स्पर्धा परीक्षा पद्धतीमधील काही बदलांबाबत

 • आज १६ नोव्हेंबर रोजी आयोगाने वर्ष २०१७ पासून काही स्पर्धा परीक्षा पद्धतीमध्ये बदल केल्याचे जाहीर केले.
 • सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक पदासाठी सामाईक पूर्व परीक्षा.
 • लिपिक - टंकलेखक, करसहाय्यक व पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेणे.
 • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवापरीक्षा (स्थापत्य, विद्युत, यांत्रिकी तसेच व विद्युत व यांत्रिकी) सामाईक पूर्व परीक्षा.
हे बदल सन २०१७ मध्ये प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातींपासून लागू होतील.

सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक पदासाठी सामाईक पूर्व परीक्षा

 • सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक या पदांवरील भरतीकरता सध्या आयोगाकडून स्वतंत्र जाहिराती, स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र पूर्व परीक्षा घेतल्या जातात.
 • या तिन्ही पूर्वपरीक्षांसाठी परीक्षा योजना, अभ्यासक्रम, प्रश्नसंख्या, गुण, वेळ एकसमान आहेत. तरीही स्वतंत्र पूर्वपरीक्षांमुळे प्रत्येक परीक्षेसाठी अर्ज करणे, परीक्षा शुल्क भरणे, पूर्व तयारी/अभ्यास, प्रवास, निवास व्यवस्था, रजा घेणे (लागू असल्यास) अशा बाबींवर उमेदवारांना स्वतंत्रपणे व पुन्हापुन्हा वेळ व पैसा खर्च करावा लागतो. तसेच निवड प्रक्रियेतही विलंब होतो.
 • याबाबी टाळण्यासाठी सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक पदांवरील भरती करता एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे.
 • आता ह्या तीनही पदांकरिता संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरून, अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ते यापैकी एक, दोन किंवा तीनही पदांसाठी बसू इच्छितात काय, याबाबत विकल्प (option) घेण्यात येईल. 
 • संबंधित पदाकरिता उमेदवाराने दिलेला/ले विकल्प हा/हे संबंधित पदभरतीकरता अर्ज समजण्यास येईल/येतील व त्याच्या आधारे तसेच, भरावयाच्या पदासंख्येच्या आधारे, संबंधित पदाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून, सामाईक पूर्व परीक्षेच्या आधारे तीनीही पदांकरिता स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येतील.
 • त्यानंतर त्या त्या पदाच्या मुख्य परीक्षेस पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची विद्यमान मुख्य परीक्षा योजना व अभ्यासक्रमाच्या आधारे, स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येईल.
 • पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षांचा अभ्यासक्रम, प्रश्न\संख्या, गुण, वेळ अशा इतर बाबींमध्ये कोणताही बदल नाही.

लिपिक - टंकलेखक, करसहाय्यक व पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेणे.

 • लिपिक - टंकलेखक, करसहाय्यक, विक्रीकर विभाग तसेच पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा या सध्या एकाच टप्प्यात, लेखी परीक्षेद्वारे घेण्यात येतात.
 • सदर परीक्षेकरिता प्राप्त होणाऱ्या अर्जांची मोठी संख्या लक्षात घेऊन सदर तीनीही पदांकरिता यापुढे पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा अशा दोन टप्प्यांमध्ये निवड प्रक्रिया राबवण्यात येईल.
 • तीनही पदांसाठी स्वतंत्र पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा राहील. त्यासाठी परीक्षा योजना व अभ्यासक्रम व इत्यादी बाबी स्वतंत्र्यपणे आयोगाच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येतील.

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवापरीक्षा (स्थापत्य, विद्युत, यांत्रिकी तसेच व विद्युत व यांत्रिकी ) सामाईक पूर्व परीक्षा

 • सध्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा तसेच महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा या आभियांत्रिकी शाखेतील पदभरतीकरिता स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध करून स्वतंत्र परीक्षा घेण्यात येतात.
 • सदर प्रक्रियेमध्ये उद्भवणाऱ्या अडचणी, भरती प्रक्रियेस लागणारा विलंब इत्यादी बाबी लक्षात घेऊन स्थापत्य, विद्युत, यांत्रिकी तसेच विद्युत व यांत्रिकी या चारही शाखांकारिता एकच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल.
 • पूर्व परीक्षेच्या निकालांच्या आधारे संबंधित शाखेतील पात्र उमेदवारांसाठी, प्रत्येक शाखा/पदांसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येईल.
 • या संदर्भातील परीक्षा योजना व अभ्यासक्रम इत्यादी बाबी स्वतंत्रपणे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील.

२ टिप्पण्या: