ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती भारताची बँडमिंटनपटू पी व्ही सिंधूने इंडिया ओपन सुपर सिरीज स्पर्धेत महिला एकेरीत प्रथमच विजेतेपद मिळवले.
रिओ ऑलिंपिकच्या अंतिम फेरीत तिला पराभूत करणाऱ्या स्पेनच्या कॅरोलिना मरीनवर सिंधूने २१-१९, २१-१६ असा विजय मिळवला.
सिंधूने यापूर्वी मारिनविरुद्ध गेल्या वर्षी दुबई येथे खेळल्या गेलेल्या बीडब्ल्यूएफ सुपर सिरीज स्पर्धेत विजय मिळवला होता.
सिंधू आणि कॅरोलिना मरीन याआधी ९ वेळा आमनेसामने आल्या आहेत यापैकी ५ सामने मरीनने तर ४ सामने सिंधूने जिंकले होते.
या स्पर्धेच्या पुरुष एकेरीत डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनने चिनी ताईपेच्या टीएन चेन चोऊचा पराभव करीत जेतेपदाचा मान मिळवला.
पुरुष दुहेरीत शिहो तनाका-कोहारू योनेमोटो जोडीने विजेतेपद मिळविले. त्यांनी नाओको फुकुमन-कुरुमी योनाओ जोडीचा पराभव केला.
जपानच्या शिहो तनाका व कोहारू योनेमोटे या जोडीने नाओका फुकुमान व कुरुमी योनाओ या जोडीचा पराभव करीत महिला दुहेरीत जेतेपद पटकावले.
मिश्र दुहेरीत चीनच्या सिवेई झेंग व किंगचेन चेन यांनी प्राप्त लु काई व हुआंग याकियोंग यांची झुंज मोडून काढत जेतेपद पटकावले.
भारतातील सर्वात मोठ्या बोगद्याचे लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ एप्रिल रोजी भारतातील सर्वात मोठ्या बोगद्याचे उद्घाटन केले. जम्मू काश्मीरमधील नाशरी ते चेनानी दरम्यान हा बोगदा तयार करण्यात आला आहे.
९.२८ किलोमीटर लांबीचा हा बोगदा देशातील सर्वात मोठा बोगदा ठरला असून, त्यासाठी सुमारे ३,७०० कोटी रुपये खर्च आला आहे.
जम्मू व श्रीनगरला जोडण्यासाठी हा बोगदा तयार करण्यात आला असून, या बोगद्यामुळे जम्मू ते श्रीनगर हे अंतर ३० किलोमीटरने कमी होणार आहे.
या बोगद्यामुळे दोन तासांचा वेळ वाचणार आहे. तसेच दररोज २७ लाख रुपयांच्या इंधनाची बचत होईल.
रेनबो फ्लॅगचे जनक गिल्बर्ट बेकर यांचे निधन
समलिंगींच्या प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणून जगभरात मान्यता मिळालेल्या ‘रेनबो फ्लॅग’चे जनक, अमेरिकेतील कलावंत गिल्बर्ट बेकर यांचे ३१ मार्च २०१७ रोजी निधन झाले.
गिल्बर्ट यांचा जन्म २ जून १९५१ रोजी अमेरिकेतील कॅन्सास राज्यात झाला. त्यांचे वडील न्यायाधीश तर आई शिक्षिका होती.
बेकर यांनी १९७० ते १९७२ या काळात अमेरिकी लष्करात नोकरी केली. नोकरीच्या निमित्ताने ते सॅनफ्रान्सिस्को शहरात आले आणि तेथे त्यांचा समलिंगी चळवळीशी संबंध आला.
सैन्यातील सेवा संपल्यानंतर त्यांनी शिवणकला शिकून घेतली आणि त्यावर आपला चरितार्थ चालू केला.
१९७८साली बेकर यांनी रेनबो फ्लॅग (इंद्रधनुष्य झेंडा) बनवला. या मूळच्या झेंड्यात आठ रंग होते.
या ध्वजातील आठ रंगांच्या पट्टय़ा लैंगिक जीवन, आयुष्य, पीडानिवारण, प्रकाश, निसर्ग, कला, सौहार्द, प्राणतत्त्व यांचे प्रतिनिधित्व करीत होत्या.
इंद्रधनुष्यातील रंग हे एलजीबीटी समुदायातील विविधतेचे प्रतीक आहेत. तसेच तो आकाशातून अवतरलेला नैसर्गिक ध्वज आहे, असे बेकर यांचे म्हणणे होते.
नंतर या झेंड्यातील गुलाबी आणि टर्कोज हे रंग झेंड्याचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन करताना बाधक ठरल्याने ते नंतर वगळण्यात आले.
अशा प्रकारे सुधारित रेनबो फ्लॅगमध्ये सहा रंग होते. हा झेंडा लवकरच एलजीबीटी समुदायाचे प्रतीक म्हणून मान्यता पावला.
हा ध्वज रेनबो प्राइड म्हणून नंतर एलजीबीटी समुदायाच्या हक्कांच्या लढय़ाचे प्रतीक बनला आणि बेकर त्याचे चालतेबोलते पुरस्कर्ते बनले.
बेकर यांची कपडय़ांची नवी डिझाइन्स बनवण्यात हातोटी होती. त्याचा वापर त्यांनी एलजीबीटी चळवळीसाठी ध्वज व अन्य चिन्हे बनवण्यासाठी केला.
त्यानंतर १९७९साली बेकर सॅनफ्रान्सिस्कोमधील पॅरामाऊंट फ्लॅग कंपनीसाठी काम करू लागले. तेथे त्यांनी अनेक देशांतील चळवळी, पक्ष, संघटना आदींसाठी ध्वजांचे डिझाइन व निर्मिती केली.
१९९४साली त्यांनी १९६९च्या स्टोनवॉल दंगलीच्या २५व्या वर्धापन दिनानिमित्त जगातील सर्वात मोठा ध्वज बनवला होता.
२००३साली बेकर यांनी त्यांच्याच रेनबो प्लॅगच्या २५व्या वाढदिवसानिमित्त मेक्सिकोच्या आखातापासून अटलांटिक महासागरापर्यंत पसरलेला महाकाय रेनबो फ्लॅग बनवला. नंतर त्याचे तुकडे करून १०० शहरांत पाठवले होते.
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने २०१५साली समलिंगी विवाहाला मान्यता दिली. हा विजय साजरा करण्यासाठी व्हाइट हाऊसवर बेकर यांच्या रेनबो प्लॅगच्या रंगांत विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा