चीनमध्ये आजपासून १४ व १५ मे रोजी होणाऱ्या ‘वन बेल्ट वन रोड’ (ओबोर) शिखर बैठकीमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.
‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (सीपीईसी) पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्याने नाराज भारताने या बैठकीसाठी उच्चस्तरीय प्रतिनिधी न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
सीपीईसीच्या माध्यमातून चीन पाकिस्तानमधल्या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर सुधारणार आहे.
तसेच अरबी समुद्रातलं ‘ग्वादार’ हे पाकिस्तानचे बंदर चीन विकसित करणार आहे. या बंदरांचे रूपांतर चीन एका नाविक तळामध्ये करणार असल्याची भीती भारताला आहे.
त्याचप्रमाणे ‘सीपीईसी’ प्रकल्पाचा मोठा भाग हा पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्याने या प्रकल्पाला भारताचा विरोध आहे.
महाराष्ट्रातील तीन परिचारिकांना फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार
रुग्णसेवेचे पवित्र कार्य करताना उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्वप्ना जोशी, चंद्रकला चव्हाण आणि कल्पना गायकवाड या महाराष्ट्रातील तीन परिचारिकांचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ‘फ्लॉरेन्स नाइटिंगेल’ राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव केला.
राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात देशभरातील एकूण ३५ परिचारिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘फ्लॉरेन्स नाइटिंगेल’ यांच्या जन्मदिन ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून या पुरस्कारांचे वितरण केले जाते.
सन्मानपदक, प्रशस्तिपत्र आणि ५० हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हे पुरस्कार १९७३पासून प्रदान करण्यात येतात.
आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताला एकूण १० पदके
आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या सुमित कुमारने अखेरच्या दिवशी पुरुषांच्या १२५ किलो वजन गटाच्या फ्रीस्टाईलमध्ये रौप्यपदक जिंकले.
अंतिम लढतीत सुमित कुमारला इराणच्या मोहम्मद काझीम मोहेबीने २-६ अशा फरकाने पराभूत करत सुवर्णपदक जिंकले.
अशा प्रकारे भारतीय पैलवानांनी या स्पर्धेत एक सुवर्ण, पाच रौप्य आणि चार कांस्यपदकांसह एकूण दहा पदकांची कमाई केली.
याआधी बँकॉकला झालेल्या मागील आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताने एकूण ९ पदके पटकावली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा