चालू घडामोडी : १४ नोव्हेंबर
कृषिवैज्ञानिक डॉ. राजीव वाष्णेय यांना क्विलू मैत्री पुरस्कार
- आंतरराष्ट्रीय कृषिवैज्ञानिक असलेले डॉ. राजीव वाष्णेय यांना अलीकडेच चीनचा ‘क्विलू मैत्री पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
- शांगडाँग पीनट रिसर्च इन्स्टिटय़ूट व शांगडाँग अॅकॅडमी ऑफ अॅग्रिकल्चरल सायन्सेस या संस्थांच्या वतीने परदेशी तज्ज्ञांना दिला जाणारा ‘क्विलू मैत्री पुरस्कार’ हा सर्वात मोठा मानला जातो.
- डॉ. राजीव यांचा जनुकीय पिकांच्या संशोधनातील अनुभव वीस वर्षांहून अधिक आहे.
- अन्न सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांनी केलेल्या संशोधनाला मोठे महत्त्व असून त्यांनी शेंगदाण्याच्या पिकाचा जनुकीय आराखडा तयार करण्यात मोठे काम केले आहे.
- ‘इक्रिसॅट’ (इंटरनॅशनल क्रॉप्स रीसर्च इन्स्टिटय़ूट फॉर द सेमी-एरिड ट्रॉपिक्स) या संस्थेत ते गेली ११ वर्षे कार्यरत असून सध्या जेनेटिक गेन्स या आंतरराष्ट्रीय संशोधन विभागाचे प्रकल्प संचालक आहेत.
- ‘इक्रिसॅट’च्या ग्रेन लेज्युम्स तसेच उपयोजित जनुकशास्त्र प्रकल्पात काम करीत होते. २००५ ते २००८ या काळात त्यांनी वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून काम केले.
- या संस्थेतील सेंटर फॉर एक्सलन्स इन जिनॉमिक्स या विभागाचे ते संस्थापक संचालक आहेत.
- अनेक आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पात त्यांनी काम केले असून, चवळी, ज्वारी या पिकांबाबतही त्यांचे जनुकीय संशोधन महत्त्वाच्या नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहे.
- उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथे बाहजोई येथे त्यांचा जन्म झाला व शिक्षण अलिगड व मीरत येथे झाले.
- अलिगड विद्यापीठातून वनस्पतिशास्त्रात बीएस्सी, त्याच विषयात एमएस्सी अशा शिक्षणानंतर त्यांनी गव्हाच्या जैवतंत्रज्ञानावर पीएच.डी. केली.
- जर्मनीतील विसेन्शाफ्लिशर या वैज्ञानिकासमवेत त्यांनी वनस्पतींचे जनुकशास्त्र व पीक संशोधनावर काम केले.
- जनुकशास्त्रीय पीक सुधारणा, रेणवीय लागवड पद्धतीत जनुकीय आराखडे तयार करणे, जेनिक मायक्रोसॅटेलाइट मार्कर्स या विषयात त्यांनी संशोधन केले.
- त्यांना यापूर्वी सीएसआयआरचा शांतिस्वरू प भटनागर पुरस्कारही मिळाला आहे.
अदिती अशोकला हिरो महिला इंडियन ओपनचा किताब
- रियो ऑलिम्पिक स्पर्धेत उत्तम प्रदर्शन केलेल्या अदिती अशोक हिने डीएलएफ गोल्फ अॅण्ड कंट्री क्बलमध्ये हिरो महिला इंडियन ओपनचा किताब पटकावला.
- अदिती हिने अखेरच्या फेरीत पार ७२चे कार्ड खेळले आणि त्यासोबतच तिने इंडियन ओपनचा किताब पटकावला.
- या विजयाने तिला ६० हजार डॉलरचा पुरस्कार मिळाला आहे. या वर्षात पदार्पण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ती पहिल्या स्थानी पोहोचली आहे.
- तिला अमेरिकेची ब्रिटनी लिसीकोम आणि स्पेनच्या बेलेन मोजो या दोघी संयुक्त दुसऱ्या स्थानी आहेत.
- भारताची वाणी कपूर हिने २८वे स्थान राखले. तर दीक्षा डागर हिने २२९च्या स्कोअरसह स्पर्धेतील सर्वोत्तम अमॅच्युअर खेळाडूचा किताब पटकावला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा