चालू घडामोडी : १५ मे
विनय मोहन क्वात्रा भारताचे फ्रान्समधील राजदूत
- हिंदी, फ्रेंच, रशियन अशा अनेक भाषांचे ज्ञान असेलेल्या विनय मोहन क्वात्रा यांची भारताचे फ्रान्समधील राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे.
- क्वात्रा यांच्या नेमणुकीचे वैशिष्टय़ म्हणजे फ्रान्समध्ये सत्ताबदल होऊन इमॅन्युअल मॅक्रॉन अध्यक्ष झाले असताना ते सूत्रे हाती घेणार आहेत.
- क्वात्रा हे १९८८च्या तुकडीचे आयएफएस म्हणजे परराष्ट्र सेवा अधिकारी आहेत. २०१५मध्ये ते पंतप्रधान कार्यालयात विशेष कामकाज अधिकारी होते.
- क्वात्रा हे विज्ञान पदवीधर असून त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधात पदविका पूर्ण केली आहे. त्यांनी अमेरिकेतील भारतीय दूतावासात सहसचिव म्हणून काम केले आहे.
- राजनैतिक अधिकारी म्हणून क्वात्रा यांनी जिनिव्हात पहिल्यांदा काम केले, नंतर संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटना व जागतिक आरोग्य संघटनेत त्यांनी काम केले.
- दक्षिण आफ्रिकेत दरबान येथे त्यांनी वाणिज्य दूतावासात व्यापार व आर्थिक कामकाज बघितले. चीनमधील भारतीय दूतावासात ते काही काळ व्यापार उपप्रमुख होते.
- रशियात ताश्कंद येथे त्यांनी भारताची आर्थिक व राजनैतिक आघाडी सांभाळली आहे. नंतर त्यांनी सार्कमध्ये व्यापार व अर्थ कामकाज प्रमुख म्हणून संचालकपदावर काम केले.
- मे २०१०मध्ये वॉशिंग्टनमध्ये त्यांनी भारतीय दूतावासात व्यापार विभागाची धुरा सांभाळली.
- अलीकडे ते पंतप्रधान मोदी यांच्या परदेश दौऱ्यांचे काम विशेष अधिकारी म्हणून पाहात होते.
- फ्रान्सशी भारताचे अनेक ऊर्जा करार झाले आहेत त्यात अरिव्हा कंपनीशी जैतापूर अणुभट्टय़ांच्या उभारणीबाबत झालेला करार महत्त्वाचा आहे.
- एकूण ६ अणुभट्टय़ांचे समझोता करार २०१६मध्ये झाले असून हे प्रकल्प वेळेत पूर्ण झाले नाहीत तर खर्च वाढत जाण्याची शक्यता आहे. त्यांना चालना देण्याचे काम क्वात्रा यांना प्रामुख्याने करावे लागणार आहे.
- संरक्षणक्षेत्रात भारताने ३६ रफाल विमानांच्या खरेदीचा करार फ्रान्सशी केला आहे. त्याची अंमलबजावणी करताना क्वात्रा यांचे काम महत्त्वाचे ठरणार आहे.
जेष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांचे निधन
- गेली ७०हून अधिक वर्षे नाट्यव्यवसायात रंगभूषेची धुरा समर्थपणे सांभाळणारे रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांचे १५ मे रोजी मुंबईत निधन झाले.
- बोरकर यांनी वयाच्या ११व्या वर्षी कामगार रंगभूमीवर सादर झालेल्या ‘सूडाची प्रतिज्ञा’ या नाटकासाठी पहिल्यांदा स्वतंत्रपणे रंगभूषा केली
- रंगभूषेच्या कामातून निवृत्ती पत्करल्यानंतर ते मुंबई विद्यापीठात ‘रंगभूषा’ हा विषय प्रात्यक्षिकासह शिकवण्याचे काम ते करत.
- त्यांना १९९२च्या २४व्या महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेवेळी उत्कृष्ट रंगभूषाकार म्हणून गौरविण्यात आले.
- गुडबाय डॉक्टर या नाटकातील मधुकर तोरडमल यांच्या रंगभूषेकरिता त्यांना नाट्यदर्पण पुरस्कार प्राप्त झाला.
- भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार यांशिवाय अनेक अन्य संस्थांनी त्यांना सन्मान आणि पुरस्कार दिले.
- कृष्णा बोरकर यांची रंगभूषा असलेली नाटके:- गगनभेदी, गरुडझेप, गारंबीचा बापू, गुडबाय डॉक्टर, दीपस्तंभ, रणांगण, शिवसंभव, हे बंध रेशमाचे
- कृष्णा बोरकर यांची रंगभूषा असलेले चित्रपट:- दो आँखे बारा हाथ, नवरंग, मौसी
- कृष्णा बोरकर यांनी रंगभूषा केलेले प्रसिद्ध कलावंत:- व्ही. शांताराम, डॉ. काशीनाथ घाणेकर, केशवराव दाते, मास्टर दत्ताराम, नानासाहेब फाटक, बाबूराव पेंढारकर, वसंत शिंदे, सुधीर दळवी
दिप्ती शर्मा आणि पूनम राउत यांचा विश्वविक्रम
- भारतीय दिप्ती शर्मा आणि पूनम राउत या दोन क्रिकेटपटूंनी आयर्लंडविरूद्ध सामन्यात पहिल्या विकेटसाठी ३२० धावांची भागीदारी केली.
- ३०० धावांची भागीदारी करणारी दीप्ती शर्मा आणि पूनम राऊत या दोघींची ही जगातील पहिलीच सलामीची जोडी ठरली आहे.
- आंतरराष्ट्रीय महीला एकदिवसीय क्रिकेटमधील ही कोणत्याही विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे.
- यावेळी दिप्ती शर्माने २६ चौकार आणि २ षटकारांसह केलेल्या १८८ धावा (१६० चेंडू) हा भारतीय महीला क्रिकेटमधला नवा विक्रम ठरला.
- यापूर्वी भारताकडून सर्वोच्च वैयक्तिक खेळीचा विक्रम जया शर्मा हिच्या नावे होता. तिने पाकिस्तानविरुद्ध २००५मध्ये नाबाद १३८ धावा केल्या होत्या.
- दिप्तीची १८८ धावांची खेळी महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही दुसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्क हिने डेन्मार्कविरुद्ध केलेली नाबाद २२९ धावांची खेळी सर्वोच्च आहे.
- पूनम राउतने १०९ धावांची खेळी करून दिप्तीला चांगली साथ दिली. या सामन्यानंतर पूनम राउत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
- या दोघींच्या जबरदस्त खेळीच्या बळावर भारतीय महीला संघाने पहिल्यांदाच ३००चा आकडा गाठण्यात यश मिळविले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा