चालू घडामोडी : २६ नोव्हेंबर
सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यासंदर्भात समितीची स्थापना
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० वर्षे करण्यासाठी राज्य सरकारने एका समितीची नियुक्ती केली.
- सेवानिवृत्त सनदी अधिकारी बी.सी. खटुआ हे या समितीचे अध्यक्ष असतील.
- राज्य कर्मचाऱ्यांचे/अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे योग्य ठरेल की नाही याबाबत सर्व दृष्टीने ही समिती अभ्यास करेल आणि शासनाला अहवाल सादर करणार आहे.
- सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याची मागणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी सातत्याने केली आहे. ही मागणी ध्यानात घेऊनच खटुआ समिती नेमण्यात आली आहे.
- समितीमध्ये वित्त आणि सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव, लेखा व कोषागरे संचालक हे सदस्य असतील तर वित्त विभागाचे उपसचिव हे समितीचे सदस्य सचिव असतील.
- युती सरकारच्या काळात मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यासंदर्भातील विचार झाला होता.
- मात्र, त्यास शिवसेनेतूनच विरोध झाल्यानंतर तो मागे पडला. या निर्णयाने बेरोजगारी वाढेल, असा मोठा आक्षेप त्या वेळी घेण्यात आला होता.
सचिनसिंगला एआयबीए युवा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक
- माजी वर्ल्ड ज्युनियर ब्राँझपदक विजेता बॉक्सर सचिनसिंगने (४९ किलो) एआयबीए युवा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली.
- रशिया, सेंट पीटर्सबर्ग येथे पार पडलेल्या या स्पर्धेच्या फायनलमध्ये सचिनने क्युबाचा राष्ट्रीय विजेता जॉर्ज ग्रिनन याला हरवून जगज्जेतेपदाचा मान संपादला.
- युवा जगज्जेता होणारा तो तिसरा भारतीय बॉक्सर ठरला आहे. याआधी ननॅओसिंग आणि विकास क्रिशन यांनी युवा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
- ननॅओने २००८मध्ये ४८ किलो वजनी गटात तर विकासने वेल्टरवेटमध्ये २०१०मध्ये देशासाठी सुवर्णपदक आणले होते.
- यंदा भारताने या युवा वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण आणि ब्राँझपदकाची कमाई केली. २०१४मध्ये भारताला या स्पर्धेत ब्राँझचीच कमाई करता आली होती.
- नमन तन्वरला (९१ किलो) उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्याने ब्राँझवर समाधान मानावे लागले होते.
- या विजयासाठी सचिनला भारताच्या नव्या बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियानेकडून एक लाख रुपयांचे, तर नमनला २५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा