टाइम्स नाऊ या वृत्त वाहिनीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांनी १ नोव्हेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
खासदार आणि बडे व्यापारी असलेले राजीव चंद्रशेखर यांच्याबरोबर अर्णव हे एक माध्यमसमूह सुरू करणार असल्याची चर्चा आहे.
अर्णव यांच्या द न्यूज अवर या कार्यक्रमामुळे टाइम्स नाऊच्या टीआरपीत प्रचंड वाढ झाली होती. ही वाहिनी २००५मध्ये सुरू झाली होती.
हा कार्यक्रम पहिल्यांदा २००७मध्ये प्रथम क्रमांकाचा प्राइम टाइम कार्यक्रम ठरला होता. तेव्हापासून हा कार्यक्रम नेहमी चर्चेत आणि वादात राहिला आहे.
एस. रामदुरई यांचा एनएसडीए अध्यक्षपदाचा राजीनामा
एस. रामदुरई यांनी राष्ट्रीय कौशल्य विकास संस्था (एनएसडीए) आणि राष्ट्रीय कौशल्यविकास महामंडळ (एनएसडीसी) या दोन सरकारी पदांचा राजीनामा दिला आहे.
एस. रामदुरई हे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे माजी प्रमुख असून त्यांची टाटा समूहात दीर्घकाळ कारकीर्द राहिली आहे.
एनएसडीएच्या कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष आणि कौशल्यविकास मंत्रालयाचे सचिव रोहित नंदन यांच्याकडे संस्थेचा हंगामी कार्यभार सोपविण्यात आला आहे.
रामदुरई यांची मे २०१३मध्ये म्हणजे संयुक्त लोकशाही आघाडी सरकारच्या (यूपीए) काळात एनएसडीएच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
एनएसडीए हे एक स्वायत्त मंडळ असून, त्याच्या अध्यक्षपदाला केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांच्या समकक्ष दर्जा आहे.
उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळाच्या पुरवठय़ासाठी प्रशिक्षण व विकासाचे उपाय शोधून काढणे या उद्देशाने एनएसडीएची स्थापना करण्यात आली.
रामदुरई यांच्यासह यूपीए काळात नियुक्त झालेले महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप चिनॉय आणि मुख्य परिचालन अधिकारी अतुल भटनागर यांनी यापूर्वीच राजीनामे देऊन पदत्याग केला आहे.
प्रसिध्द शिल्पकार सिल्व्हिओ गझानिगा यांचे निधन
‘फिफा’ फुटबॉल विश्वचषकाची रचना करणारे प्रसिध्द शिल्पकार सिल्व्हिओ गझानिगा यांचे ३१ ऑक्टोबर रोजी निधन झाले.
फिफा विश्वचषकाच्या डिझाइनसाठी १९७०मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत ‘फिफा’ने जगभरातील ५३ डिझाईन्समधून मधून गझानिगा यांचे शिल्प निवडले.
पण नंतर मूळ चषक स्वत:कडेच ठेवून त्याची प्रतिकृती दरवर्षी देण्याचा निर्णय करावा लागला. हीच प्रथा आजही सुरू आहे.
मूळचे (मिलान) इटालियन असलेले गझानिगा यांचे औपचारिक शिक्षण ‘सुवर्णकला आणि दागिने काम’ या विषयात झाले.
गझानिगा यांना फुटबॉलचे तीन आणि बेसबॉलचा एक अशा चार प्रतिष्ठेच्या चषकांच्या संकल्पनेची निमंत्रणे मिळाली आणि त्यांनी ते चषक डिझाईन केले.
इटलीचा राष्ट्रीय सन्मान (कमांडर ऑफ मेरिट) त्यांना २०१२मध्ये मिळाला आणि मिलान शहरानेही त्यांचा गौरव केला.
सिबुल्कोव्हाला डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेचे विजेतेपद
डॉमिनिका सिबुल्कोव्हाने जबरदस्त कामगिरी करत डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
सातव्या सीडेड सिबुल्कोव्हाने जागतिक रँकिंगमध्ये अव्वल असलेल्या जर्मनीच्या अँजलिक कर्बरवर ६-३, ६-४ अशी मात केली.
या कामगिरीसाठी सिबुल्कोव्हाला ‘डब्ल्यूटीए कमबॅक प्लेअर ऑफ द इयर’ हा पुरस्कारही प्रदान करण्यात आला.
मोसमाच्या अखेरीस रंगणाऱ्या या स्पर्धेत जागतिक रँकिंगमधील अव्वल आठ टेनिसपटू भाग घेतात, तर दुहेरीच्या स्पर्धेतही अव्वल आठ जोड्यांना प्रवेश मिळतो.
Sir news r getting late for us
उत्तर द्याहटवा