- देशातील सर्वसामान्य नागरिकांचे विमान प्रवासाचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी प्रादेशिक संपर्क योजनेची (आरसीएस) म्हणजेच ‘उडान’ योजनेची २१ ऑक्टोबर रोजी घोषणा केली.
- ‘उडे देश का आम नागरिक (UDAN)’ हे या योजनेचे घोषवाक्य आहे.
- या योजनेअंतर्गत एक तासाच्या विमानप्रवासासाठी २,५०० रुपये (सर्व करांसह) दर आकारण्यात येईल.
- देशांतर्गत विमानप्रवासाला चालना देण्यासाठी ही योजना असून, १ जानेवारी २०१७ पासून ती लागू होणार आहे.
- विशिष्ट मार्गांवरील प्रवासासाठी या स्वरूपाचा प्रवास करता येणार आहे. विमानासह हेलिकॉप्टर प्रवासाचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
- ग्राहक किंमत निर्देशांकानुसार (कंझ्युमर प्राइस इंडेक्स) ठराविक कालावधीमध्ये आढावा घेऊन विमान प्रवासाचे दर निर्धारित करण्यात येणार आहेत.
- सध्या अस्तित्वात असलेल्या विमानसेवा ‘उडान’अंतर्गत येणार नाही. केवळ नव्याने सुरू होणाऱ्या विमान प्रवासासाठीच ही योजना अंमलात येईल.
- साधारणतः प्रत्येकी ३० ते ४० आसन क्षमतेची विमाने या मार्गांवरील सेवांसाठी वापरली जातील.
- कमी दरातील विमानसेवा सुरू करण्यासाठी देशातील विकसित-प्रगत राज्यांनी मुख्यत्वे पुढाकार घेतला आहे.
- त्यातही महाराष्ट्राने सर्वाधिक रूची दाखविताना ‘उडाण’ योजनेबाबत केंद्राशी दोन महिन्यांपूर्वीच सामंजस्य करार केला आहे.
- या योजनेचा शिर्डीसह महाराष्ट्रातील सुमारे १० शहरांना फायदा होणार आहे.
- नागरी विमान वाहतूकमंत्री : अशोक गजपती राजू
- नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री : जयंत सिन्हा
उडान योजना
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा