सेक्स सीडी प्रकरणात अडकल्यामुळे मंत्रिपद गमावलेले व आम आदमी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले आमदार संदीप कुमार यांना अटक करण्यात आली आहे.
सेक्स सीडीमध्ये संदीप कुमार यांच्यासोबत दिसलेल्या महिलेने संदीप कुमार यांची सुलतानपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.
या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून पोलिसांनी संदीप कुमार यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी संदीप कुमार यांच्यावर बलात्कार, विष प्यायला देणे, सार्वजनिक मानहानी तसेच भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल केले आहेत.
भारतीय वंशाचे ब्रिटन संसद सदस्य किथ वाझ यांचा राजीनामा
कथित ‘गे सेक्स स्कँडल’ प्रकरणामुळेब्रिटनमधील भारतीय वंशाचे संसद सदस्य किथ वाझ यांनी संसदेच्या उपसमितीचा राजीनामा दिला आहे.
५९ वर्षीय वाझ यांनी किमान ८ दिवसांपूर्वी पूर्व युरोपातील दोन पुरुष सेक्स वर्कर्सची भेट घेतली होती, असा दावा 'संडे मिरर'ने केला आहे.
मिररच्या वृत्तानंतर वाझ यांनी ब्रिटनच्या संसदेच्या होम अफेअर्स सिलेक्शन कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
गेल्या दहा वर्षापासून ते या कमिटीवर होते. राजीनामा देताना वाझ यांनी पत्नी आणि मुलांसह आपल्या समर्थकांची माफी मागितली आहे.
जमात-इ-इस्लामीचा नेता मीर कासीम अली याला फाशी
जमात-इ-इस्लामी या मूलतत्त्ववादी पक्षाचा नेता मीर कासीम अली याला ढाका येथे फाशी देण्यात आली.
१९७१मधील बांगलादेश मुक्तिसंग्रामावेळी करण्यात आलेल्या मानवतेविरोधातील गुन्ह्यांच्या आरोपांतर्गत अलीला फाशीची शिक्षा सुनाविण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनाविल्यानंतर राष्ट्रपतींनीही त्याची दया याचिका फेटाळली होती.
जमात-इ-इस्लामी या पक्षासाठी आर्थिक पाठबळ जमविणाऱ्या मुख्य नेत्यांमध्ये अलींचा समावेश होता.
यापूर्वी या पक्षाचा प्रमुख निझामी याच्या दोन निकटवर्तीयांचा अशा स्वरुपाच्या दयेचा अर्ज बांगलादेशचे राष्ट्रपती अब्दुल हमीद यांनी फेटाळून लावला असून त्यांना गेल्या वर्षी (२०१५) मृत्युदंड देण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा