चालू घडामोडी : ४ मे
इंदूर : देशातील सर्वांत स्वच्छ शहर
- केंद्र सरकारने केलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०१७’मध्ये मध्यप्रदेशातील इंदूरने देशातील सर्वांत स्वच्छ शहराचा मान पटकावला आहे.
- राज्यांचा विचार करता गुजरातमधील १२ शहरांनी टॉप ५०मध्ये स्थान मिळवल्याने या राज्याची कामगिरी सर्वांत सरस ठरली.
- जाहीर करण्यात आलेल्या यादीत महाराष्ट्रातील ४४ शहरांचा समावेश आहे, पण टॉप-१०० मध्ये फक्त सात शहरे जागा मिळवू शकली.
- या यादीमध्ये ४३४ शहरांचा समावेश असून इंदूरपाठोपाठ मध्य प्रदेशातीलच भोपाळने दुसरा, तर आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणमने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
- भुसावळला शेवटून दुसरे म्हणजेच ४३३वे स्थान मिळाले आहे. तर उत्तर प्रदेशमधील गोंडा शहर (४३४) सर्वांत अस्वच्छ ठरले आहे.
- या यादीमध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई आठव्या क्रमांकावर तर पुणे १३व्या आणि मुंबई २९व्या क्रमांकावर आहे.
- २००२पासून नवी मुंबईने स्वच्छतेविषयी मिळविलेला सलग चौथा पुरस्कार असून विविध क्षेत्रातील एकूण १४ महत्त्वाचे पुरस्कार मिळविले आहेत.
- ‘स्वच्छ भारत’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना आहे. ‘स्वच्छ सर्व्हेक्षण २०१७’ अंतर्गत या योजनेचा आढावा घेण्यात आला.
- शहरी भागांमध्ये हागणदारीमुक्तीसाठी केलेल्या प्रयत्नांचे फलित, घनकचऱ्याचे संकलन, प्रक्रिया व विल्हेवाट या प्रमुख मुद्द्यांच्या आधारे हे सर्वेक्षण करण्यात आले.
- गेल्यावर्षी स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणासाठी देशातल्या ७३ शहरांचा समावेश करण्यात आला होता.
- यामध्ये पहिल्या १० शहरांत महाराष्ट्रातील नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांचा समावेश होता.
टॉप १० स्वच्छ शहरे |
क्र. |
शहर |
राज्य |
१ |
इंदूर |
मध्यप्रदेश |
२ |
भोपाळ |
मध्यप्रदेश |
३ |
विशाखापट्टनम |
आंध्रप्रदेश |
४ |
सुरत |
गुजरात |
५ |
म्हैसूर |
कर्नाटक |
६ |
तिरुचिरापल्ली |
तमिळनाडू |
७ |
एनडीएमसी |
नवी दिल्ली |
८ |
नवी मुंबई |
महाराष्ट्र |
९ |
तिरुपती |
आंध्रप्रदेश |
१० |
बडोदा |
गुजरात |
डॉ. संजय प्रतिहार यांना युवा वैज्ञानिक पुरस्कार
- तेजपूर विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. संजय प्रतिहार यांना भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या युवा वैज्ञानिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
- त्यांनी गुंतागुंतीच्या बहुधातू रसायन प्रक्रियेवर संशोधन पूर्ण केले असून त्याचा वापर कृषी क्षेत्रात कसा करता येईल हे सिद्धांताने मांडले आहे.
- त्यांच्या या सिद्धांतामुळे पिकांना आवश्यक असे धातूयुक्त जीवनसत्त्व देणे शक्य होणार आहे. या संशोधनाचा फायदा केवळ कृषी क्षेत्रालाच नव्हे तर उद्योगांनाही होणार आहे.
- डॉ. प्रतिहार यांनी रसायनशास्त्रात पदवी व इनऑर्गेनिक रसायनशास्त्रात बनारस हिंदू विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केले आहे.
- नंतर त्यांनी आयआयटी खरगपूरच्या रसायनशास्त्र विभागातून ऑर्गोनोमेटॅलिक रसायनशास्त्रात पीएचडी मिळविली आहे.
- यापूर्वी त्यांना विज्ञान-तंत्रज्ञान विभागातर्फे ‘इन्स्पायर प्रोफेसर’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याचबरोबर त्यांना ‘सीएसआयआर’तर्फे वरिष्ठ संशोधन अभ्यासवृत्तीही मिळाली होती.
- २०१७मध्ये त्यांना संशोधन क्षेत्रासाठी ‘व्हिजिटर्स’ पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे. याबरोबर याच वर्षांत त्यांना ‘गांधीयन यंग टेक्नॉलॉजी इनोव्हेशन’ पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे.
- भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीची स्थापना १९३५मध्ये करण्यात आली. भारतीय वैज्ञानिकांची ही सर्वोच्च संस्था असून विज्ञानातील सर्व शाखांचे ती प्रतिनिधित्व करते.
- देशातील तरुणांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड निर्माण करणे तसेच त्याचा वापर विधायक व देशहिताच्या कामासाठी करणे या दृष्टीने ही अकादमी काम करीत आहे.
फिफा क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघ टॉप-१००मध्ये
- जागतिक फुटबॉल महासंघाने (फिफा) प्रसिद्ध केलेल्या ताज्या जागतिक क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघाने टॉप-१०० मध्ये स्थान मिळवले आहे.
- सुमारे २१ वर्षांनंतर भारतीय फुटबॉल संघाने जागतिक क्रमवारीत हे स्थान प्राप्त केले आहे. यापूर्वी १९९६मध्ये भारत टॉप-१०० मध्ये पोहोचला होता.
- फेब्रुवारी १९९६ मध्ये भारताला ९४ वे स्थान मिळाले होते. आतापर्यंत भारताची हीच सर्वश्रेष्ठ फिफा क्रमवारी आहे.
- भारतासोबत निकारागुआ, लिथुआनिया आणि इस्टोनिया हे संघ देखील संयुक्तपणे १००व्या स्थानावर आहेत.
- स्वातंत्र्यानंतर भारताने केवळ ६ वेळा अव्वल शंभर संघांमध्ये प्रवेश मिळवला आहे. आशियाई क्रमवारीत भारतीय संघ अकराव्या स्थानावर आहे.
गोव्यामध्ये किशोरी आमोणकर यांच्या नावाने शिष्यवृत्ती
- गोवा राज्य सरकारने दिवंगत ज्येष्ठ गायिका किशोरी आमोणकर यांच्या नावाने संशोधन शिष्यवृत्ती जाहीर केली आहे.
- ‘गानसरस्वती किशोरी आमोणकर रिसर्च फेलोशिप इन इंडियन क्लासिकल म्युझिक,’ असे या शिष्यवृत्तीचे नाव आहे.
- तरुणांमध्ये भारतीय शास्त्रीय संगीताची आवड निर्माण व्हावी, आमोणकरांचा वैभवशाली वारसा जतन व्हावा आणि शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाला चालना मिळावी म्हणून ही शिष्यवृत्ती सुरू केली आहे.
- किशोरी आमोणकर यांच्या सन्मानार्थ सुरू केलेली ही शिष्यवृत्ती ३१ मार्च २०२२ पर्यंत असेल. राज्य सरकार संचलित कला अकादमीच्या वतीने शिष्यवृत्ती देण्यात येईल.
- गोव्यातील संगीतकारांनी या शिष्यवृत्तीचा फायदा घेऊन भारतीय शास्त्रीय संगीत, गायन, नृत्य आणि वाद्य आदी क्षेत्रांच्या अभ्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येईल.
फेसबुककडून भारतात एक्स्प्रेस वायफाय सुविधा
- सध्या सर्वात आघाडीवर असणाऱ्या फेसबुक ही सोशल नेटवर्किंग साईट भारतात व्यावसायिक स्तरावर एक्स्प्रेस वायफाय सुविधा सुरु करणार आहे.
- देशातील ग्रामीण भागातील जनतेला यामुळे सार्वजनिक हॉटस्पॉटच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा उपलब्ध होणार आहे.
- याआधी २०१५मध्ये ही सुविधा ग्राहकांना मोफत देण्यात आली होती. मात्र नेट न्यूट्रॅलिटीवरुन काही वाद झाल्याने ती स्थगित करण्यात आली होती.
- त्यावेळी ही सुविधा पूर्णपणे मोफत असल्याने ठराविक वेबसाईटचाच वापर करता येत होता.
- मात्र आता या सुविधेव्दारे इंटरनेटवरील कोणत्याही वेबसाईटचा वापर ग्राहकाला करता येणार असून, त्यासाठी ठराविक किंमत मोजावी लागणार आहे.
- सध्या या सुविधेसाठी फेसबुकने एअरटेल कंपनीबरोबर भागीदारी केली असून, येत्या काही महिन्यांत २० हजार ग्राहकांना याव्दारे एक्स्प्रेस वायफाय हॉटस्पॉट वापरता येणार आहे.
- ही एक्स्प्रेस वायफाय सुविधा देशातील उत्तराखंड, गुजरात, राजस्थान आणि मेघालय याठिकाणी जवळपास ७०० हॉटस्पॉट उपलब्ध करुन देणार आहे.
- भारताशिवाय केनिया, टांझानिया, नायजेरिया आणि इंडोनेशिया या देशांमध्येही ही एक्स्प्रेस वायफाय सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
एआयआयबीकडून भारताला १६० दशलक्ष डॉलरचे कर्ज
- चीन पुरस्कृत एशिएन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने (एआयआयबी) आंध्र प्रदेशातील वीजव्यवस्था सुधारणा प्रकल्पाला १६० दशलक्ष डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे.
- एआयआयबीमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकाचा मोठा भागधारक आहे. भारतातील प्रकल्पाला एआयआयबीकडून कर्ज मंजूर होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
- आंध्र प्रदेशातील वीज पारेषण आणि वितरणव्यवस्थेत सुधारणा करण्याच्या प्रकल्पाला बँकेने कर्ज दिले आहे.
- ’२४X७ सर्वांसाठी ऊर्जा’ नावाचा हा प्रकल्प भारत सरकारच्या २०१४ साली सुरू करण्यात आलेल्या ‘सर्वांसाठी ऊर्जा’ योजनेचा भाग आहे.
- निवडक राज्यांत सर्वांना पाच वर्षांत कार्यक्षम, विश्वसनीय आणि परवडणारी वीज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पाला जागतिक बँकेनेही अर्थसाह्य केले आहे.
- या प्रकल्पामुळे आंध्र प्रदेश आणि भारताच्या आर्थिक विकासाला थेट योगदान मिळेल. व्यवसाय आणि शेतीलाही त्याचा थेट लाभ मिळेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा