चालू घडामोडी : ११ सप्टेंबर

अँजेलिक कर्बरला अमेरिकन ओपनचे विजेतेपद

 • रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावल्यानंतर अँजेलिक कर्बरने अमेरिकन ओपन टेनिस स्पधेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.
 • अंतिम सामन्यात तिने झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिसकोव्हाला ६-३, ४-६, ६-४ असे पराभूत केले.
 • कर्बरचे हे दूसरे ग्रैंडस्लैम विजेतेपद आहे. अँजेलिकने याआधी सेरेना विल्यम्सला नमवत ऑस्ट्रेलियन ओपनचा खिताबही पटकावला होता. (जानेवारी २०१६)
 • या विजेतेपदानंतर कर्बरने जागतिक क्रमवारीत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला मागे टाकत प्रथम क्रमांकावर झेप घेतली आहे.
 • स्टेफी ग्राफव्यतिरिक्त अव्वल स्थानी झेप घेणारी कर्बर जर्मनीची केवळ दुसरी महिला टेनिसपटू आहे.
 • तसेच १९९६मध्ये स्टेफी ग्राफनंतर ‘यूएस ओपन’ जिंकणारी ती जर्मनीची पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

टॅल्गो ट्रेनची अंतिम चाचणी यशस्वी

 • भारतातील सर्वात वेगवान मानल्या जाणाऱ्या स्पॅनिश बनावटीच्या सुपरफास्ट टॅल्गो ट्रेनची अंतिम चाचणी यशस्वी झाली आहे.
 • टॅल्गो रेल्वेगाडीने दिल्ली ते मुंबई हे अंतर अपेक्षित वेळेत पूर्ण केले. अंतिम चाचणीवेळी टॅल्गोचा वेग ताशी १५० किलोमीटर ठेवण्यात आला होता.
 • दिल्ली स्थानकाहून निघालेली ही ट्रेन मुंबई सेन्ट्रल स्थानकावर ११ तास ४८ मिनिटांमध्ये पोहचली आहे. त्यामुळे दिल्ली-मुंबई प्रवास ४ तासांनी कमी करण्यात टॅल्गोला यश आले आहे.
 • सध्या सुपरफास्ट राजधानी एक्स्प्रेसने नवी दिल्ली ते मुंबई प्रवासासाठी १६ तास लागतात.
 • यापूर्वी ६ वेळा टॅल्गोची चाचणी घेण्यात आली होती. राजधानी एक्स्प्रेसच्या तुलनेत तिचा वेग अधिक आहे.
 • साधारणतः टॅल्गो ट्रेनचा वेग हा २०० किमी प्रतितास असतो. मात्र भारतीय रेल्वे ट्रॅकची स्थिती पाहता सध्या हा वेग तुलनेने कमी ठेवला आहे. कालांतराने ट्रेनचा वेग वाढवण्यात येणार आहे.

उत्तर कोरियावर नवीन र्निबध लादण्याचा युनोचा इशारा

 • उत्तर कोरियाने अणुचाचणी केल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने नवीन र्निबध लादण्याचा इशारा दिला आहे.
 • संयुक्त राष्ट्रांच्या पंधरा सदस्यीय सुरक्षा मंडळाची तातडीची बैठक घेऊन त्यात उत्तर कोरियाच्या अणुचाचणीमुळे होणाऱ्या परिणामांवर चर्चा करण्यात आली.
 • उत्तर कोरियाने केलेल्या पाचव्या अणुचाचणीचा निषेध करताना हे कृत्य म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेला धोका आहे असे सांगण्यात आले.
 • अमेरिका व फ्रान्स या देशांनी उत्तर कोरियावर नव्याने र्निबध लादण्यात यावेत असे म्हटले आहे.
 • त्तर कोरियाला कडक  संदेश मिळेल अशी कारवाई केली पाहिजे. उत्तर कोरियाने अण्वस्त्रसज्ज होणे आंतरराष्ट्रीय समुदायाला मान्य नाही.
 • उत्तर कोरियाला अण्वस्त्र कार्यक्रमातून माघार घेण्यास भाग पडेल अशी उपाययोजना करण्यात यावी. उत्तर कोरियाच्या अणुस्फोट कारवाया बेकायदा व घातक आहेत असे त्यांनी सांगितले.
 • उत्तर कोरियाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी संयुक्त राष्ट्रातील मानवी हक्क उच्चायुक्त झैग राद अल हुसेन यांनी दोन तटस्थ निरीक्षक नेमले आहेत.

प्रवीण कुमार समाजवादी पक्षात प्रवेश

 • भारतीय क्रिकेट संघातील गोलंदाज प्रवीण कुमार याने आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षात (सप) प्रवेश केला आहे.
 • मेरठचा असलेला प्रवीण कुमार चार वर्षांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. तो सध्या आयपीएलमधील गुजरात लायन्स संघाचा सदस्य आहे.
 • प्रवीण कुमारने आतापर्यंत भारतीय संघाकडून ६८ एकदिवसीय, ६ कसोटी आणि १० ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये खेळला आहे.
 • भारताचा आणखी एक क्रिकेटपटू मोहम्मद कैफनेही २०१४मध्ये राजकारणात प्रवेश केला.
 • कैफ काँग्रेसचा सदस्य असून, २०१४साली अलहाबाद फुलपूरमधून त्याने काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा