चालू घडामोडी : १९ सप्टेंबर
९०वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीमध्ये
- महाराष्ट्रातले पहिले साक्षर शहर म्हणून ओळख असणाऱ्या डोंबिवलीला आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळाले आहे.
- ९०वे साहित्य संमेलन डोंबिवली येथे होणार यावर अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या पुण्यातील बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे.
- डोंबिवलीच्या आगरी यूथ फोरम या संस्थेला संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळाला आहे.
- संमेलनासाठी सातारा, चंद्रपूर, बेळगाव, कल्याण, डोंबिवली, रिद्धपूर येथून निमंत्रणे आली होती.
- महामंडळाने बेळगावचे सार्वजनिक वाचनालय, डोंबिवलीमधील आगरी युथ फोरम व कल्याणचे सार्वजनिक वाचनालय यांनी सुचविलेल्या स्थळांची पाहणी केली होती.
- बैठकीत अध्यक्षांसह काही सदस्यांचा बेळगावकडे अधिक कल होता तर काहींची डोंबिवलीला पसंती होती. अखेर डोंबिवलीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
महाराष्ट्राच्या वृक्षारोपणाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
- महाराष्ट्रामध्ये राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमाअंतर्गत १ जुलै रोजी २ कोटी ८१ लाख रोपे लावण्याच्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
- राष्ट्रीय विक्रम म्हणून लिम्का बुकमध्ये हा विक्रम नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे वन खाते आणि सामाजिक वनीकरण विभागाने संयुक्तपणे हा उपक्रम राबविला.
- यामध्ये १ जुलै रोजी केवळ बारा तासांमध्ये २ कोटी ८१ लाख ३८ हजार ६३४ रोपे लावण्यात आली.
- त्यामध्ये राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसह, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि इतर सरकारी, खासगी संस्था, संघटनांनी वृक्षारोपण केले.
- उल्लेखनीय बाबी
- सर्वाधिक म्हणजे १५३ वृक्षांच्या प्रजाती लावल्या
- एकावेळी ६५,६७४ ठिकाणी वृक्षारोपण
- ६ लाख १४ हजार ४८२ लोकांचा सहभाग
जेष्ठ व्हायोलिनवादक नंदू होनप यांचे निधन
- ‘निघालो घेऊनि दत्ताची पालखी‘, ‘अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली’, अशी काही लोकप्रिय भक्तिगीते देणारे ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिनवादक नंदू होनप यांचे १७ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
- प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात ‘सूरसाधना’ या कार्यक्रमादरम्यान नंदू होनप यांना हृदयविकाराचा झटका आला.
- नंदू होनप यांचे वडील विष्णू दिनकर होनप हे संगीत शिक्षक होते. त्यांनी नंदू होनप यांना व्हायोलिन शिकण्याचा सल्ला दिला.
- गायक अजित कडकडे, गीतकार प्रवीण दवणे आणि संगीतकार नंदू होनप या त्रिकुटाची दत्ताची पालखी ही कॅसेट कमालीची लोकप्रिय ठरली.
- शिर्डी माझे पंढरपूर, नमन श्री एकदंता, शांताई मंगेशी, गजानन शेगावी आले, स्वामी समर्थ कथामृत्त असे अनेक भक्तिमय अल्बम त्यांच्या नावावर आहेत.
- भक्तिगीते आणि भावगीते असा प्रवास करीत असतानाच त्यांनी जवळपास ९४हून अधिक चित्रपटांना संगीत दिले.
- संगीतकार म्हणून ‘सारेच सज्जन’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट आणि ‘विश्वास’ हा त्यांनी संगीत दिलेला शेवटचा चित्रपट.
महानदीच्या पाण्यावरून वाद
- कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून तमिळनाडू आणि कर्नाटकमधील संघर्ष शिगेला पोचला असताना, आता महानदीच्या पाण्यावरून छत्तीसगड आणि ओडिशा या दोन राज्यांमध्ये संघर्ष सुरु झाला आहे.
- या वा सोडविण्यासाठी केंद्रीय जलस्रोतमंत्री उमा भारती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या त्रिपक्षीय बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघू शकला नाही.
- ओडिशा सरकारने महानदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या बंधाऱ्यांच्या उभारणी तत्काळ थांबवावी, अशी मागणी केली होती.
- मात्र छत्तीसगड सरकारने हे प्रकल्प जवळपास पूर्ण झाले असून, त्याचे काम आता थांबविता येणार नाही, असे सांगितले.
- या वादावर तोडगा काढण्यासाठी उमा भारती यांनी दोन्ही राज्यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रांत सुरू असलेल्या बंधाऱ्यांच्या उभारणीचे काम थांबवावे, अशी सूचना केली. याला दोन्ही राज्यांनी नकार दिला.
- उभय राज्यांच्या मागण्यांवर आठवडाभरामध्ये तोडगा काढण्यासाठी तांत्रिक सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक लवकरच होणे अपेक्षित आहे.
- ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक
- छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा