अमेरिकन अध्यक्षपदासाठी ८ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून ९ नोव्हेंबर रोजी या मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.
डेमॉक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतील प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत.
८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत १२ कोटी अमेरिकन नागरिक मतदान करतील.
सीबीडीटीच्या अध्यक्षपदी सुशील चंद्र
आयआयटी पदवीधर असलेले सुशील चंद्र यांची केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी: सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
ते १९८०च्या तुकडीतील भारतीय महसूल सेवेचे अधिकारी आहेत. २०१५पासुन ते प्रत्यक्ष कर मंडळाच्या चौकशी विभागाचे सदस्य आहेत.
मे महिन्यापर्यंतचा त्यांचा कार्यकाल आहे. त्यांनी राणी सिंग नायर यांची जागा घेतली आहे.
प्राप्तिकर खात्यात त्यांनी अनेक पदांवर काम केले. मुख्य आयुक्त, प्राप्तिकर महासंचालक, प्राप्तिकर आयुक्त, ही पदे त्यांनी भूषवली आहेत.
करदात्यांच्या सोयीसाठी त्यांनी अनेक योजना आखल्या. महसूल वाढवणे, करपाया विस्तृत करणे, डिजिटल कर प्रशासन राबवणे ही त्यांची उद्दिष्टे आहेत.
सध्या प्रत्यक्ष कर मंडळाकडे अपिलाची लाखो प्रकरणे पडून आहेत, ती निकाली काढणे हे प्रमुख आव्हान असून या प्रकरणातील एकूण रक्कम ५७०० कोटींची आहे.
देशाची अर्थव्यवस्था आता निर्णायक टप्प्यावर असताना अत्यंत महत्त्वाच्या आणि जबाबदारीच्या पदावर सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे.
अतुल्य भारत अभियानासाठी पंतप्रधान मोदींची निवड
विदेशी पर्यटकांना आकर्षित करून पर्यटन व्यवसाय वाढवण्यास अतुल्य भारत (इनक्रेडिबल इंडिया) अभियानाचा जगभर प्रचार व प्रसार घडवण्यासाठी, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने पंतप्रधान मोदींचा चेहरा निवडला आहे.
अभिनेता आमिर खान याला ब्रँड अॅम्बॅसिडरपदावरून हटवल्यापासून हे पद रिक्त होते.
लवकरच या प्रचार व प्रसार अभियानासाठी एजन्सीचीही निवड करण्यात येईल. हे अभियान दिड ते दोन महिने जगभर चालेल.
अडीच वर्षात पंतप्रधान मोदी ज्या देशात गेले, तिथल्या पर्यटकांची संख्या भारतात वाढली. या पार्श्वभूमीवर मंत्रालयाने पंतप्रधान मोदींचा चेहरा अत्यंत विचारपूर्वक निवडला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा