गरिबांच्या सेवेसाठी जीवन समर्पित केलेल्या व शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या मदर तेरेसा यांना ४ सप्टेंबर रोजी संतपद बहाल करण्यात आले.
रोमन कॅथॉलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी व्हॅटिकन सिटी सेंट पीटर्स स्केअर येथे झालेल्या कार्यक्रमात तेरेसा यांना संतपद बहाल केले.
या कार्यक्रमाला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आर्चबिशप थॉमस डिसूझा आदी मान्यवर हजर होते.
जलविद्युत प्रकल्पांना अपारंपरिक ऊर्जेचा दर्जा मिळणार
देशातील सर्व जलविद्युत प्रकल्पांना अपारंपरिक ऊर्जेचा दर्जा देण्याबाबत केंद्रीय वीज प्राधिकरणाने ऊर्जा मंत्रालयाला शिफारस केली आहे.
जलविद्युत प्रकल्पांना अपारंपरिक ऊर्जेचा दर्जा देण्यासाठी २५ मेगावॉटची मर्यादा आहे.
ही मर्यादा काढून टाकावी व मोठ्यात मोठ्या जलविद्युत प्रकल्पाला अपारंपरिक ऊर्जेचा दर्जा द्यावी, अशी शिफारस उर्जा मंत्रालयाकडे करण्यात आली आहे.
जलविद्युत प्रकल्पांना अपारंपरिक दर्जा मिळाल्यास गुंतवणूकदारांचा ओढा त्याकडे वाढणार आहे.
माशांच्या प्रजातीला बराक ओबामा यांचे नाव
प्रशांत महासागरातील कुरे प्रवाळात सापडलेल्या माशांच्या नव्या प्रजातीला शास्त्रज्ञांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे नाव दिले आहे.
हे मासे सापडलेल्या पपहनौमोकुअकी मरिन नॅशनल मॉन्युमेंटच्या वाढीसाठी ओबामा यांनी आश्वासन दिल्याने त्यांचे नाव या माशांना देण्यात आले.
गडद तपकिरी लाल आणि सोनेरी रंगाचे हे मासे टोसानोईड्स प्रजातीच्या पोटजातीतील आहेत.
कुरे येथे गेलेल्या संशोधकांना जून महिन्यात हे मासे पहिल्यांदा सुमारे ३०० फूट खाली आढळले.
टोसानोईड्स प्रजातीचा सदस्य असलेली आणि जपानबाहेर सापडलेली ही पहिलीच प्रजाती आहे.
ओबामा यांचे नाव माशांच्या प्रजातीला देण्याची ही पहिलीच वेळ नसून, यापूर्वी २०१२मध्येही अमेरिकेतील डक नदी आणि बफेलो नदी येथे आढळलेल्या एका प्रजातीला ‘इथेओस्टोमा ओबामा’ असे नाव देण्यात आले होते.
ई-कचऱ्यातून ऑलिंपिक पदके
२०२०मध्ये जपानमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी निर्माण केली जाणारी पदके ई-कचऱ्यातून निर्माण करण्याचा प्रस्ताव आयोजकांनी सरकारला दिला आहे.
साधारणतः ऑलिंपिक स्पर्धेत दिली जाणारी पदके ही धातूंचा उपयोग करून बनवली जातात.
तंत्रज्ञानाचा शोध आणि वापर याच्यात एक पाऊल पुढे असणाऱ्या जपानने पदकाच्या निर्मितीसाठी ई-कचऱ्याचा उपयोग करून घेण्याचे ठरवले आहे.
ई-कचऱ्यावर पुनःप्रक्रिया करण्यात आशियामध्ये जपान आघाडीवर आहे.
जपानमध्ये साधारण दरवर्षी साडेसहा लाख टन इतकी इलेक्ट्रॉनिक उपकरणे खराब म्हणून फेकून दिली जातात. यावर प्रकिया करून साधारण एक लाख टन धातू ते परत मिळवतात.
त्यामुळे २०२०च्या पदकासाठी त्यांना अधिक ई-कचऱ्याची गरज भासणार असून, त्यासाठी ते विविध देश किंवा कंपन्यांना ई-कचरा साठविण्याचे आवाहन करणार आहेत.
Sir please jar apan masikachi computerised copy dili tar bare hoil.
उत्तर द्याहटवा