चालू घडामोडी : २२ मे
अत्याधुनिक सुविधांनी सज्ज ‘तेजस’चे लोकार्पण
- बहुप्रतिक्षित आणि अत्याधुनिक सुविधांनी सज्ज ‘तेजस’ रेल्वे अखेर २२ मेपासून मुंबई-गोवा मार्गावर धावणार आहे.
- रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या रेल्वेचे लोकार्पण होणार असून, या एक्स्प्रेसमुळे मुंबई ते गोवा हे अंतर केवळ साडेआठ तासांत गाठता येणार आहे.
- ताशी १३० किलोमीटर वेगाने धावणारी तेजस ही देशातील पहिली रेल्वे आहे. रेल्वेचा प्रवास जास्तीत जास्त सुकर व्हावा, यादृष्टीने तेजस बनविण्यात आली आहे.
- तेजसच्या माध्यमातून रेल्वेपेक्षा विमान प्रवासाला प्राधान्य देणाऱ्या प्रवाशांना आकर्षित कऱण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जाणार आहे.
- २० डब्यांची ही रेल्वे पूर्णपणे वातानुकुलित आहे. चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह अशा दोन प्रकारांत सेवा दिली जाणार आहे.
- आता मुंबई-गोवा या मार्गावर धावणारी ही रेल्वे पुढील काळात दिल्ली-चंदिगड आणि दिल्ली-लखनौ या मार्गावरही धावेल.
- एरवी आठवड्यातील पाच दिवस धावणारी ही एक्स्प्रेस पावसाळ्यादरम्यान मात्र आठवड्यातील ३ दिवस धावणार आहे.
- ‘तेजस’मधील सुविधा
- एसीसह आरामदायी बैठक व्यवस्था
- प्रत्येक प्रवाशाच्या समोर एलईडी टीव्ही.
- वायफाय सुविधा.
- चहा आणि कॉफीचे वेंडिंग मशीन तसेच अल्पोपहाराची सुविधा.
- सीसीटीव्ही, स्वयंचलित दरवाजे अशा अत्याधुनिक सुविधा.
- अंध व्यक्ती ब्रेलच्या साह्याने सेवा वापरू शकतील अशी विशेष सुविधा.
- अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज स्वच्छतागृहे.
- हवा खेळती रहावी यासाठीची यंत्रणा
- आगप्रतिबंधक यंत्रणा.
- प्रवासादरम्यान मार्ग दाखविणारी जीपीएस सिस्टीम.
मुंबई इंडियन्सला आयपीएलचे विजेतेपद
- मुंबई इंडियन्स संघाने रायझिंग पुणे सुपरजाएंट्स संघावर एका धावेने रोमांचक विजय मिळवत तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले.
- हैदराबादमध्ये रंगलेल्या या आयपीएलच्या दहाव्या पर्वाच्या अंतिम सामन्यात मुंबईने अखेरच्या षटकामध्ये विजय खेचून आणला.
- मुंबई इंडियन्सला पुण्याने २० षटकांमध्ये ८ बाद १२९ धावांत रोखले होती. त्याच्या प्रत्युत्तरात पुणे संघाला १२८ धावांपर्यंतच मजल मारता आली.
- संघाचे संतुलन ठेवणारा अष्टपैलु कृणाल पांड्याने याने ४७ धावांची दमदार खेळी केली. त्याच्या योगदानामुळेच मुंबईला १२९ धावा करता आल्या.
- आयपीएलमध्ये तीन वेळा विजेतेपद पटकाविणारा मुंबई इंडियन्स पहिलाच संघ ठरला आहे. याआधी मुंबईने २०१३ आणि २०१५चे विजेतेपद पटकावले होते.
- मुंबईनंतर कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि चेन्नई सुपरकिंग्स (सीएसके) या संघांनी प्रत्येकी २ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.
- इतर पुरस्कार:-
- ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) - डेव्हिड वॉर्नर (सनराजयर्स हैदराबाद)
- पर्पल कॅप (सर्वाधिक बळी) - भुवनेश्वर कुमार (सनराजयर्स हैदराबाद)
- एकाच संघातील खेळाडूंनी ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप पटकावण्याचा विक्रम या सत्रात झाला आहे. याआधी २०१३मध्ये सीएसकेच्या माईक हसी आणि ड्वेन ब्राव्हो यांनी अशी कामगिरी केली होती.
कोळसा घोटाळ्याप्रकरणी एच सी गुप्ता यांना २ वर्षाचा तुरुंगवास
- कोळसा घोटाळ्याप्रकरणी कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एच सी गुप्ता यांच्यासह आणखी दोन जणांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
- शिक्षा सुनावताच गुप्ता यांनी जामिनासाठी अर्ज केला असून त्यांना १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
- मध्यप्रदेशातील रुद्रपूरमध्ये केएसएसपीएल कोळसा खाणीतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एच सी गुप्ता यांच्यासह दोन अधिकाऱ्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते.
- यूपीए सरकारच्या काळात गुप्ता हे दोन वर्ष सचिव म्हणून कार्यरत होते. या कालावधीत त्यांनी ४० कोळसा खाणींचे वाटप केले होते.
- मध्य प्रदेशातील थेसगोरा बी व रुद्रपुर खाणी केएसएसपीएलला वाटप करताना गैरप्रकार केल्याच्या आरोप गुप्तांवर होता.
- गुप्तांसह कोळसा मंत्रालयाचे तत्कालीन सहसचिव के एस कोफ्रा व संचालक के सी सामरिया यांनाही २ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
- याशिवाय केएसएसपीएल व त्याचे व्यवस्थापकीय संचालक पवनकुमार अहलुवालिया यांनाही दोषी ठरवले होते.
- गुप्ता यांनी निर्णय घेताना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही अंधारात ठेवल्याचा दावा केला गेला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा