चालू घडामोडी : २० नोव्हेंबर
पी.व्ही.सिंधूला चायना बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद
- ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने चायना खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
- सिंधूने चीनच्या सून यू हिचा पराभव करून आपले पहिले सुपरसीरिज विजेतेपद जिंकले आहे.
- अंतिम फेरीत सिंधूने चीनच्या सून यू हिचा २१-११, १७-२१ आणि २१-११ अशा सेटमध्ये पराभव केला.
- गेल्या ३० वर्षांमध्ये आजवर केवळ तीन चीन व्यतिरिक्त बॅडमिंटनपटूंनी ही स्पर्धा जिंकली होती. यात दोन भारतीय महिला बॅडमिंटनपटूंचा समावेश आहे. याआधी ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम सायना नेहवाल हिने केला होता.
- सिंधूने आपल्या उपांत्य फेरीच्या लढतीत कोरियाच्या जी ह्य़ून हिच्यावर रोमहर्षक विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती.
प्रसिद्ध मासिकाच्या मुखपृष्ठावर मंगळयानाद्वारे काढलेले छायाचित्र
- मंगळयानाद्वारे काढण्यात आलेल्या एका छायाचित्राला नॅशनल जियोग्राफिक या प्रसिद्ध मासिकाने मुखपृष्ठावर स्थान दिले आहे.
- यासोबतच मंगळयानाने या आठवड्यात मंगळाच्या कक्षेत तीन वर्षे पूर्ण केली आहेत.
- भारताच्या मंगळयान मोहिमेआधी जगभरातील देशांनी मंगळाच्या ५० पेक्षा अधिक मोहिमा केल्या आहेत.
- मात्र आतापर्यंत कोणालाही मंगळ ग्रहाचे मंगळयानाने काढलेल्या छायाचित्राइतके सुस्पष्ट छायाचित्र काढता आलेले नाही.
- मंगळयानात लावण्यात आलेल्या कमी किमतीच्या कॅमेऱ्याने मंगळ ग्रहाची अनेक छायाचित्रे टिपली आहेत.
- या छायाचित्रांमधील एका छायाचित्राला नॅशनल जियोग्राफिक मासिकाने मुखपृष्ठावर स्थान दिले आहे.
- भारताने मंगळयान मोहिमेवर एकूण ४५० कोटी रुपये खर्च केले आहेत. या मोहिमेला ‘मार्स ऑर्बिट मिशन’ (एमओएम) असे नाव देण्यात आले आहे.
- २४ सप्टेंबर २०१४ रोजी भारताने मंगळयान अवकाशात सोडत इतिहास रचला. पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहिम यशस्वी करणारा देश हे बिरुद या मोहिमुळे भारताने पटकावले.
- प्रतिष्ठीत टाईम्स मासिकाने मंगळयान मोहिमेचा उल्लेख ‘द सुपरमार्ट स्पेसक्राफ्ट’ या शब्दांमध्ये केला होता.
पाकिस्तानकडे १३० ते १४० अणुबॉम्ब
- अमेरिकेतल्या ‘बुलेटिन ऑफ अॅटोमिक सायन्टिस्ट’च्या अहवालानुसार, पाकिस्तान गेल्या काही वर्षांपासून सातत्याने आपली आण्विक शक्ती वाढवत चालला असून, पाकिस्तानकडे सुमारे १३० ते १४० अणुबॉम्ब आहेत.
- तसेच पाकिस्तान एफ-१६ आणि अन्य लढाऊ विमानांना आण्विक हल्ल्यांसाठी सज्ज करीत असल्याचेही या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.
- काही व्यवसायिक उपग्रहांनी टिपलेल्या पाकिस्तानी सैन्यतळ आणि हवाई तळांची छायाचित्रे टिपली आहेत.
- यामध्ये अनेक ठिकाणी अणवस्त्रांशी संबंधित असणारे मोबाईल प्रक्षेपक आणि भूमिगत सुविधा उपलब्ध असल्याचे आढळून आले आहे.
- पाकिस्तानकडून अणवस्त्रांच्या साठ्यात, त्यासाठी लागणाऱ्या प्रक्षेपण व्यवस्थेची आणि सुट्या भागांच्या उत्पादन क्षमतेतही मोठी वाढ झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
- येत्या १० वर्षांत पाकिस्तानच्या अण्वस्त्रांची संख्या ३५०पर्यंत पोहोचेल, असाही अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
- तसे प्रत्यक्षात झाल्यास पाकिस्तान हा जगभरातील सर्वाधिक अण्वस्त्रधारी असलेला तिसरा देश ठरू शकेल.
डॉ. उषा देशमुख यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार
- ज्येष्ठ संत साहित्य लेखिका डॉ. उषा देशमुख यांना राज्य शासनाने ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव केला आहे.
- मुंबई विद्यापीठातून मराठी विभागप्रमुख म्हणून निवृत्त झालेल्या उषाताई मूळच्या खानदेशातील अमळनेरच्या आहेत.
- १९५२मध्ये त्यांचा विवाह प्रसिद्ध समीक्षक-नाटककार प्रा. मा. गो. देशमुख यांच्याशी झाला.
- मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात ज्ञानदानाचे कार्य करत असतानाही त्यांनी मानवतावादी मूल्यांचा अवलंब करत विद्यार्थ्यांच्या आयुष्याची जडणघडण केली.
- प्राचीन मराठी साहित्याचा अभ्यास आणि साहित्य संशोधन व साहित्य समीक्षा हे त्यांच्या अभ्यासाचे क्षेत्र राहिले.
- उषाताईंनी प्राचीन व अर्वाचीन वाङ्मय, संत साहित्य, संशोधन व समीक्षा, असे सर्व प्रकार लेखनात हाताळले आहेत.
- संतसाहित्यावरची उषाताईंची ‘कुसुमाग्रज साहित्यदर्शन’, ‘ज्ञानेश्वरी एक शोध’, ‘दीपमाळ’ व ‘रामायणाचा आधुनिक साहित्यावरील प्रभाव’ ही काही गाजलेली पुस्तके आहेत.
- संतांची लोकशिक्षणविषयक भूमिका, त्यांचा भक्तीविषयक दृष्टिकोन, संतांची शिकवण या सर्व गोष्टींची उकल त्यांनी त्यांच्या साहित्यातून केली आहे.
- याशिवाय, त्यांनी ‘वाङ्मयीन व्यक्ती’, ‘साहित्यतोलन’, ‘ज्ञानेश्वरी जागरण’, ‘दलित साहित्य स्थिती गती’, ‘मराठी नियतकालिकांचा वाङ्मयीन अभ्यास’ यासह अनेक पुस्तकांचे संपादनही केले आहे.
- विदर्भ साहित्य संघाच्या पुसदला झालेल्या संमेलनाचे, तसेच वैदर्भीय लेखिका संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.
- बडोदा विद्यापीठात त्यांनी मराठी अभ्यास मंडळाच्या सदस्य म्हणून काम केले आहे.
- निवृत्तीनंतरही त्या विविध साहित्य व सांस्कृतिक व्यासपीठावर तेवढय़ाच जोमाने सक्रिय आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा