापन करण्यात आली.
  • यामध्ये भारतासह अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका हे देश सदस्य आहेत.
  • इस्लामाबाद, पाकिस्तानमध्ये ९ आणि १० नोव्हेंबरला १९व्या सार्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
  • सार्क देशांमधील करारानुसार या परिषदेत आठपैकी एका देशानाही सहभागी होण्यास नकार दिला तर ही परिषद पुढे ढकलण्यात येते किंवा रद्द केले जाते.

इस्त्राईलचे माजी पंतप्रधान शिमॉन पेरेस यांचे निधन

  • इस्त्राईलचे नोबेल पारितोषिक विजेते माजी राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान शिमॉन पेरेस यांचे २८ सप्टेंबर रोजी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.
  • इस्त्राईलच्या स्थापनेत आणि देशाला शांततेच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी उद्युक्त करण्यात शिमॉन पेरेस यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता.
  • इस्रायलच्या राजकारणामध्ये प्रवेश केल्यानंतर शिमॉन यांनी वाहतूक, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार खात्यांचा कार्यभार समर्थपणे सांभाळला होता.
  • १९९५-१९९६ या कालावधीमध्ये ते इस्रायलचे आठवे पंतप्रधान झाले आणि २००७साली ते इस्रायलचे नववे राष्ट्राध्यक्ष झाले.
  • पेरेस यांनी दोन वेळा इस्राईलचे पंतप्रधानपद भूषविले होते. त्यांनी २००७ ते २०१४ या काळात इस्राईलचे अध्यक्षपदही सांभाळले होते.
  • शिमॉन पेरेस यांनी ११ पुस्तकांचे लेखन केले. त्यांनी लिहिलेले बेन गुरियान - अ पॉलिटिकल लाईफ हे पुस्तक विशेष गाजले.
  • त्यांची डेव्हीड्स स्लींग, अँड नाऊ टुमारो, एंटेबी डायरी, द न्य मिडल इस्ट, फॉर द फ्युचर ऑफ इस्रायल ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.
  • स्वतंत्र पॅलेस्टाईन देशाच्या संकल्पनेची मुहूर्तमेढ करणाऱ्या ‘ओस्लो करारा’संदर्भात बजाविलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेसंदर्भात पेरेस यांना १९९४मध्ये पॅलेस्टाईनचे अध्यक्ष यासर अराफत व इस्राईलचे पंतप्रधान यित्झाक राबिन यांच्यासह नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आले होते.
  • २०१२साली बराक ओबामा यांच्याहस्ते त्यांना प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम हा पुरस्कार देण्यात आला. याशिवाय जगभरातील विविध पुरस्कार त्यांना मिळाले होते.
  • पेरेस यांच्या निधनानंतर इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी शोक व्यक्त केला आहे.

गुरगावचे गुरुग्राम असे नामांतर

  • हरयाणातील गुरगाव जिल्ह्याच्या नामांतरावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यापुढे गुरगाव शहर व जिल्हा ‘गुरुग्राम’ या नावाने ओळखले जाणार आहे.
  • केंद्र सरकारने हा नामांतराचा प्रस्ताव स्वीकारल्याची माहिती हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिली आहे.
  • महाभारतापासून प्रेरणा घेऊन हरयाणा सरकारने हा प्रस्ताव ठेवला होता. मागील एप्रिल महिन्यात मुख्यमंत्र्यांनी नामांतराची घोषणा केली होती.
  • १ नोव्हेंबर २०१६ रोजी हरयाणा राज्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

पनवेल राज्यातील २७वी महापालिका

  • पनवेल नगरपालिकेचा महापालिकेत समावेश करण्याची अधिसूचना राज्य सरकारने २७ सप्टेंबर रोजी जारी केली आहे.
  • राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील महापालिकांची संख्या आता २७ झाली आहे.
  • राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजेच नैना (दि न्यू मुंबई एअरपोर्ट इन्फ्लूएन्स नोटिफाइड एरिया) क्षेत्रातील ३० गावांना महापालिकेतून वगळण्यात आले आहे.
  • सध्याची पनवेल नगरपालिका आणि परिसरातील तळोजा, खारघर, कामोठे, कळंबोली, पळस्पे आदी गावांचा समावेश करून रायगड जिल्ह्यातील पहिली पनवेल महापालिका स्थापन होणार आहे.
  • नवी मुंबई-पनवेल-उरण परिसरांतील वाढते नागरीकरण आणि त्याचा पायाभूत सुविधांवर पडणारा ताण लक्षात घेऊन पनवेल आणि परिसराचे योग्य नियोजन करण्यासाठी पनवेल महापालिका स्थापन करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी सरकारने कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.
  • २०११च्या जनगणनेनुसार पनवेल महापालिकेची लोकसंख्या ५ लाख ४५ हजार असली तरी, सध्या या महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या ८ लाखांच्या आसपास असेल.

चालू घडामोडी : २७ सप्टेंबर

पाकिस्तानमध्ये हिंदू विवाह विधेयक मंजूर

  • पाकिस्तानच्या संसदेत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हिंदू विवाह विधेयक अखेर २७ सप्टेंबर रोजी मंजूर झाले.
  • या विधेयकामुळे पाकमध्ये अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजातील विवाहांना कायद्याचे संरक्षण मिळणार आहे.
  • याशिवाय ‘तलाक’ आणि जबरदस्तीने करण्यात येणाऱ्या धर्मांतरालाही यामुळे लगाम बसणार आहे.
  • पाकमध्ये गेल्या ६६ वर्षांपासून हिंदू विवाहांची नोंदणी होत नव्हती. नवा कायदा अमलात आल्यानंतर विवाह नोंदणीचा मार्ग मोकळा होणार आहे.
  • हिंदूंसोबतच जैन, बौद्ध, शीख, पारसी आणि ख्रिश्चन समाजही असून या सर्वांना हिंदू विवाह कायदा लागू होणार आहे.
 भारत व पाकमधील हिंदू विवाह कायद्यातील फरक 
  • पाक विधेयकातील तरतुदींनुसार लग्नानंतर १५ दिवसांच्या आत विवाह नोंदणी करणे आवश्यक आहे. भारतात मात्र अशाप्रकारचे बंधन नाही.
  • पाकमध्ये आता हिंदू वधू-वराचे लग्नावेळचे वय १८ वर्षे वा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे त्याचवेळी भारतात मात्र वरासाठी २१ तर वधूसाठी १८ वर्षे पूर्ण असण्याचे बंधन आहे.
  • पती-पत्नी १ वर्षापेक्षा जास्त काळ एकमेकांसोबत राहत नसल्यास त्यांना लग्न मोडणे या विधेयकानुसार शक्य आहे. भारतात यासाठी २ वर्षांचे बंधन आहे.
  • पतीच्या निधनानंतर सहा महिन्यांनी विधवा पत्नीला पुनर्विवाहास परवानगी मिळेल. भारतात मात्र अशी कोणतीही मुदतीची अट नाही.
  • हिंदू विवाह नोंदणी नियमांचे उल्लंघन झाल्यास पाकमध्ये सहा महिने कारावासाची शिक्षा होणार आहे. भारतात मात्र अशा शिक्षेची तरतूद नाही.
 विधेयकाचे फायदे .
  • प्रामुख्याने हिंदू समाजातील महिलांकडे विवाह सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा नसायचा. तो अडसर आता दूर होईल.
  • पुनर्विवाह, दत्तक मूल, उत्तराधिकारी नेमणे असे अधिकारही नव्या कायद्याने हिंदूंना मिळणार आहेत.
  • हिंदू महिलांच्या अपहरणाच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे. त्यालाही आता आळा बसणार आहे.
  • पाकमध्ये हिंदू व्यक्तीने पहिली पत्नी असताना दुसरा विवाह केल्यास तो गुन्हा ठरणार आहे. भारतातही तशाप्रकारची तरतूद आहे.

भारत अमेरिका ‘युद्ध अभ्यास २०१६’

  • भारतीय लष्कर आणि अमेरिकेचे सैन्य यांचा उत्तराखंडातील चौबतियाच्या जंगलातील दोन आठवड्यांचा सामूहिक युद्ध सराव यशस्वीपणे पार पडला. ‘युद्ध अभ्यास २०१६’ या उपक्रमाअंतर्गत हा सराव झाला.
  • युद्धाच्या दरम्यान एकमेकांच्या सहकार्याने शत्रूविरुद्ध कोणचे डावपेच आखायचे आणि त्याची अंमलबजावणी कशी करायची, याबाबत अभ्यास करण्यात आला. 
  • या युद्ध सरावात भारतीय लष्कराच्या पायदळाचे २२५ जवान आणि अमेरिकी सैन्याचे २० इन्फन्ट्री रेजिमेंटचे २२५ सैनिक सहभागी झाले होते.
  • अमेरिकी सैन्याच्या पॅसिफिक भागीदारी कार्यक्रमाअंतर्गत गेल्या २००४पासून सुरू झालेला दोन्ही देशांचा युद्ध अभ्यास मालिकेतील हा बारावा सराव होता.
  • या सरावांमुळे दहशतवाद्यांना प्रमुख्याने डोंगरी भागात तोंड देण्यासाठी उपाययोजना करणे आणि प्रत्युत्तर देण्याबाबत सैन्यात प्रगती झाली आहे.

उत्तम सिंग यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

  • ज्येष्ठ संगीतकार, संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक उत्तम सिंग यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०१६ जाहीर करण्यात आला.
  • पाच लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीतील सदस्यांनी एकमताने उत्तम सिंग यांची निवड केली.
  • या समितीत सचिव वल्सा नायर सिंह, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, स्वानंद किरकिरे, अजय व अतुल गोगावले आणि श्रेया घोषाल यांचा समावेश होता.
  • उत्तम सिंग यांचा जन्म २५ मे १९४८ रोजी झाला. त्यांचे वडील सतारवादक होते. त्यांनी वडिलांकडून बालपणापासूनच संगीताचे धडे गिरवले.
  • मुंबईत आल्यानंतर ते तबला व व्हायोलिन वादन शिकले. तीन वर्षे व्हायोलिन वादनाचे काम केले.
  • १९६३नंतर त्यांनी नौशाद, मदन मोहन, सचिन देव बर्मन, सी. रामचंद्र, राहुल देव बर्मन यांच्यासारख्या ज्येष्ठ संगीतकारांसोबत काम केले.
  • त्यांना संगीतकार जगदीश खन्ना यांची साथ लाभली. या जोडगोळीने अनेक भाषांतील चित्रपटांसाठी काम केले.
  • ‘मैंने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’ या हिंदी, तसेच अनेक तमिळ आणि पंजाबी चित्रपटांसाठीही त्यांनी संगीत संयोजक म्हणून काम केले.
  • पेंटरबाबू, क्लर्क याशिवाय यश चोप्रा यांच्या दिल तो पागल है, दुश्मन, फर्ज, दिल दिवाना होता है या गाजलेल्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले.
  • १९९७मध्ये ‘दिल तो पागल है’ या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार मिळाला.
  • २००२मध्ये ‘गदर एक प्रेमकथा’ या चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार (सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक) मिळाला.

गुगलला १८ वर्षे पूर्ण

  • जगातील सर्वांत मोठे सर्चइंजिन असलेल्या गुगलला २७ सप्टेंबर रोजी १८ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त त्यांनी खास डुडल सादर केले. 
  • जगात कोणत्याही गोष्टीची ऑनलाईन माहिती शोधण्यासाठी गुगलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
  • ४ सप्टेंबर १९९८ला गुगल पहिल्यांदा जगासमोर आले होते. लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांनी गुगलची स्थापना केली होती.
  • पेज आणि ब्रेन यांनी गूगलचे नाव आधी ‘बॅकरब’ असे ठेवले होते. पण, नंतर ते गुगल असे करण्यात आले.

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा सबनीस यांचे निधन

  • युवक बिरादरी आणि अभिव्यक्ती या संस्थांच्या संस्थापिका आणि संस्कृत, हिंदी आणि मराठी प्रायोगिक रंगभूमीवर काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रेखा सबनीस कर्करोगाने निधन झाले.
  • त्या अविवाहित होत्या. गिरगावातील प्रसिद्ध डॉ. बी. एस. सबनीस यांच्या त्या एकुलत्या एक कन्या होत्या. 
  • रेखा सबनीस यांचे इंग्रजी, संस्कृत, हिंदी व मराठी या भाषांवर चांगलेच प्रभुत्व होते.
  • प्रायोगिक रंगभूमीबरोबरच व्यावसायिक रंगभूमीवर साहित्य संघाच्या ‘लेक लाडकी’ या नाटकात त्यांनी काम केले.
  • प्रायोगिक रंगभूमीबरोबरच त्यांनी ‘आक्रोश’, ‘भूमिका’, ‘द स्क्वेअर सर्कल’, ‘पार्टी’, आशाद एक दिन, मुक्ती अशा चित्रपटांतून काम केले.
  • २७ डाउन, भूमिका या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. ओम शिवपुरी, अमरीश पुरी, नसिरुद्दीन शहा या कलाकारांबरोबर त्यांनी काम केले.
  • ‘पार्टी’ या चित्रपटासाठी त्यांनी सहदिग्दर्शनाचेही काम केले होते. १९७४मध्ये चालू झालेल्या छबिलदास चळवळीमध्ये त्यांनी आविष्कार या नाट्यसंस्थेबरोबर सहभाग घेतला होता.

चालू घडामोडी : २६ सप्टेंबर

इस्त्रोद्वारे एकाचवेळी ८ उपग्रहांचे प्रक्षेपण

  • इस्त्रोच्या पीएसएलव्ही सी ३५ या प्रक्षेपकाने आठ उपग्रहांसह श्रीहरिकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून अवकाशात झेप घेतली.
  • एकूण आठ उपग्रहांमध्ये तीन भारताचे, तीन अल्जेरियाचे, कॅनडा आणि अमेरिकेचा प्रत्येकी एक उपग्रह आहे.
  • २ तास १५ मिनिटाच्या या मिशनमध्ये प्रथमच पीएसएलव्ही-सी३५ दोन वेगवेगळया कक्षांमध्ये हे आठ उपग्रह प्रस्थापित करणार आहे.
 प्रक्षेपित करण्यात आलेले उपग्रह 
  • कॅनडाचा उपग्रह: एनएलएस १९
  • अमेरिकेचा उपग्रह: पाथफाईंडर १
  • अल्जेरियाचे उपग्रह: अल्सेट १बी (१०३ किलो, पृथ्वी निरीक्षण उपग्रह), अल्सेट २बी (११७ किलो, रिमोट सेन्सिंग उपग्रह) आणि अल्सेट १एन (७ किलो, तंत्रज्ञान निदर्शन उपग्रह)
भारताचे उपग्रह
  • पायसॅट (PISAT): बेंगळुरुच्या पीएसई महाविद्यालयाचा रिमोट सेन्सिंग उपग्रह 
  • स्कॅटसॅट १: या उपग्रहाचे वजन ३७१ किलोग्रॅम असेल. या उपग्रहांमुळे  सागरी तसेच हवामानसंबंधीच्या अभ्यासात मदत होणार आहे.
  • ‘स्कॅटसॅट-१’कडून हवामानाबरोबर वादळ आणि त्याच्या स्थितीची पूर्वसूचना मिळणार आहे.
  • उड्डाणानंतर १७ मिनिटांनी पीएसएलव्ही-सी ३५ने  ‘स्कॅटसॅट-१’ या भारताच्या अत्याधुनिक उपग्रहाला अवकाश कक्षेत प्रस्थापित केले.
  • प्रथम: मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या उपग्रहाचे वजन १० किलो असून इस्रोच्या स्कॅटसॅट उपग्रहाला तो मदत करणार आहे.
  • प्रथम या उपग्रहामुळे विद्यूत परमाणू मोजता येणार असून त्यामुळे जीपीएस प्रणाली आणखी सक्षम होण्यास मदत होणार आहे.
  • आयआयटी मुंबईच्या सप्तर्षी बंडोपाध्याय आणि शशांक तामसकर या दोन विद्यार्थ्यांनी 'प्रथम' विकसित केला आहे.
  • विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान संशोधनात रस निर्माण व्हावा या उद्देशाने ‘इस्रो’ने विद्यार्थी उपग्रह योजना सुरू केली होती.
  • अंतराळात झेपावलेला ‘प्रथम’हा सातवा विद्यार्थी उपग्रह असून, त्याच्या निर्मितीसाठी दीड कोटी रुपये खर्च आला आहे.

५००व्या कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय

  • भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या ऐतिहासिक ५००व्या कसोटी क्रिकेट सामन्यात १९७ धावांनी विजय मिळवत, तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-०ने आघाडी घेतली आहे.
  • भारताच्या या विजयाचे फिरकीपटू आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा शिल्पकार ठरले.
  • भारताने दिलेल्या ४३४ धावांच्या आव्हानापुढे न्यूझीलंडचा दुसरा डाव २३६ धावांत संपुष्टात आला. भारताचा हा १३०वा कसोटी विजय ठरला.
  • अश्विनने पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात ६ बळी घेतले. यामुळे त्याने पुन्हा एकदा दोन्ही डावात दहा बळी मिळविण्याची कामगिरी केली. 
  • अर्धशतकी खेळी आणि सामन्यात ६ विकेट्स मिळविलेला रवींद्र जडेजा सामनावीराचा मानकरी ठरला.
  • भारतीय संघाची ही ५००वी कसोटी कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळली गेली.

भारतीय बॉक्सिंग महासंघ स्थापन

  • २६ सप्टेंबर रोजी मुंबईत पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय बॉक्सिंग महासंघाची (बीएफआय) स्थापना करण्यात आली आहे.
  • ‘स्पाइस जेट’चे कार्याध्यक्ष व व्यवस्थापक अजय सिंह यांची बीएफआयच्या अध्यक्षपदी तर जय कवळी यांची सरचिटणीसपदी निवड झाली.
  • ही निवडणूक योग्य रीतीने पार पडल्याचे प्रशस्तीपत्र आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाचे (एआयबीए) उपाध्यक्ष एडगर टॅनर यांनी दिले.
  • यामुळे आता भारतीय बॉक्सिंगपटूंचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचे दरवाजे उघडले आहेत. तसेच राष्ट्रीय स्पर्धा आयोजनाचा मार्गही मोकळा झाला आहे.
  • बॉक्सिंग इंडियाच्या बांधणीत घाईघाईत चुका राहिल्या होत्या आणि त्यामुळे ती संघटना कोलमडली.
  • बॉक्सिंग इंडियाच्या वेळी झालेल्या चुका यंदा सुधारण्यात आल्या आहेत. ही बॉक्सिंग इंडियाची सुधारित आवृत्ती आहे.
  • भारतीय बॉक्सिंग महासंघाची स्थापना करताना एआयबीए, केंद्र सरकार यांच्या नियमांचा अभ्यास करण्यात आला आणि त्यानुसार ही संघटना स्थापन करण्यात आली आहे.

पुण्यात मराठा क्रांती मोर्चा

  • कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्यावी, शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळावे, अशा विविध मागण्यांसाठी २५ सप्टेंबर रोजी पुण्यात मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला.
  • युवती आणि महिलांनी केलेले मोर्चाचे नेतृत्व, हे या मराठा मोर्चाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. 
  • कोणतीही गडबड नाही, गोंधळ नाही असे वातावरण होते. नागरिक स्वयंप्ररणेने आणि स्वयंशिस्तीने आपापल्यापरीने मोर्चात सहभागी झाले होते.
  • लाखो लोक असूनही पोलिस यंत्रणेवर कोणताही ताण जाणवत नव्हता. पोलिसांनीही अत्यंत चोख नियोजन केले होते.
  • वाहतूक व्यवस्था आणि मोर्चा सुरळीत पार पाडण्यासाठी व्यवस्थित नियोजन करण्यात आले होते. 
  • कोपर्डीतील बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, ऍट्रॉसिटी कायदा रद्द करावा, मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण मिळावे आदी मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत.
  • डेक्कन जिमखाना गरवारे पुलावरील संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पाच युवतींनी पुष्पहार अर्पण केल्यावर सकाळी साडेदहाच्या सुमारास मोर्चाला सुरवात झाली.
  • सुरवातीला काही अपंग व्यक्ती, पाठोपाठ युवती, महिला, डॉक्टर, वकील अशा क्रमाने मोर्चाची लांबी उत्तरोत्तर वाढत गेली.
  • लक्ष्मी रस्ता, आंबेडकर रस्ता मार्गे मोर्चा दुपारी एकच्या सुमारास पुणे स्टेशनजवळील विधानभवन चौकात पोचला.
  • तेथे पाच युवतींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यावर सामूहिकरित्या राष्ट्रगीत झाल्यावर मोर्चा संपला.
  • मराठा समाजातील सर्वसामान्यांबरोबरच सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले.
  • या शिवाय समाजकारण, उद्योग, व्यापार, साहित्य, कला संस्कृती, क्रीडा आदी क्षेत्रातील मराठा समाजबांधव मोर्चात आघाडीवर होते.
  • मोर्चाच्या नियोजनात युवतींचा पुढाकार आणि त्यांना मिळालेली युवकांची साथ, यामुळे शिस्तीचे पालन होण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट सार्थकी लागल्याचे दिसून आले.
  • हा मोर्चा पुण्यातील मोर्चांचेच नव्हे, तर इतर कार्यक्रमांना जमलेल्या जनसागराचे आतापर्यंतचे विक्रम मोडीत काढणारा ठरला. मोर्चात ३५ ते ४० लाख जण सहभागी झाल्याचा दावा संयोजकांनी केला.

चालू घडामोडी : २५ सप्टेंबर

रेल्वे अर्थसंकल्प इतिहासजमा

  • गेली ९२ वर्षे स्वतंत्रपणे मांडला जाणारा रेल्वे अर्थसंकल्प यापुढे स्वतंत्रपणे न मांडता तो सर्वसाधारण अर्थसंकल्पात विलीन करण्यास मंत्रिमंडळाने २१ सप्टेंबर रोजी मंजुरी दिली.
  • तसेच केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवसाऐवजी १ फेब्रुवारी रोजी मांडण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
  • याशिवाय यापुढे केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात व खातेपुस्तकांत खर्चाची नियोजन खर्च व नियोजनबाह्य खर्च अशी विगतवारी करण्यात येणार नाही.
  • मंत्रिमंडळाने वित्त मंत्रालयाचे अर्थसंकल्पीय सुधारणांचे वरील तीन प्रस्ताव संमत केले. हे तिन्ही बदल २०१७-१८च्या आगामी अर्थसंकल्पापासून लागू होतील.
  • अर्थसंकल्प २८ किंवा २९ फेब्रुवारीऐवजी १ फेब्रुवारी रोजी मांडण्यास तत्त्वत: मंजुरी दिली गेली आहे.
  • अर्थसंकल्प मंजुरीच्या आणि विनियोजनाच्या सर्व संसदीय प्रक्रिया नवे वित्तीय वर्ष सुरू होण्याआधी म्हणजे मार्चअखेर पूर्ण व्हाव्यात हा हेतू आहे.
  • नव्या वेळापत्रकानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशन सुमारे १५ दिवस आधी सुरू करावे लागेल. 
  • स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प बंद झाला तरी रेल्वेची वित्तीय आणि कार्यात्मक स्वायत्तता अबाधित राहील व रेल्वेच्या मागण्यांवर स्वतंत्रपणे चर्चा होईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
 नियोजित बदल 
  • स्वतंत्र अर्थसंकल्प बंद झाला तरी सरकारची व्यापारी आस्थापना म्हणून रेल्वेचे अस्तित्व कायम राहणार आहे.
  • रेल्वेची कार्यात्मक स्वायत्तता अबाधित व वित्तीय अधिकारही सध्याप्रमाणेच राहतील.
  • सर्वसाधारण कामकाज खर्चासह सर्व महसुली खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार व पेन्शन हे रेल्वेच्या उत्पन्नातूनच दिले जातील.
  • एकत्रित अर्थसंकल्प मांडल्याने रेल्वेला कारभारावर लक्ष केंद्रित करता येईल व सरकारच्या वित्तीय स्थितीचे सर्वंकष चित्र स्पष्ट होईल.
  • रेल्वेच्या खातेपुस्तकांत केंद्राचे सुमारे २.२७ लाख कोटी रुपयांचे भांडवल तसेच राहील. लाभांशापोटी दरवर्षी द्यावी लागणारी ९७०० कोटी रुपयांची रक्कम रेल्वेकडेच राहील.
  • अर्थसंकल्प सुमारे महिनाभर लवकर संसदेत मांडल्याने मंजुरीची सर्व प्रक्रिया ३१ मार्चपूर्वी पूर्ण करणे शक्य होईल.
  • नव्या वित्तीय वर्षाच्या सुरुवातीपासूनच विविध खाती व विभागांना योजनांचे अधिक चांगले नियोजन करून त्यांची वेळेत अंमलबजावणी करता येईल.
  • अर्थसंकल्प मंजूर होईपर्यंत काही महिन्यांच्या खर्चासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची गरज राहणार नाही.
  • करांच्या दरांमध्ये झालेले बदल पूर्वलक्षी नव्हे तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच लागू होतील.
  • अन्य खात्यांप्रमाणे रेल्वेलाही केंद्रीय अर्थसंकल्पातून पैसे देण्यात येतील व रेल्वेच्या खर्चाचे विनियोजनही मुख्य विनियोजन विधेयकातच केले जाईल.
  • प्रक्रियात्मक मंजुरीची गरज न राहिल्याने निर्णय झटपट होतील व सुशासनाच्या मोजपट्टीत रेल्वेही येईल.

सानिया-बाबरेराला जपान ओपनचे जेतेपद

  • भारताची सानिया मिर्झा व चेक प्रजासत्ताकच्या बाबरेरा स्ट्रायकोव्हा या जोडीने टोरे पॅन पॅसिफिक (जपान ओपन) टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकले.
  • सानिया-बाबरेराने अंतिम लढतीत चेंग लिअँग व झाओक्युअ‍ॅन यांग या चिनी जोडीचा ६-१, ६-१ असा सहज पराभव केला.
  • मागील चार वर्षांतील सानियाचे हे तिसरे जपान खुल्या स्पर्धेचे जेतेपद आहे. याआधी तिने कारा ब्लॅकसह २०१३ व २०१४मध्ये अजिंक्यपद पटकावले होते.
  • सानिया-बाबरेराची एकत्र खेळण्याची ही तिसरी वेळ आहे. गेल्या महिन्यात सानिया-बाबरेरा जोडीने सिनसिनाटी खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.
  • मात्र, अमेरिकन खुल्या स्पर्धेत सानिया-बाबरेरा जोडीला उपांत्यपूर्व फेरीतच पराभव पत्करावा लागला होता.
  • सानियाने या वर्षांत आत्तापर्यंत आठ डब्लूटीए जेतेपदे पटकावली आहेत. त्यामध्ये हिंगीससह जिंकलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदाचाही समावेश आहे.
  • तसेच तिने ब्रिस्बेन, सिडनी, सेंट पिटर्सबर्ग, इटालियन आणि कॉनेक्टिकट खुल्या स्पर्धेतही बाजी मारली आहे. सानियाने कारकिर्दीत एकूण ४० दुहेरी गटातील जेतेपदे जिंकली आहेत.

रशिया पाकिस्तान युद्धसराव

  • पाकिस्तान बरोबर दहशतवाद विरोधी युद्धसराव करण्यासाठी रशियन सैन्याची एक तुकडी पाकिस्तानात दाखल झाली आहे.
  • उरी दहशतवादी हल्ल्यानंतर रशियाने पाकिस्तान बरोबरचा युद्धसराव रद्द केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पण हा सराव रद्द झालेला नाही.
  • फक्त हा युद्धसराव पाकव्याप्त काश्मीर किंवा अन्य संवेदनशील ठिकाणी होणार नसून, पेशावरपासून ३४ मैल अंतरावरील चेराट येथे होणार आहे.
  • पाकिस्तान आणि रशियामध्ये प्रथमच असा युद्धसराव होत असून, या सरावाला ‘फ्रेन्डशिप २०१६’ असे नाव देण्यात आले आहे. 
  •  फ्रेन्डशिप २०१६अंतर्गत रशियन आणि पाकिस्तानी सैन्यामध्ये दोन आठवडे युद्धसराव चालणार आहे. रशियाचे २०० जवान यात भाग घेणार आहेत.
  • रशिया हा भारताचा अत्यंत जवळचा मित्र आहे. त्यामुळे रशियाच्या पाकिस्तानसोबतच्या युद्ध सरावावर इतकी चर्चा सुरु आहे.
  • शीतयुद्धाच्या काळात भारत रशियाच्या गोटातील देश तर, पाकिस्तान अमेरिकेच्या गोटातील देश अशी ओळख होती.

व्याघ्रसंवर्धनासाठी सरकारची प्रस्तावित योजना

  • छुपी शिकार, अवयवांची तस्करी यांमुळे लुप्त होत चाललेल्या वाघांच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या उपकरणांची निर्मिती आता भारतातच करण्याची योजना सरकारने आखली आहे. 
  • वाघांवर नजर ठेवण्यासाठी आवश्यक असलेली नेक कॉलर, ड्रोनसारख्या आदी उपकरणांच्या निर्मितीचे काम ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांतर्गत हाती घेतले जाईल.
  • आगामी दोन वर्षांत या उपकरणांची निर्मिती भारतात होण्याची प्रक्रिया सुरू होईल. 
  • राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) नुकत्याच झालेल्या बैठकीत याविषयी चर्चा झाली. 
  • एनटीसीएने भारतीय वन्यजीव संस्थेशी (डब्ल्यूआयआय) एक सामंजस्य करार केला आहे.
  • त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात पन्ना, जिम कॉर्बेट, काझीरंगा, सुंदरबन आणि सत्यमंगलम या अभयारण्यांत या उपकरणांचा वापर केला जाणार आहे. 
  • नेक कॉलर, ड्रोनसारख्या उपकरणांमुळे वाघाच्या प्रत्येक हालचालीची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
  • सोबतच जंगलातील मानवी हस्तक्षेपास प्रतिबंध करणेही यामुळे शक्य होणार असून, परिणामी शिकारीला आळा घालण्यात यश मिळेल.

रेल्वे अर्थसंकल्पाचा इतिहास

  • देशाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या रेल्वेचा अर्थसंकल्प यापुढे स्वतंत्रपणे न मांडण्याच्या ऐतिहासिक निर्णयावर केंद्रीय मंत्रिमंडळाने २१ सप्टेंबर रोजी शिक्कामोर्तब केले.
  • नवी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे न मांडता त्याचा समावेश केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यास मंजूरी दिली.
  • केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्प सामान्य अर्थसंकल्पामध्ये विलीन करण्याची मागणी केली होती.
  • दोन्ही अर्थसंकल्प विलीन करण्याच्या प्रक्रियेवर अर्थमंत्रालयाने पाच सदस्यीय समिती नियुक्त केली होती.
  • सर्वसाधारणपणे २५ फेब्रुवारीला रेल्वे अर्थसंकल्प, २६ तारखेला आर्थिक सर्वेक्षण आणि २८ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्याची प्रथा अनेक वर्षांपासूनची आहे.
  • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे ९२ वर्षांची ही परंपरा २०१७पासून खंडित होणार आहे.
  • यामुळे रेल्वेच्या विद्यमान रचनेत आणि कार्यपद्धतीत काहीही बदल होणार नाही. रेल्वेच्या स्वायत्ततेवर या विलीनीकरणाचा काहीही परिणाम होणार नाही.
  • यापुढे अर्थमंत्री सर्वसाधारण अर्थसंकल्पासोबतच रेल्वे अर्थसंकल्पातील तरतुदींची, नव्या रेल्वेगाड्यांची व भाडेवाढीची माहिती यापुढे देणार आहेत.
  • केंद्राच्या या निर्णयामुळे रेल्वे अर्थसंकल्प आता इतिहासजमा झाला आहे. या अर्थसंकल्पाविषयीची काही मनोरंजक माहिती…
  • भारतात पहिली रेल्वे: १८५३मध्ये मुंबई-ठाणे दरम्यान पहिली रेल्वे धावली.
  • पहिला रेल्वे अर्थसंकल्प: दहा सदस्यांच्या अॅकवर्थ समितीच्या शिफारशीनंतर रेल्वे अर्थसंकल्प सर्वसाधारण अर्थसंकल्पातून वेगळा करण्यात आला आणि १९२४पासून तो स्वतंत्रपणे मांडण्यात येऊ लागला.
  • घटनेतील तरतुदी: दर वर्षी लोकसभेत घटनेच्या कलम ११२ व २०४ अंतर्गत रेल्वे अर्थसंकल्प मांडला जातो.
  • रेल्वे अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण: २४ मार्च १९९४ पासून रेल्वे अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण सुरू झाले.
  • स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वेमंत्री: देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जॉन मथाई यांनी पहिल्यांदा रेल्वेमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली.
  • स्वतंत्र भारताचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प नोव्हेंबर १९४७ मध्ये रेल्वेमंत्री जॉन मथाई यांनी सादर केला. 
  • देशाच्या पहिल्या महिला रेल्वेमंत्री: सध्याच्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देशाच्या पहिल्या महिला रेल्वेमंत्री होत्या.
  • लोकसभेत सर्वाधिक वेळा रेल्वे अर्थसंकल्प मांडणारे: लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांचे वडील जगजीवन राम यांनी सर्वाधिक सातवेळा रेल्वे अर्थसंकल्प मांडला.

आतापर्यंतचे रेल्वेमंत्री
क्र. रेल्वेमंत्री क्र. रेल्वेमंत्री
१. एन. गोपालस्वामी अय्यंगार २. जगजीवनराम
३. पन्नामपल्ली गोविंद मेनन ४. लाल बहादुर शास्त्री
५. टी. ए. पै ६. के. हनुमंतपय्या
७. कमलापती त्रिपाठी ८. ललितनारायण मिश्रा
९. एबीए गनीखान चौधरी १०. मधू दंडवते
११. जनेश्वर मिश्र १२. जॉर्ज फर्नांडिस
१३. लालूप्रसाद यादव १४. मल्लिकार्जुन खर्गे
१५. नितीशकुमार १६. सी. के. जाफर शरीफ
१७. एच. सी. दसप्पा १८. स्वर्णसिंग
१९. सी. एम. पुनाचा २०. एस. के. पाटील
२१. गुलजारीलाल नंदा २२. राम सुभाग सिंग
२३. प्रकाशचंद्र सेठी २४. केदारनाथ पांडे
२५. मोहसिना किडवाई २६. बन्सीलाल
२७. रामविलास पासवान २८. माधवराव शिंदे
२९. सी. पी. जोशी ३०. पवनकुमार बन्सल
३१. ममता बॅनर्जी ३२. मुकुल रॉय
३३. राम नाईक ३४. दिनेश त्रिपाठी
३५. सदानंद गौडा ३६. सुरेश प्रभू (विद्यमान)

चालू घडामोडी : २४ सप्टेंबर

राफेल खरेदी करारावर स्वाक्षऱ्या

  • भारताने ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी फ्रान्सबरोबर सुमारे ५९ हजार कोटी रुपयांचा (७ अब्ज ८७ लाख युरो) करार केला.
  • अत्याधुनिक क्षेपणास्त्रे आणि शस्त्रास्त्र यंत्रणेने सज्ज असलेल्या या विमानांमुळे भारतीय हवाई दलाची लढाऊ क्षमता व बळ वाढणार आहे.
  • संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि फ्रान्सचे संरक्षणमंत्री जॉ यीव्ह ल ड्रायन यांनी दोन्ही सरकारांमधील करारावर (इंटरगव्हर्न्मेंटल अॅग्रीमेंट) स्वाक्षऱ्या केल्या.
  • सिंगल सिटर राफेल लढाऊ विमानाची किंमत ९ कोटी १० लाख युरो आहे, तर डबल सिटर ट्रेनर विमानाची किंमत ९ कोटी ४० लाख युरो इतकी आहे.
  • या करारात भारताने वाटाघाटी करून सुमारे ७५ कोटी युरोची बचत केली आहे. गेल्या २० वर्षांतील लढाऊ विमान खरेदीचा हा पहिलाच करार आहे.
  • या करारामध्ये ५० टक्के ‘ऑफसेट क्लॉज’चा समावेश आहे. त्यामुळे जेवढ्या रुपयांमध्ये हा करार झाला त्यातली निम्मी रक्कम फ्रान्स भारतामध्येच गुंतवणार आहे.
  • करार झाल्यापासून ३६ महिन्यांनी विमाने उपलब्ध होणार असून, ६६ महिन्यांत सर्व विमाने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
  • एसयू-३० विमानाचा पल्ला ४०० ते ४५० किमी आहे; तर राफेल लढाऊ विमानाचा पल्ला ७८० ते १०५५ किमीपर्यंत आहे. शिवाय भारतासाठी या विमानात विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत.
  • या विमानात मिटीअर आणि मायका या दोन मिसाईल प्रणाली असतील. पाकिस्तानकडे सध्या असलेल्या प्रणालींपेक्षा ही प्रणाली जास्त संहारक आहे.
  • राफेलमध्ये बियाँड द व्हिज्युअल रेंज (बीव्हीआर) हवेतून हवेत मारा करणारे १५० किमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे.
  • कारगिल युद्धावेळी भारताने ५० किमी पल्ल्याचे ‘बीव्हीआर’ वापरले होते. त्यावेळी पाकिस्तानकडे हे शस्त्र नव्हते. पाकिस्तानकडे सध्या केवळ ८० किमी पल्ल्याचे ‘बीव्हीआर’ आहे.
  • या विमानामुळे हवाई दलाला भारतीय हवाई हद्दीत राहून पाकिस्तानसह उत्तर आणि पूर्व सीमांपलीकडे हल्ला करता येणार आहे.

२० लाखांपर्यंतच्या व्यवसायांना जीएसटीतून सूट

  • जीएसटीच्या आकारणीसाठी केंद्र आणि राज्यांच्या कक्षेत येणाऱ्या व्यवसायांच्या आर्थिक मर्यादांवर जीएसटी परिषद बैठकीत सर्वसंमतीने शिक्कामोर्तब झाले.
  • केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत या महत्त्वपूर्ण निर्णयासह १ एप्रिल २०१७पासून जीएसटीची अंमलबजावणी करण्याविषयी सहमती झाली.
  • त्यानुसार वार्षिक २० लाख रुपयांची उलाढाल असलेले व्यवसाय जीएसटीच्या कक्षेत येणार नाहीत. ईशान्येकडील राज्ये तसेच डोंगराळ राज्यांसाठी ही मर्यादा १० लाख रुपयांची असेल.
  • देशातील एकूण व्यावसायिकांपैकी १० ते २५ लाख रु. वार्षिक उलाढाल असलेल्या व्यावसायिकांची संख्या ६० टक्के आहे.
  • काही राज्यांना ही आर्थिक मर्यादा १० लाखांइतकी हवी होती, तर ती २५ लाखांपर्यंत नेण्याची मागणी काही राज्ये करीत होते.
  • याशिवाय सध्या अस्तित्वात असलेले सर्व उपकर जीएसटीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.
  • जीएसटीचा दर निर्धारित करून विधेयके संमत करण्याविषयी वेळापत्रक आखले जाणार आहे. जीएसटीचा दर ठरविण्यासाठी १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या बैठकीत चर्चा करण्यात येईल.
  • वार्षिक उलाढाल २० लाख ते दीड कोटी रुपयांदरम्यान असलेल्या कंपन्यांवर लागू होणाऱ्या जीएसटीचे निर्धारण राज्य सरकार करणार आहे. दीड कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या व्यवसायांवर केंद्राचे नियंत्रण असेल.
  • जीएसटीचे दर निश्चित होऊन कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर राज्यांना होणाऱ्या महसुली हानीची भरपाई करण्याचे आधार वर्ष २०१५-१६ असेल.
  • जीएसटी परिषदेची पुढची बैठक ३० सप्टेंबर रोजी होणार असून, त्यात राज्यांना द्यावयाच्या भरपाईचे प्रारूप आणि भरपाईचे मापदंड निश्चित करण्यात येतील.

लता मंगेशकर यांना बंगभूषण पुरस्कार

  • बंगाल सरकारतर्फे दिला जाणारा ‘बंग भूषण’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार गानसम्राज्ञी ‘भारतरत्न’ लता मंगेशकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
  • बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी येत्या २० ऑक्टोबर रोजी मुंबईत येऊन लतादीदींना हा पुरस्कार प्रदान करणार आहेत.
  • बंगाली संगीतातील योगदानाबद्दल लतादीदींना हा पुरस्कार दिला जाणार आहे.

एबीसीच्या अध्यक्षपदी आय. व्यंकट

  • ‘इनाडू’चे संचालक आय. व्यंकट यांची २०१६-१७ साठी ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन्सच्या (एबीसी) अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
  • यापूर्वी त्यांनी भारतीय जाहिरात मानक परिषदेचे (एएससीआय) अध्यक्षपद भूषवले आहे.
  • आय. व्यंकट हे मीडिया रिसर्च यूजर्स कौन्सिल (एमआरयूसी) आणि इंडियन ब्रॉडकास्टिंग फाऊंडेशनचे (आयबीएफ) संस्थापक सदस्य आहेत.
  • त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यूज मीडिया असोसिएशन (आयएनएमए) व ब्रॉडकास्ट ऑडिअन्स रिसर्च कौन्सिलच्या (बीएआरसी) महत्त्वपूर्ण पदांवर काम केले आहे.
  • इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे मंडळ सदस्य म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ जबाबदारी सांभाळली आहे. तसेच प्रिंट आणि टीव्ही इंडस्ट्रीत विविध पदांवर त्यांनी काम पाहिले आहे.
  • तसेच कोका कोला इंडिया प्रा.लि.चे देवव्रता मुखर्जी यांची ‘एबीसी’च्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.

चालू घडामोडी : २३ सप्टेंबर

नवतेज सरना अमेरिकेतील भारताचे नवे राजदूत

  • ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त नवतेज सरना यांची अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे.
  • भारताचे अमेरिकेतील राजदूत अरुण सिंग हे निवृत्त होत असून, सरना हे लवकरच त्यांची जागा घेतील.
  • भारतीय परराष्ट्र सेवेचे (आयएफएस) १९८०च्या बॅचचे असलेल्या सरना यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणून बराच काळ काम केले आहे. अत्यंत मुत्सद्दी अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
  • अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी येत्या ८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना प्रशासकीय कारभार सांभाळायचा आहे.
  • राजदूत म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर भारत-अमेरिका संबंध कायम राखण्याचे त्यांच्यापुढे आव्हान असेल.
  • सरना यांनी २००८ ते २०१२ या काळात इस्राईलमध्ये भारताचे राजदूत म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
  • मॉस्के, वॉर्सा, तेहरान, जीनिव्हा, थिंपू आणि वॉशिंग्टन येथील आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
  • याशिवाय श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त यश सिन्हा यांच्या जागी तरणजितसिंग सिद्धू यांची नियुक्ती झाली आहे. 

विसरनाई चित्रपट ऑस्करमध्ये

  • राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त तमीळ चित्रपट विसरनाई यावर्षीच्या ऑस्करमधील उत्कृष्ट परदेशी चित्रपटांच्या गटात भारताचे अधिकृत प्रतिनिधित्व करणार आहे.
  • पुढील वर्षीच्या ऑस्करमध्ये परदेशी चित्रपटांच्या गटातील २९ चित्रपटांशी भारताचा विसरनाई हा चित्रपट स्पर्धा करणार आहे.
  • गुन्हेगारीपट असलेल्या विसरनाई चित्रपटाचा निर्माता अभिनेता धनुष हा असून, त्याचे लेखन व दिग्दर्शन वेत्रीमारन यांनी केले आहे.
  • एम. चंद्रकुमार यांच्या ‘लॉक अप’ कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. दिनेश रवी, आनंदी आणि आडुकुलम मुरुगदास यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
  • पोलिसी क्रौर्य, भ्रष्टाचार आणि निरागसतेचा होणारा लोप याचे दर्शन चित्रपट घडवितो.
  • या चित्रपटाला उत्कृष्ट तमीळ चित्रपट, उत्कृष्ट सहायक अभिनेता समुथीरकनी आणि उत्कृष्ट संपादन किशोर टी असे तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
  • व्हेनिस चित्रपट महोत्सवात चित्रपटाला ‘ऍम्नेस्टी इंटरनॅशनल इटालिया पुरस्कार’ मिळाला होता.

टाईम्सच्या यादीमध्ये भारतातील ३१ शिक्षण संस्था

  • ‘टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड रँकिंग्ज २०१६-१७’च्या यादीमध्ये भारतातील ३१ शिक्षण संस्थांनी स्थान मिळवले आहे.
  • या यादीत ऑक्सफर्ड विद्यापीठ पहिल्या स्थानावर आहे. गेल्या १२ वर्षांत प्रथमच यूकेमधील शिक्षण संस्था या क्रमवारीत अग्रस्थानी राहिली आहे.
  • दुसऱ्या क्रमांकावर कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तर तिसऱ्या क्रमांकावर स्टॅनफोर्ड विद्यापीठ आहे.
  • बेंगळुरूची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अर्थात ‘आयआयएस्सी’ ही या क्रमवारीत सर्वांत पुढे असलेली भारतीय संस्था ठरली आहे.
  • या यादीत पहिल्या २०० विद्यापीठांत एकही भारतीय शिक्षण संस्था नाही. तर पहिल्या ४०० विद्यापीठांमध्ये केवळ दोनच भारतीय शिक्षण संस्था आहेत.
  • त्यामध्ये आयआयएस्सी (२०१ ते २५०मध्ये) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी-मुंबई) (३५१ ते ४००मध्ये) या संस्थांचा समावेश आहे.
  • आयआयटी-दिल्ली, आयआयटी-चेन्नई आणि आयआयटी-रुरकी या भारतीय शिक्षण संस्थाही 'टाइम्स'च्या यादीत आहेत.
  • याशिवाय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (रुरकेला), श्री वेंकटेश्वर विद्यापीठ, टाटा मूलभूत संशोधन संस्था आणि तेजपूर विद्यापीठ या चार संस्था यादीत स्थान मिळविण्यात प्रथमच यशस्वी झाल्या आहेत. 
  • एकूण ९८० शिक्षण संस्थांच्या या क्रमवारी यादीत यंदा दक्षिण आशियातील ३९ शिक्षण संस्था असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या दुपटीने वाढली आहे.
  • यात श्रीलंकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ कोलंबोचा समावेश आहे, तर पाकिस्तानच्या सात संस्थांचा यात समावेश आहे.

गुजरातमध्ये ऍट्रॉसिटी खटल्यांसाठी १६ विशेष न्यायालये

  • दलित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दलित आदिवासी अत्याचाराच्या (ऍट्रॉसिटी) खटल्यांच्या जलद सुनावणीसाठी गुजरातमध्ये १६ विशेष न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत.
  • याबाबत गुजरातच्या विधी विभागाकडून अध्यादेश जारी करण्यात असून, गुजरातमधील ही सर्व न्यायालये १ ऑक्टोबरपासून कार्यरत होणार आहेत.
  • या न्यायालयांमध्ये फक्त ऍट्रॉसिटी कायदा १९८९, संदर्भातीलच खटल्यांची सुनावणी होणार असल्याचे या अध्यादेशात म्हटले आहे.
  • १५ जिल्ह्यांमध्ये ही न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत. अहमदाबादमध्ये शहर दिवाणी न्यायालय आणि ग्रामीण न्यायालय अशी दोन न्यायालये असणार आहेत.
  • गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या सल्ल्यानेच ही सर्व न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत.
  • उणा येथे दलित तरुणांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये दलित संघटनांनी आंदोलन केले होते.

चालू घडामोडी : २२ सप्टेंबर

७ रेसकोर्स रोडचे ‘लोककल्याण मार्ग’ असे नामांतर

  • भारताच्या पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या ‘७ रेसकोर्स रोड’चे नवी दिल्ली महानगरपालिकेकडून ‘लोककल्याण मार्ग’ असे नामांतर करण्यात आले आहे.
  • भाजपच्या खासदार मिनाक्षी लेखी यांनी नामबदलाचा प्रस्ताव सादर केला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यास मंजुरी देण्यात आली.
  • ‘७ रेसकोर्स’ या नावात बदल करून ‘७ एकात्म मार्ग’ किंवा ‘लोककल्याण मार्ग’ असे नामांतर करण्याचा प्रस्ताव होता. परंतु शेवटी ‘लोककल्याण मार्ग’वर एकमत झाले.
  • त्यामुळे ‘रेसकोर्स रोड’चे पंतप्रधानांचे निवासस्थान आता ‘७ लोककल्याण मार्ग’ या नावाने ओळखले जाईल.
  • ‘७ रेसकोर्स रोड’वर पंतप्रधानांच्या निवासस्थानासह अनेक प्रसिद्ध राजकीय व्यक्तींची निवासस्थाने आहेत.
  • माजी पंतप्रधान राजीव गांधी हे ‘७ रेसकोर्स रोड’वर राहणारे पहिले पंतप्रधान होते. १९८४मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते आपल्या कुटुंबीयांसमवेत या बंगल्यामध्ये वास्तव्याला होते.
  • माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांनी ‘७ रेसकोर्स रोड’ या बंगल्याला पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान म्हणून घोषित केले. त्यापूर्वीचे पंतप्रधान हे संसदेकडून दिल्या जाणाऱ्या बंगल्यांमध्ये राहात असत. 
  • पंतप्रधानांचे अधिकृत कार्यालय ज्याला पीएमओ असेही म्हणतात ते रायसीना हिल्सवरील साऊथ ब्लॉकमध्ये आहे.

आरबीआय पतधोरण समितीवर तीन सदस्यांची नियुक्ती

  • केंद्र सरकारकडून रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीवर तीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • आगामी ४ वर्षांसाठी चेतन घाटे, पामी दुआ आणि रविंद्र ढोलकिया या सदस्यांची नियुक्ती पतधोरण समितीवर करण्यात आली आहे.
  • आगामी काळात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर आणि कार्यकारी संचालक या समितीच्या सदस्यांसह सल्लामसलत करून व्याजाचे दर निश्चित करतील.
  • पतधोरण समितीवर नियुक्ती करण्यात आलेल्या सदस्यांपैकी चेतन घाटे हे सध्या भारतीय सांख्यिकी संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
  • तर पामी दुआ या दिल्ली विद्यापीठात अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख आहेत. त्यांनी आजपर्यंत गुंतवणूक, विनिमय दर या विषयांवर संशोधन केले आहे.
  • रविंद्र ढोलकिया हे अहमदाबाद आयआयएमध्ये १९८५पासून अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स हे त्यांच्या अभ्यासाचा विषय आहेत.
  • पतधोरण समितीत अजून तीन सदस्यांची नियुक्ती होणे बाकी असून सर्व सदस्यांची नियुक्ती झाल्यानंतर ही समिती व्याजदर निश्चितीचे काम करेल.
  • व्याजदरांच्या निश्चितीचा निर्णय घेताना या समितीमधील प्रत्येकाला एक मत देण्याचा अधिकार असेल.
  • व्याजदराचा निर्णय घेताना समसमान मते पडल्यास रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचे मत निर्णायक ठरेल.
  • या समितीने घेतलेल्या सर्व निर्णयांची अंतिम जबाबदारी आरबीआयच्या गव्हर्नरवर असेल.

स्वातंत्र्यसैनिक सन्मान पेन्शनमध्ये वाढ

  • विविध वर्गवारीतील देशभरातील स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या कुटुंबियांना स्वातंत्र्यसैनिक सन्मान पेन्शन योजनेनुसार दिल्या जाणाऱ्या पेन्शनमध्ये केंद्र सरकारने सरासरी २० टक्क्यांनी वाढ केली आहे.
  • ही वाढ दरमहा सुमारे पाच हजार रुपयांची असेल. याखेरीज स्वातंत्र्यसैनिकांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाईभत्ता मिळेल व त्यात सहामाही सुधारणा होईल.
  • पेन्शनमधील ही वाढ व महागाईभत्त्याची सुधारित पद्धत यंदाच्या १५ ऑगस्टपासून लागू होईल.
  • यानुसार पेन्शनचे वितरण संबंधितांच्या ‘आधार’शी संलग्न खात्यांतूनच करावे, असे निर्देशही सर्व संबंधित बँकांना देण्यात आले आहेत.
  • गेल्या पाच दशकांत या योजनेनुसार एकूण १,७१,६०५ स्वातंत्र्यसैनिक व पात्रता निकषांत बसणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना पेन्शन मंजूर करण्यात आले.
  • सध्या ३७,९८१ स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या कुटुंबियांना पेन्शनचा लाभ मिळतो. त्यापैकी ११,६९० प्रत्यक्ष स्वातंत्र्यसैनिक आहेत, २४,७९२ त्यांच्या पत्नी किंवा पती आहेत तर १,४९० पात्र मुली आहेत.
 सुधारित पेन्शन 
  • अंदमानमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले राजबंदी किंवा त्यांच्या पत्नी वा पती: रु. ३०,०००
  • ब्रिटिश इंडियाच्या बाहेरून स्वातंत्र्यासाठी खस्ता खाल्लेले स्वातंत्र्यसैनिक वा त्यांच्या पत्नी अथवा पती: रु. २८,०००
  • आझाद हिंद सेनेचे सैनिक व इतर स्वातंत्र्यसैनिक: रु. २६,०००
  • स्वातंत्र्यसैनिकांवर अवलंबून असलेले त्यांचे पालक किंवा पात्रता निकषांत बसणाऱ्या जास्तीत जास्त तीन मुली: प्रत्यक्ष स्वातंत्र्यसैनिक हयात असता तर त्याला जेवढे पेन्शन मिळाले असते त्याच्या ५० टक्के पेन्शन.

मुकेश अंबानी भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती

  • फोर्ब्ज मासिकाने भारतातील आघाडीच्या शंभर श्रीमंत व्यक्तींच्या प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळविला आहे.
  • यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेले मुकेश अंबानी यांच्याकडे भारतातील सर्वाधिक २२.७ अब्ज डॉलरची संपत्ती आहे.
  • गेल्या वर्षभरात रिलायन्स इंडस्ट्रिजच्या शेअर्समध्ये २१ टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीतही वाढ झाली आहे.
  • त्यांच्यानंतर यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर १६.९ अब्ज डॉलरची संपत्ती असलेले सन फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीजचे दिलीप संघवी यांचा क्रमांक लागला आहे.
  • या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर हिंदूजा बंधुंचा समावेश आहे. त्यांच्याकडे एकूण १५.२ अब्ज डॉलरची संपत्ती आहे.
  • यादीमध्ये याआधी तिसऱ्या क्रमांकवर असलेले विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी आता चौथ्या क्रमांकावर गेले आहेत. त्यांची संपत्ती १५ अब्ज डॉलर आहे.
  • यंदाच्या यादीचे वैशिष्ट म्हणजे पतंजली आयुर्वेदचे आचार्य बाळकृष्ण यांनादेखील यादीत ४८व्या क्रमांकावर स्थान प्राप्त झाले आहे. त्यांच्याकडे एकुण २.५ अब्ज डॉलरची संपत्ती आहे.
  • योगगुरू बाबा रामदेव यांनी स्थापन केलेल्या पतंजलीने अलीकडच्या काळात विविध उत्पादने बाजारात आणली आहेत. या उत्पादनांमुळे अनेक मोठमोठ्या कंपन्यांना धक्का बसला आहे.
  • भारतातील आघाडीच्या शंभर श्रीमंतांकडे एकुण ३८१ अब्ज डॉलर अर्थात २५.५ लाख कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे फोर्ब्जने म्हटले आहे.

डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १२९वी जयंती

  • पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील यांची १२९वी जयंती २२ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात साजरी केली गेली.
  • अनुभवरूपी शिक्षकाकडून धडे घेतलेले भाऊराव म्हणजे आदर्शवादी शिक्षणतज्ज्ञ होते. स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय व स्वातंत्र्य ही त्यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाची चतु:सूत्री होती. 
  • भाऊरावांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी कुंभोज (जि. कोल्हापूर) येथे झाला. त्यांचे शिक्षण विटा व कोल्हापूर येथे झाले.
  • कष्ट करण्यास तयार असणारे मनगट, अभ्यासानुवर्ती न जाता सामाजिक परिस्थितीचा विचार करणारा मेंदू त्यांना लाभला होता.
  • सामाजिक विषमतेची त्यांना चीड होती. जातिधर्माच्या नावावर चाललेले अंधश्रद्धेचे नियम ते विद्यार्थिदशेतच मोडत.
  • ४ ऑक्टोबर १९१९मध्ये त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. १९२१ला नर्ले (ता. वाळवा) येथे वसतिगृह काढले.
  • १९२४ला रयत शिक्षण संस्थेचे स्थलांतर सातारा येथे केले. तेथेच सर्व जातिधर्माच्या मुलांसाठी वसतिगृह सुरू केले.
  • १९२७मध्ये धनिणीच्या बागेत शाहू बोर्डिंग सुरू केले. या बोर्डिंगला महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट देऊन या कार्याची स्तुती केली.
  • भाऊरावांच्या कार्यात त्यांच्या धर्मपत्नी लक्ष्मीबाईंचा सिंहाचा वाटा होता. गावोगावी फिरून शिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून दिले.
  • १९४०मध्ये सातारा येथे संस्थेचे पहिले हायस्कूल सुरू केले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थेस भेट दिली.
  • संत गाडगे महाराज आपल्या कीर्तनातून भाऊरावांच्या कार्याचे महत्त्व लोकांना पटवून देत. जून १९४७मध्ये त्यांनी पहिले छत्रपती शिवाजी कॉलेज काढले.
  • भाऊरावांनी १९४६ ते १९५३ या कालावधीत सामुदायिक शेतीचा प्रयोग केला. जातीभेद नष्ट करण्याचे महान कार्य केले. 
  • १६ जानेवारी १९५९ रोजी भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा किताब दिला. पुणे विद्यापीठाने डी. लिट. पदवी देऊन गौरविले.
  • श्रम आणि बुद्धीची सांगड घालणाऱ्या क्रांतिवीर भाऊरावांचे ९ मे १९५९ रोजी निधन झाले.
|| या महान शिक्षणतज्ज्ञास विनम्र अभिवादन ||

सुधारित डान्स बार कायद्याला स्थगिती नाही

  • राज्यातील सुधारित डान्स बार कायद्याला स्थगिती देण्याची डान्स बार मालकांची मागणी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेशाद्वारे फेटाळली आहे.
  • डान्स बारवर नियम व बंधने आणणारा राज्य सरकारचा कायदा जाचक असल्याचा दावा करत डान्स बार मालकांनी याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती.
  • या कायद्याला स्थगिती देण्याची त्यांची मागणी होती. न्यायालयाने तसे करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.
  • नव्या कायद्यातील नियम बारबालांच्या हिताचे व कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी उपयुक्त असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
 नव्या कायद्यातील तरतुदी 
  • बारबालांना मिळणारा पगार थेट त्यांच्या खात्यात टाकला गेला पाहिजे.
  • तसेच ३० ते ३५ वयानंतर या बारबालांना काम मिळणे अशक्य होते. त्यामुळेच बारमालकांनी त्यांच्याशी कामगार कायद्यांतर्गत करारच केला पाहिजे.
  • ग्राहकांनी उधळलेले पैसे व दिलेली टीप बिलात समाविष्ट करावी. (त्यामुळे त्यापोटी मिळणारा कर सरकारी तिजोरीत जमा होईल.)
  • डान्स बार धार्मिक स्थळे व शाळांपासून १ किमी अंतराच्या आत नसावेत, त्यामुळे धार्मिक भावनांचा अनादर होईल तसेच भावी पिढीवर अनिष्ट परिणाम होण्याची भीती आहे.
  • डान्स बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत.

चालू घडामोडी : २१ सप्टेंबर

दीर्घपल्ल्याच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी

  • भारताने जमिनीवरून हवेमध्ये मारा करण्याची क्षमता असणाऱ्या दोन दीर्घपल्ल्याच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची ओडिशातील चंडीपूर येथील प्रक्षेपण केंद्रावरून यशस्वी चाचणी घेतली.
  • भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि इस्राएल एअरोस्पेस इंडस्ट्रिज (आयएआय) यांनी संयुक्तपणे ही क्षेपणास्त्र यंत्रणा विकसित केली आहे.
  • यशस्वी प्रायोगिक चाचण्यांनंतर ही क्षेपणास्त्रे तिन्ही सैन्यदलांमध्ये दाखल होतील. त्यामुळे भारताच्या युद्धसज्जता आणखी मजबूत होईल.
  • या क्षेपणास्त्राव्यतिरिक्त मल्टी फंक्शनल अँड थ्रेट अ‍ॅलर्ट रडार (एमएफ-स्टार) या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली आहे. ही यंत्रणा क्षेपणास्त्र दिशादर्शन, मार्ग व शोधन यासाठी वापरली जाते.
  • भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, लार्सन अँड टुर्बो, भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि टाटा इ. खासगी उद्योगसमुहांनी देखील या क्षेपणास्त्रांसाठीच्या अनेक उपयंत्रणा विकसित केल्या आहेत.
  • यापूर्वी ३० जून ते १ जुलै २०१६ या या कालावधीत मध्यमपल्ल्याची मारक क्षमता असणाऱ्या क्षेपणास्त्रांची सलग तीनदा चाचणी घेण्यात आली होती.
 या क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये आणि उपयोग 
  • माऱ्याचा पल्ला: ६० ते ८० किमी.
  • क्षेपणास्त्रावरील स्फोटके: ६० किलो.
  • एकूण वजन: २.७ टन.
  • वेग: २ मॅक (प्रति सेकंद १ किमी)
  • कोणत्याही संभाव्य हवाई धोका हाणून पाडण्याची क्षमता.
  • संरक्षणदलांची संवेदनशील आस्थापने व गर्दीच्या शहरांच्या हवाई संरक्षणासाठी प्रभावी.

निवड समितीच्या अध्यक्षपदी एमएसके प्रसाद

  • भारतीय क्रिकेट निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी यष्टीरक्षक एमएसके प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • निवड समितीचे मावळते अध्यक्ष संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समितीची मुदत संपली होती.
  • त्यामुळे या समितीच्या जागी ‘बीसीसीआय’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन समितीची नियुक्ती करण्यात आली.
  • माजी क्रिकेटपटू देवांग गांधी, जतिन परांजपे, सरणदीप सिंग आणि गगन खोडा यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे.
  • माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद हे ज्युनियर संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष असतील.
  • यापुढे भारतीय क्रिकेट संघ, १९ वर्षाखालील क्रिकेट संघ आणि महिला क्रिकेट संघातील खेळाडूंच्या निवडीची जबाबदारी एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीकडे असेल.
  • याशिवाय बीसीसीआयच्या सचिवपदी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एमसीए) अध्यक्ष अजय शिर्के यांची पुन्हा बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

भूतानमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन

  • हिमालयाच्या कुशीत वसलेल्या आणि जगातला सर्वांत आनंदी देश मानला जाणाऱ्या भूतानमध्ये २२ सप्टेंबर रोजी विश्व मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
  • त्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागांतील आणि परदेशातील चारशे मराठी रसिक भूतानमध्ये दाखल झाले आहेत.
  • भूतानची राजधानी असलेल्या थिंफू शहरात विश्व मराठी परिषद आणि शिवसंघ प्रतिष्ठान यांच्या वतीने सहावे विश्व मराठी साहित्य संमेलन आयोजिण्यात आले आहे.
  • संमेलनाची सुरवात ग्रंथदिंडीने सकाळी आठ वाजता होणार आहे. त्यासाठी भूतान प्रशासनाने विशेष परवानगी दिली आहे.
  • ग्रंथदिंडीनंतर साहित्यिक हरी नरके यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. ‘माध्यम’ हा विषय यंदाच्या संमेलनाचा केंद्रबिंदू असणार आहे. 
  • पत्रकार संजय आवटे यांच्या अध्यतेखाली हाेत असलेल्या या एकदिवसीय संमेलनात ग्रंथदिंडी, व्याख्याने, भाषणे, परिसंवाद या माध्यमातून मराठी भाषेचे मंथन होणार आहे.

चालू घडामोडी : २० सप्टेंबर

स्मार्ट सिटीसाठी तिसरी यादी घोषित

  • केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी २० सप्टेंबर रोजी देशभरात विकसित करण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या शहरांची नावे घोषित केली.
  • स्मार्ट सिटीसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये एकूण ६३ शहरांनी सहभाग घेतला होता; यामधील २७ शहरांची निवड करण्यात आली आहे.
  • या यादीमध्ये महाराष्ट्र राज्यामधील कल्याण डोंबिवली, नागपूर, ठाणे, औरंगाबाद आणि नाशिक या पाच शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
  • स्मार्ट सिटीमुळे सेवा आणि व्यवस्था पारदर्शी व गतीमान होणार आहे. तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार तयार होणार आहेत.

भारताचा ५००वा कसोटी सामना

  • न्यूझीलंडविरुद्ध ग्रीन पार्कवर २२ सप्टेंबरपासून भारताच्या खेळल्या जाणाऱ्या ५००व्या कसोटी सामन्यादरम्यान उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेतर्फे भारताच्या माजी कसोटी कर्णधारांचा सत्कार करण्यात येणार आहे.
  • आतापर्यंत १२ माजी कसोटी कर्णधारांनी निमंत्रणाचा स्वीकार करीत उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे.
  • त्यात चंदू बोर्डे, अजित वाडेकर, सुनील गावस्कर, कपिल देव, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर, सौरव गांगुली, के. श्रीकांत, अनिल कुंबळे, रवी शास्त्री आणि वीरेंद्र सेहवाग यांचा समावेश आहे.
  • या कार्यक्रमाच्या उद्घाटन उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते तर समारोप मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.
  • ५००व्या कसोटी सामन्यानिमित्त २५ हजार विशेष टी-शर्ट तयार करण्यात आले आहेत. हे टी-शर्ट प्रेक्षकांव्यतिरिक्त शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
  • या व्यतिरिक्त ५०० किलो लाडूंचे वाटप करण्यात येणार असून ५०० फुगे हवेत सोडण्यात येतील.
  • तसेच २००० शालेय विद्यार्थी व दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत कसोटी सामना बघण्याची संधी देण्यासाठी यूपीसीएची तयारी सुरू आहे. 

रशियामध्ये पुन्हा पुतिन यांची सत्ता

  • रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या युनायटेड रशिया पक्षाला संसदीय निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे.
  • आतापर्यंत ९० टक्के मतमोजणी पूर्ण झाली असून, ४५० सदस्यांच्या संसदेत युनायटेड रशिया पक्षाचे ३३८ सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे पुतिन यांची सत्ता कायम रहाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
  • अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा ज्याप्रमाणे जागतिक राजकारणावर परिणाम होतो. त्या तुलनेत रशियाची निवडणूकी तितकी महत्वाची वाटत नसली तरी, जागतिक संतुलनाच्या दृष्टीकोनातून या निवडणुकीचे महत्व आहे.
  • कारण अनेक मुद्यांवर अमेरिका आणि रशियामध्ये तीव्र मतभेद आहेत. वेळोवेळी या मतभेदांचा जागतिक राजकारणावर परिणाम झाला आहे.

कांगोमध्ये आंदोलनादरम्यान हिंसाचार

  • मध्य आफ्रिकेमधल्या कांगो देशाच्या किन्शासा राजधानीत आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या हिंसाचारात अनेक जणांचा मृत्यू झाला आहे.
  • सरकारविरोधात प्रदर्शन करत असताना हा पोलीस आणि रिपब्लिकन गार्ड यांनी केलेल्या गोळीबारामुळे हिंसाचार उफाळून आला.
  • राष्ट्रपती जोसेफ कबिला यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी गटांनी आंदोलन छेडले असून, विरोधकांनी ही मागणी थेट रस्त्यांवर उतरून केली होती.
  • मात्र पोलिसांनी त्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या हिंसाचारात १७ जणांचा मृत्यू झाला आहे.