- क्युबाचे क्रांतिकारी नेते आणि माजी राष्ट्रपती फिडेल कॅस्ट्रो यांचे २५ नोव्हेंबर रोजी रात्री निधन झाले.
- क्यूबाचे अध्यक्ष राऊल कॅस्ट्रो यांनी सरकारी वाहिनीवरून फिडेल कॅस्ट्रो यांच्या निधनाची माहिती दिली.
- क्युबा सरकारने कॅस्ट्रो यांच्या निधनाबद्दल नऊ दिवसांचा दुखवटा घोषित केला आहे.
- त्यांच्या पार्थिवावर ४ डिसेंबर रोजी सॅन्टियागो येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सॅन्टियागो हे कॅस्ट्रो यांच्या क्रांतीचे जन्मस्थळ आहे.
- फिडेल कॅस्ट्रो यांनी त्यांचा भाऊ राऊल कॅस्ट्रो यांच्या हाती २००८मध्ये सत्ता देण्यापूर्वी सुमारे ५० वर्षे क्यूबावर एकहाती वर्चस्व राखले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा