चालू घडामोडी : २ मे
उत्तर प्रदेश सरकारची गाईंसाठी रुग्णवाहिका सेवा
- उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ‘गोरक्षा चिकित्सा मोबाईल व्हॅन्स’ या गाईंसाठीच्या रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ केला आहे.
- उत्तर प्रदेश सरकारने सुरु केलेल्या या सेवेच्या माध्यमातून आजारी आणि जखमी गाईंना गोशाळेत किंवा पशु चिकित्सालयात नेण्यात येणार आहे.
- तेथे गायींवर उपचार करण्यात येईल. यासोबतच रुग्णवाहिकेतही गायींवर उपचार करण्यासाठी एक पशु वैद्यकीय अधिकारी, एक सहाय्यक उपस्थित असेल.
- मनरेगा मजूर कल्याण संघटनेच्या मदतीने ही सुविधा सुरुवातीच्या कालावधीत अलाहाबाद, गोरखपूर, लखनऊ, मथुरा आणि वाराणसीत उपलब्ध असेल.
- रुग्णवाहिका सेवेसोबतच मौर्य यांनी ‘गोसेवा टोल फ्री क्रमांक’ सेवेचाही शुभारंभ केला. या टोल फ्री क्रमांकावरून नागरिक गायींची मदत करू शकतात.
- गायींसाठी रुग्णवाहिकेची सुविधा सुरु करणारे उत्तर प्रदेश देशातील दुसरे राज्य आहे. याआधी २७ एप्रिल रोजी मध्यप्रदेश सरकारने गायींसाठी रुग्णवाहिका सेवा सुरु केली होती.
चिली ओपन स्पर्धेत सौम्यजीत घोषला दुहेरी यश
- सांतियागो येथे झालेल्या चिली ओपन टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या सौम्यजीत घोषने एकेरी आणि दुहेरी गटात सुवर्णपदकाची कमाई केली.
- अव्वल मानांकित सौम्यजीत घोषने अॅन्थनी अमलराजचा ४-२ असा पराभव करीत एकेरीचे विजेतेपद पटकावले.
- त्याआधी घोषने अमलराजच्या साथीने फिलिप फ्लोरिट्झ आणि ह्यूनर झॉक्सचा ४-० असा पराभव करत पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवले.
- आयटीटीएफ जागतिक टूर स्पर्धा किंवा आयटीटीएफ चॅलेंज मालिकेमध्ये प्रथमच भारताने पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकाविले आहे.
- पुरुष एकेरीत ही स्पर्धा जिंकणारा घोष हा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. तर अंतिम फेरीत प्रवेश करणारा चौथा भारतीय म्हणून अमलराजने स्थान मिळविले आहे.
- शरथ कमलने २०१०मध्ये इजिप्त ओपन स्पर्धेत व २०१६मध्ये जी सत्यनने बेल्जियन ओपन स्पर्धेत आयटीटीएफ वर्ल्ड टूरचे एकेरीचे सुवर्ण जिंकले होते.
अल्विन प्लाटिंगा यांना टेम्पलटन पुरस्कार
- ‘गॉड अँड अदर माइंड्स’ या प्रसिध्द पुस्तकाचे लेखक, तत्त्वज्ञ अल्विन प्लाटिंगा यांना यंदाचा टेम्पलटन पुरस्कार जाहीर झाला आहे.
- या पुस्तकात त्यांनी देवाच्या अस्तित्वाविषयी मते मांडली होती. तत्त्वज्ञानात देवाच्या अस्तित्वाला महत्त्व असते किंबहुना ते तत्त्वज्ञानाच्या आड येत नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले होते.
- अमेरिकेतील दानशूर गुंतवणूकदार व तत्त्वज्ञ जॉन टेम्पलटन यांच्या नावे १.४ दशलक्ष डॉलर्सचा हा पुरस्कार १९७२पासून दिला जातो.
- हा पुरस्कार मिळाल्याने प्लाटिंगा हे आता दलाई लामा, मदर तेरेसा, आर्च बिशप डेस्मंड टूटू, बिली ग्रॅहॅम यांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत.
- लोकांचा देवावर असलेला विश्वास सार्थ ठरवण्यात त्यांनी सैद्धांतिक मांडणी केली. विशेषकरून ख्रिश्चन तत्त्वज्ञ म्हणून ते मान्यता पावले आहेत.
- येल विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट केली आहे. हार्वर्ड, ऑक्सफर्ड, कॅलिफोर्निया विद्यापीठांत त्यांनी काही काळ अध्यापन केले. सध्या ते काविन कॉलेज व नॉत्र डेम विद्यापीठात प्राध्यापक आहेत.
- गेल्या अनेक वर्षांच्या तत्त्वज्ञान अभ्यासात त्यांनी धर्म व तत्त्वज्ञान यांच्या नात्याकडे लोक कुठल्या दृष्टिकोनातून पाहतात यावर क्रांतिकारी मते मांडली आहेत.
- गॉड अँड अदर माइंड्स- अ स्टडी ऑफ द रॅशनल जस्टिफिकेशन (१९६७) या त्यांच्या पुस्तकाने ख्रिश्चन तत्त्वज्ञान व आस्तिकतावाद यांना नवे वळण दिले.
- त्यांना यापूर्वी क्युपर पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी एकूण १३ पुस्तके लिहिली, त्यात नॉलेज अँड ख्रिश्चन बिलीफ व वॉरंटेड ख्रिश्चन बिलीफ या पुस्तकांचा समावेश आहे.
- प्लाटिंगा यांनी धार्मिक श्रद्धांबाबत केलेली मांडणी ही तत्त्वज्ञानाच्या अनेक पैलूंच्या माध्यमातून वेध घेणारी आहे.
- विसाव्या शतकातील अमेरिकेचे एक महान तत्त्वज्ञ म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.
मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी सीबीआय आणि ईडी लंडनमध्ये
- भारतीय बँकांचे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून लंडनमध्ये फरार झालेला विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी सीबीआय आणि ईडीचे संयुक्त पथक लंडनमध्ये दाखल झाली आहे.
- या पथकाचे नेतृत्व सीबीआयचे उपसंचालक राकेश अस्थाना करत आहेत. त्यांच्यासमवेत अंमलबजावणी संचलनालयाचेही (ईडी) काही अधिकारी आहेत.
- फरार घोषित केलेल्या विजय माल्याला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.
- या प्रकरणात विजय माल्याला गेल्या महिन्यात लंडनमध्ये अटकही केली होती. मात्र काही वेळानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
- भारताच्या अपीलवर माल्याला स्कॉटलँड यार्ड पोलिसांनी अटक केली होती. दोन्ही देशांमध्ये मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंबंधी करार झाला होता.
- लंडनमधून मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंबंधी भारताने कुटनीतीचाही वापर केला होता. आता हे प्रकरण तेथील न्यायालयात आहे.
- माल्याच्या अटकेनंतर ब्रिटिश कोर्टाने त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठीच सीबीआय आणि ईडीचे संयुक्त पथक लंडनमध्ये दाखल झाले आहे.
- विजय मल्ल्यावर १७ भारतीय बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. २०१६पासून मल्ल्या लंडनमध्ये राहत आहे. कर्जाची परतफेड न केल्याने भारताने मल्ल्याला फरार घोषित केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा