नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत सावरकर यांची निवड
ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांची ९७व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
सावरकर यांनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी तसेच मालिकांत अनेक भूमिका आपल्या अभिनयाने अविस्मरणीय केल्या आहेत.
रंगभूमीवरील बॅकस्टेज कलावंतापासून नाट्यसंमेलन अध्यक्षपदापर्यंतचा त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे.
‘सूर्यास्त’मधील गायकवाड, ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील अंतू बर्वा, ‘तुझ आहे तुझपाशी’मधील शाम, ‘सौजन्याची ऐशीतैशी’मधील मंडलेकर, ‘सम्राट सिंह’ मधील विदूषक अशा अनेक भूमिका त्यांनी गाजवल्या.
इना मिना डिका, कुरुक्षेत्र, जावई माझा भला, गुलाम ए मुस्तफा अशा १००हून अधिक चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार, डॉ. मा.गो. खांडेकर स्मृती पुरस्कार आदी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
‘एक छोटा माणूस’ हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध झाले आहे. ६१ वर्षांहून अधिक काळ त्यांनी रंगभूमीची सेवा केली आहे.
पुढील अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता
८२ वर्षानंतर प्रथमच रेल्वे आणि अर्थसंकल्प असे सर्वसमावेशक बजेट पुढील वर्षी १ फेब्रुवारी २०१७ रोजी सादर होणार आहे.
नव्या वेळापत्रकानुसार संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नेहमीपेक्षा सुमारे १५ दिवस आधी सुरू होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे जानेवारीमध्ये संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे.
रेल्वे अर्थसंकल्पाचे सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्ये विलिनीकरण झाल्यानंतर हा पहिलाच अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.
अजय राजाध्यक्ष अमेरिकेच्या राजकोषीय ऋण सल्लागार समितीचे सदस्य
अजय राजाध्यक्ष यांची अलीकडेच अमेरिकेच्या कोषागार विभागाने राजकोषीय ऋण सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.
जागतिक बृहत-संशोधन व सल्ला क्षेत्रातील संस्था बार्कलेज कॅपिटलचे राजाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक आहेत.
अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या महत्त्वाच्या सल्लामसलतीच्या बैठकांमध्ये त्यांचा सहभाग असतो.
त्यांनी मुंबई विद्यापीठात अभियांत्रिकीचे पदवी शिक्षण आणि आयआयएम कोलकातामधून एमबीए पूर्ण केले आहे.
आयआयएम कोलकातानंतर त्यांनी अॅरिझोना येथील अमेरिकन ग्रॅज्युएट स्कूल ऑफ इंटरनॅशनल मॅनेजमेंटमधून पदव्युत्तर पदवी मिळविली.
वयाच्या ३१व्या वर्षी बार्कलेजमध्ये त्यांच्या एमबीएस फ्रँचाइजी व्यवसायाच्या ते व्यवस्थापकीय संचालक या पदावर पोहोचले.
मर्सिडीजचा ब्रिटिश ड्रायव्हर लुईस हॅमिल्टन याने ब्राझिलीयन ग्रां. प्री. स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.
एफ वन रेसमधील एकमेव भारतीय संघ असलेल्या ‘फोर्स वन’च्या रेसर सर्जियो परेरा (मॅक्सिको) आणि निको हल्केनबर्ग (जर्मनी) यांनी अनुक्रमे चौथे व सातवे स्थान मिळविले.
सध्या क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला आपला संघसहकारी निको रोसबर्गला या शर्यतीत दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले.
यंदाच्या वर्षातील हॅमिल्टनने नववे जेतेपद पटकावले आहे. यासह त्याने रोसबर्गच्या ९ विजेतेपदांची बरोबरी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा