चालू घडामोडी : १९ मे
गहू क्रांतीचे जनक डॉ दिलबाग सिंग अठवाल यांचे निधन
- भारतातील गहू क्रांतीचे जनक आणि हरित क्रांतीचा पाया रचणारे कृषी वैज्ञानिक डॉ दिलबाग सिंग अठवाल यांचे १४ मे रोजी अमेरिकेत निधन झाले.
- डॉ. अठवाल यांचा जन्म १९२८मध्ये पंजाबमधील कल्याण या गावात झाला. पंजाब कृषी विद्यापीठात ते प्राध्यापक आणि संकरित वाण विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.
- ७०च्या दशकात भारताने मेक्सिकोवरून आयात केलेल्या ‘लेरमा रोजो ६४’ आणि ‘पीव्ही १८’ या गव्हाच्या वाणांवर त्यांनी संशोधन केले केले.
- भारतातील अन्नधान्य उत्पादनात वाढ अत्यावश्यक असताना त्यांनी ‘बाजरा-१’ या बाजरीच्या वाणाचा आणि ‘कल्याण’ व ‘कल्याणसोना’ या गव्हाच्या वाणांचा शोध लावला.
- हरित क्रांतीच्या काळात देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणाऱ्या महत्वाच्या शास्त्रज्ञापैकी डॉ. अठवाल एक होते.
- हरित क्रांतीनंतर भारतात ‘संकरित वाण क्षेत्रातील जादूगार’ अशी अठवाल यांची ओळख निर्माण झाली.
- अठवाल यांनी गहू, बाजरी, हरभरा आणि तंबाखू या पिकांच्या विविध वाणांच्या निर्मितीत बहुमूल्य योगदान दिले आहे.
- अठवाल यांनी फिलिपाइन्समधील आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेत उपमहासंचालक म्हणून कार्य केले आहे. सिडनी विद्यापीठाने १९५५मध्ये त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करून गौरविले.
- कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी भारतातील विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील सर्वोच्च शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार त्यांना १९६४मध्ये देण्यात आला.
- जैविक विज्ञानातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यबद्दल त्यांना १९७५मध्ये भारत सरकारने पद्मभूषण या नागरी पुरस्काराने गौरविले होते.
महाराष्ट्र रेरा प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी गौतम चटर्जी
- महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या (रेरा) अध्यक्षपदी माजी अतिरिक्त मुख्य सचिव आणि गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव गौतम चटर्जी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
- तर सार्वजनिक आरोग्य विभागाचे विद्यमान प्रधान सचिव डॉ. विजय सतबीरसिंग आणि न्यायपालिकेतून बी डी कापडणीस यांची सदस्यपदी निवड झाली आहे.
- प्राधिकरणाच्या अध्यक्षांना पद स्वीकृतीपूर्वी शासनाच्या गृहनिर्माण विभागाचे मंत्री यांच्यासमोर पद व गोपनीयतेची शपथ घ्यावी लागेल.
मुकेश अंबानी यांनी फोर्ब्सच्या वर्ल्ड गेंमचेंजर यादीत प्रथम स्थान
- रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा उद्योगपती मुकेश अंबानी यांनी फोर्ब्सच्या ‘वर्ल्ड गेंमचेंजर’ या २५ जणांच्या यादीत प्रथम स्थान पटकावले आहे.
- लाखो लोकांच्या आयुष्यात बदल केल्याबद्दल आणि आपल्या क्षेत्रात बदल केलेल्या व्यक्तींचा समावेश या यादीत करण्यात आला आहे.
- मुकेश अंबानी यांनी 'जियो'च्या माध्यमातून भारतात इंटरनेट क्रांती तर केलीच शिवाय लाखो सामान्य नागरिकांपर्यंत इंटरनेट सुविधा पोहचवली असल्याचा उल्लेख फोर्ब्सने केला आहे.
- जियोने मागील सहा महिन्यात सुमारे १० कोटी ग्राहक जोडले. स्वस्त इंटरनेट सर्व्हिसमुळे इतर टेलिकॉम कंपन्यांनादेखील आपल्या धोरणात बदल करावा लागला.
- या यादीतील समाविष्ट इतर व्यक्ती:-
- डायसन कंपनीचे संस्थापक जेम्स डायसन
- सौदी अरबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान
- आफ्रिकेतील रिटेल उद्योजक क्रिस्टो वीजे
- अमेरिकन ग्लोबल इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन ब्लॅक रॉकचे संस्थापक लॅरी फिंक
फोर्ब्ज मिडल इस्ट मासिकातर्फे डॉ धनंजय दातार यांचा गौरव
- अल अदील ट्रेडिंगचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ धनंजय दातार यांना फोर्ब्ज मिडल इस्ट मासिकातर्फे टॉप इंडियन लीडर्स इन द अरब वर्ल्ड २०१७ पुरस्काराने गौरवण्यात आले.
- अरब जगतातील आघाडीच्या भारतीय नामवंतांच्या यादीत डॉ दातार यांना ३२वे मानांकन मिळाले आहे.
- यंदा सलग पाचव्या वर्षी फोर्ब्ज मिडल इस्टतर्फे या पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
- अरब जगताच्या प्रगतीची आकांक्षा बाळगून योगदान देणाऱ्या आघाडीच्या भारतीयांची बहुप्रतिक्षीत यादी फोर्ब्ज मिडल इस्टने जाहीर केली.
- अरब जगतात उद्योग चालवणाऱ्या भारतीय व्यावसायिकांबाबत सखोल संशोधन व विश्लेषण केल्यानंतर त्यांना मानांकन देऊन ही यादी तयार केली जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा