सरकारशी असलेल्या कटू संबंधांच्या पार्श्वभूमीवरअनिल खन्ना यांनी अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या (आयटा) अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला.
इंदूर येथे ३ सप्टेंबर रोजी झालेल्या आयटाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये खन्ना यांची दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली होती. तत्पूर्वी २०१२ ते २०१६ या कालावधीसाठीही खन्ना आयटाचे अध्यक्ष होते.
क्रीडा नियमावलीनुसार त्यांनी एक टर्म पदापासून दूर राहणे अपेक्षित असल्याने (कूलिंग ऑफ पिरियड) सरकारने त्यांनी अध्यक्षपदी राहण्यास विरोध केला होता.
खन्ना हे २०१२मध्ये प्रथम आयटाचे अध्यक्ष झाले, त्यापूर्वी त्यांनी दोनवेळा सरचिटणीसपदाचा कार्यकाळ पूर्ण केला होता.
सरकारने त्यावेळी कूलिंग ऑफ पिरियडचा मुद्दा उपस्थित करून खन्ना यांचे अध्यक्षपद अवैध ठरवले होते.
तथापि, क्रीडा नियमावलीत सरचिटणीस पदावरील व्यक्तीस अध्यक्ष होताना कूलिंग ऑफ पिरियडची अट पूर्ण करावी लागेल, असा उल्लेख नसल्याचे सांगत खन्ना यांनी अध्यक्षपद सोडण्यास नकार दिला होता.
परिणामी, सरकारतर्फे नुकतीच आयटाची मान्यता रद्द करण्यात आली होती.
आपत्ती व्यवस्थापनासाठी विविध देशांनी परस्परांना सहकार्य करणे, मदतीची देवाणघेवाण आदी विषयांवरील आशियाई देशांची परिषद ३ नोव्हेंबर रोजी दिल्लीत सुरू होणार आहे.
आपत्तीची संभाव्यता आणि तीव्रता कमी करण्याच्या संदर्भात गेल्या वर्षी (सेंदाई) जपानमध्ये झालेल्या परिषदेतील निर्णयांच्या अंमलबजावणीची रूपरेषा दिल्लीतील परिषदेत तयार करण्यात येणार आहे.
तसेच परिषदेच्या अखेरीस आपत्ती व्यवस्थापनाबाबतचा ‘दिल्ली जाहीरनामा’ जारी केला जाणार आहे.
या परिषदेचे यजमानपद भारताकडे आहे आणि केंद्रीय गृह मंत्रालयाची यामध्ये मुख्य भूमिका असेल. पंतप्रधान मोदी या परिषदेचे उद्घाटन करणार आहेत.
जपानसह सर्व आशियाई देशांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहेत. पाकिस्तानचे प्रतिनिधीही परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
आपत्तीची संभाव्यता कमी करणे, हा परिषदेचा मुख्य विषय आहे. यामध्ये सहा तांत्रिक चर्चासत्रे असतील, तर २२ विशिष्ट विषयांवर आधारित चर्चासत्रे होतील.
चंदीगडचे भारतीय वास्तुरचनाकार एम. एन. शर्मा यांचे निधन
चंडीगढ हे भारतातील पहिले सुनियोजित शहर वसवण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेले एम. एन. शर्मा यांचे वयाच्या ९३व्या वर्षी निधन झाले.
चंदीगडचे पहिले भारतीय मुख्य वास्तुरचनाकार अशी त्यांची ख्याती होती. त्यांनी ‘द मेकिंग ऑफ चंदीगड : ल कॉर्बुझिए अँड आफ्टर’ हा ग्रंथ लिहिला.
चंदीगडच्या संकल्पनेवर निस्सीम प्रेम असणारे शर्मा हे कवीप्रमाणे भावनांच्या प्रकाशात या शहराबद्दल चिंतन करणारे विचारी कलावंत होते.
संपूर्ण चंदीगड युनिसेफने वास्तु-वारसा म्हणून घोषित करावे या मागणीचा पाठपुरावा ते अखेपर्यंत करीत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा