आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेच्या अध्यक्षपदी नरेंद्र ध्रुव बत्रा
हॉकी इंडियाचे (एचआय) अध्यक्ष नरेंद्र ध्रुव बत्रा यांची आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेच्या (एफआयएच) अध्यक्षपदी निवड झाली आहे. बत्रा यांच्याकडे चार वर्षे अध्यक्षपद राहणार आहे.
या पदी निवड झालेले ते पहिले भारतीय, त्याचबरोबर पहिले आशियाईदेखील ठरले आहेत.
एफआयएचचे १२वे अध्यक्ष म्हणून बत्रा आंतरराष्ट्रीय हॉकीचे नेतृत्व करतील. मावळते अध्यक्ष लिएंड्रो नेग्रे यांच्याकडून ते पदाचा कारभार स्वीकारतील.
एफआयएचच्या या अध्यक्षपदासाठी त्यांच्यासमोर आयर्लंडच्या डेव्हीड बालबर्नी आणि ऑस्ट्रेलियाच्या केन रीड यांचे कडवे आव्हान होते.
या मतदानामध्ये एकूण ११८ मतांपैकी सर्वाधिक ६८ मतांनी बत्रा यांची निवड झाली.
देशातील एक दिग्गज क्रीडा प्रशासक म्हणून ५९ वर्षीय बत्रा यांची छबी आहे.
मारिया शारापोवा पुन्हा यूएनडीपीची गुडविल अॅम्बॅसडर
रशियाची टेनिसस्टार मारिया शारापोवा हिला गेल्यावर्षी लादलेली बंदी कमी केल्यानंतर पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाची (यूएनडीपी) गुडविल अॅम्बॅसडर बनवण्यात आले आहे.
पाचवेळच्या ग्रॅण्डस्लॅम विजेत्या शारापोवाला फेब्रुवारी २००७मध्ये या संस्थेची ब्रँड अॅम्बॅसडर बनवण्यात आले.
मात्र, डोप टेस्टमध्ये मेल्डोनियम नावाचे औषध आढळल्याने तिच्यावर क्रीडा लवादने दोन वर्षांची बंदी घातली होती.
या बंदीमुळे शारापोवा रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत खेळू शकली नाही. यानंतर युएनडीपीने शारापोवासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र बंदीची शिक्षा कमी करून १५ महिने करण्यात आल्यानंतर तिला पुन्हा एकदा यूएनडीपीची गुडविल अॅम्बॅसडर बनवण्यात आले आहे.
शरापोव्हावरील हा बंदीचा कालावधी येत्या एप्रिल माहिन्याच्या अखेरीस संपणार असून त्यानंतर तिचे टेनिस क्षेत्रात पुनरागमन होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा