पुलित्झर पुरस्कार समितीने १० एप्रिल रोजी १०१व्या पुलित्झर पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये द न्यूयॉर्क टाईम्सला सर्वाधिक तीन पुरस्कार मिळाले.
कोल्सन व्हाइटहेड यांच्या ‘अंडरग्राऊंड रेलरोड’ या कादंबरीला ‘फिक्शन’ वर्गातील पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला. याच पुस्तकाला यंदाचा राष्ट्रीय पुस्तक पुरस्कारही मिळाला होता.
‘इंटरनॅशनल कन्सॉर्टियम ऑफ इनव्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स’ (आयसीआयजे) या संघटनेला आणि मॅकक्लॅची व मियामी हेरल्ड या अमेरिकी प्रसारमाध्यमांना यंदाचा प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला.
यांनी ‘पनामा पेपर्स’च्या माध्यमातून जगातील विविध राजकारणी आणि उद्योगपतींच्या बेहिशेबी गुंतवणुकीला वाचा फोडली होती.
सर टीम बर्नर्स ली यांना प्रतिष्ठेचा ए एम टय़ुरिग पुरस्कार
वर्ल्ड वाइड वेब या माहितीच्या महाजालाचा शोध लावून जगाला स्तिमित करणाऱ्या ब्रिटनचे ‘सर’ टीम बर्नर्स ली यांना असोसिएशन फॉर कॉम्प्युटिंग मशिनरी या जागतिक संस्थेचा प्रतिष्ठेचा ए एम टय़ुरिग पुरस्कार मिळाला आहे.
हा पुरस्कार म्हणजे संगणक विज्ञानातील नोबेल मानला जातो. बर्नर्स ली यांना वर्ल्ड वाइड वेबच्या निर्मितीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पहिल्या वेब ब्राऊजरच्या निर्मितीचे श्रेयही ली यांनाच जाते.
सर्न या संस्थेच्या मोठा आवाका असलेल्या प्रयोगाच्या निमित्ताने बर्नर्स ली यांनी हे वर्ल्ड वाइड वेब निर्माण केले.
मार्च १९८९मध्ये त्यांनी माहिती व्यवस्थापन यंत्रणेचा प्रस्ताव मांडला होता, सध्या ते वर्ल्ड वाइड वेब फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत. एनक्वायर हे वर्ल्ड वाइड वेबचे आधीचे रूप होते.
लंडनमध्ये जन्मलेले ली जून ते डिसेंबर १९८०दरम्यान जीनिव्हातील सर्नच्या प्रकल्पात माहिती तंत्रज्ञान कंत्राटदार बनले. तेथे त्यांनी वर्ल्ड वाइड वेबची निर्मिती केली. या संशोधनाचे ‘पेटंट’ मात्र त्यांनी घेतले नाही.
ली यांना ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी सर किताब देऊन २००४मध्ये गौरवले.२०१३मध्ये त्यांना पहिला राणी एलिझाबेथ पुरस्कार मिळाला.
चार्लस बॅबेज पुरस्कार, पॉल इव्हान्स पीटर पुरस्कार, सर फ्रँक व्हिटल पदक, जपान प्राइज, राष्ट्रकुल पुरस्कार, नील्स बोहर सुवर्णपदक असे अगणित पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
ते ब्रिटिश रॉयल सोसायटीचे, तसेच अमेरिकन अॅकॅडमी ऑफ आर्ट्स अॅण्ड सायन्सेसचे फेलो आहेत. दहापेक्षा अधिक मानद डॉक्टरेट त्यांना मिळाल्या आहेत. इंटरनेट हॉल ऑफ फेममध्येही ते झळकले आहेत.
हरभजन सिंग चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७चा सदिच्छादूत
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीकडून भारतीय स्पिनर हरभजन सिंग याची चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७चा सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली आहे.
यंदाची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा १ जून ते १८ जूनदरम्यान पार पडणार असून, या स्पर्धेसाठी एकूण ८ क्रिकेटपटूंची सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली आहे.
यामध्ये हरभजन सिंग याच्यासोबत शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान), हबिबूल बशर (बांगलादेश), इयान बेल (इंग्लंड), शेन बॉण्ड (न्यूझीलंड), माईक हसी (ऑस्ट्रेलिया), कुमार संगकारा (श्रीलंका) आणि ग्रॅमी स्थिम (दक्षिण आफ्रिका) यांचा समावेश आहे.
या आठ सदिच्छादूतांनी एकूण १७७४ वन डे सामने खेळले आहेत. याशिवाय त्यांनी ४८ शतकांसह ५१,९०६ धावा केल्या असून ८३८ विकेट्स घेतल्या आहेत.
हे सर्व सदिच्छादूत चॅम्पिअन्स ट्रॉफी टूरचा भाग असतील. तसंच हे आठ क्रिकेटर्स आयसीसीच्या एडिटोरिअल टीमचाही सहभाग असतील.
या स्पर्धेचा पहिला सामना द ओवल मैदानावर इंग्लंड आणि बांगलादेश दरम्यान पार पडणार आहे.
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळविण्यात अपयशी
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजचे संघ २०१९साली होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळविण्यात अपयशी ठरले आहेत.
आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत अनुक्रमे आठव्या आणि नवव्या क्रमांकावर राहिल्याने दोन्ही संघांना विश्वचषकासाठी थेट पात्र होता आले नाही.
तर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, श्रीलंका, न्यूझीलंड आणि बांगलादेश हे संघ विश्वचषक स्पर्धेला थेट पात्र ठरले आहेत.
आता विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळवण्यासाठी पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज संघ पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक पात्रता स्पर्धेत अन्य १० संघांसोबत खेळतील.
विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र संघांची क्रमवारी ठरवण्यासाठी संघांची १ मे २०१४ ते १ मे २०१७ या काळातील कामगिरी विचारात घेण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा